Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Friday, 31 July 2015

"आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय"

आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय..
एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज डोळ्यावरती अज्ञानाचं घोंगडं पाघरूण गाढ झोपी गेली आहे. माझा-भोळा-भाबडा धनगर समाज निद्रावस्थेत असताना धनगर जमातीमधील नेत्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे की खरंच ते आंधळे झाले आहेत तेच समजेना. ज्या समाजाचं नेतृत्व निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज आहे तो समाज कधीच प्रगतीपथावर पोहचत नाही हे तितकेच सत्य आहे. ज्या दिवसी धनगर समाजाचे नेते प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस यांची चमचेगीरी करायचे सोडून देतील त्याचवेळी धनगर समाज खर्या अर्थाने विकासाच्या दिशेने पाऊल टाकेल. समाजाचं बाजारीकरण जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत धनगर समाजाला न्याय मिळणार नाही. नाहीतर अन्याय आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
धनगर समाजातील नेत्यांची अवस्था आंधळ्यासारखी झालेली आहे. प्रस्तापितांचे बुट उचलायची आणि चाटायची घाणेरडी सवय समाजातील काही नेत्यांना आहे. स्वार्थासाठी समाजातील नेते त्या प्रस्तापितांची चमचेगीरी अन् हुजरेगीरी करताहेत आणि भोळ्या भाबड्या धनगर समाजाला प्रस्तापितांच्या अर्थातच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत पण या सर्वांचा फायदा होतोय त्या प्रस्तापितांना. प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस सारखे लांडगे धनगर समाजातील काही नेत्यांना जवळ करून त्यांना फूस लावताहेत मग धनगर समाजातील विकले गेलेले नेते धनगर समाजाला फसवून त्या लांडग्यांच्या दावणीला घेऊन जातात. त्या प्रस्तापितांनी आजपर्यंत धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला खासदार म्हणून लोकसभेत पाठवले नाही एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतात क्रमांक एक वरती लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचे विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार मात्र बोटावर  मोजण्याएवढेच कसे काय?
धनगर समाजाचे नेते त्या प्रस्तापितांच्या मागे जातात खरे पण त्यांना माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा विकास कधीही करता आला नाही. माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाबांधवांच्या भावना त्यांना कधी समजल्याच नाहीत. मग धनगर समाजाच्या त्या नेत्यांना नेते म्हणायचे की दलाल?? भूंक म्हणलं भुंकायचं छौ म्हणलं की पळायचं अन त्या प्रसतापितांच्या दावणीला जाऊन शेपूट हालवत बसायचं आणि प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीसांनी टाकलेल्या तुकड्यावर जीभाळ्या चाटायच्या आणि पुन्हा धनगर समाजाला फसवायच्या तयारीला लागायचं अशी अवस्था धनगर समाजातील काही अज्ञानी आणि स्वार्थी नेत्यांची आहे. अरे माणुसकी कुठेतरी शिल्लक असायला पाहिजे ना??
जर त्या संबंधित नेत्यांना इतिहासाची जाण असती तर अटकेपार झेंडे फडकवणार्या राजे मल्हारराव होळकर यांच्या शब्दाला थोरला बाजीराव पेशवा मान द्यायचा हा इतिहास त्या नेत्यांना कुणीतरी समजावून सांगा. सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना विचारल्यानंतरच बाजीराव पेशवा निर्णय घ्यायचा पण आज त्यांच्याच जातीत जन्माला आलेले अन् स्वतःला मल्हाररावांचे वारसदार समजणारे नेते (धनगर समाजातील दलाल)  समाजासाठी एखादं काम करायचं ठरवलं तर प्रस्तापित आणि माजोरड्या नेत्यांचे सल्ले घेतात आणि प्रस्तापितांनाच पुढे करतात. अरे कुठे ती राजेशाही अन् कुठे आजच्या नेत्यांची ही गुलामगीरी?? खरंतर महाराष्ट्र राज्यातील जनतेला धनगर समाजातील नेते दिसत नाहीत तर दिसतात ते फक्त समाजाच्या नावावरती मलीदा खाणारे चोर अन् गोरगरीब शेतकर्यांच्या नर्डीवरून नांगर फिरवून टाळूवरचं लोणी खाणार्या त्या औलादी त्यांना स्वतःची घरं भरण्यापलिकडं व सत्ता संपत्ति मिळवण्यापलिकडं काहीच जमत नाही. म्हणून त्या प्रस्तापितांच्या आजूबाजूला फिरणारे धनगर समाजातील नेते आणि प्रस्थापित नेते यांच्यातील नातं म्हणजे "आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं" असंच आहे आणि अक्षरशा ही म्हण खरी ठरतीय असं म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही.
म्हणून जे स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणवून घेताहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही खरंच धनगराच्या औलादी असाल तर आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करणार्या अन् आपल्याला हक्कापासून वंचित ठेवणार्या नेत्यांना बुटाखाली घ्यायला शिका, नाहीतर पुन्हा माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाकडे मताचा जोगवा अन् भिक मागायला आला तर पायातलं पायथान हातात घेऊन तुमच्या थोबाडात मारल्याशिवाय या धनगरांच्या औलादी कदापि शांत बसणार नाहीत.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment