अन्यायाच्या विरोधात किती दिवस मूग गिळून गप्प बसायचं असतं...? अन्याय करणाऱ्यांची सीमा नसते परंतू अन्याय सहन करणाऱ्यांच्या सहनशक्तीचा जर अंत झाला तर अन्याय करणाऱ्यांची काही खैर नसते. म्हणूनच ज्या राष्ट्रमातेनं या भारताच्या विशाल भूमीवर २८ वर्ष राज्यकारभार केला त्या राष्ट्रमाता अहिल्याईंच्या लेकी आता अन्यायाविरोधात पेटून उठल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली पण धनगर समाजाला अजूनही खरे स्वातंत्र्य मिळाले नाही. गेल्या ६७ वर्षापासून धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी मागचे आघाडी सरकार नालायक आणि नपूंसक ठरले परंतू माकडाच्या हातात कोलिते द्यावे आणि त्याने अख्ख्या जंगलाला आग लावावी असाच प्रकार भाजप सरकारने देखिल केला. धनगर समाजाला घटनादत्त आरक्षण असताना देखिल TISS सारख्या संस्थांची नेमणूक करून धनगर समाजाल आरक्षणापासून, सत्तेपासून, शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे घाणेरडे राजकारण हे मराठावादी व ब्राह्मणवादी पक्ष करत असल्याने धनगर समाजाचे फार वाटोळे झाले आहे. एवढे सगळे होऊन देखिल त्या त्या पक्षातले धनगर समाजाचे नेते मात्र आळी मिळी गुप चिळी ची भूमिका घेऊन षंढ होऊन बसले आहेत.
परंतू आता धनगर समाजातील अहिल्या मात्र पेटून उठल्या आहेत. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन असून यादिवशी महिलांचा विशेष सन्मान केला जातो त्यादिवशी अहिल्याईंच्या रक्ताच्या या रणरागिणी समस्त महिला वर्गाच्या मागण्यांसी व समाजावरील होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी मुंबई येथे येऊन धडकणार आहेत. अहिल्या क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा मा.कल्याणीताई वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजातील तमाम महिला व भगिनी दि. ८ मार्च २०१८ रोजी महिला दिनादिवशी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी बसणार आहेत. महिला दिनादिवशी महिलांच्या मागण्या जर मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या नाहीत तर मुखमंत्र्याच्या घरापुढे जागरण गोंधळ करण्याचा इशारा देखिल अहिल्याक्रांती प्रतिष्ठान व अहिल्या क्रांती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा, साप्ताहिक अहिल्याकिरण च्या संपादिका मा.सौ.कल्याणीताई वाघमोडे यांनी दिला आहे. धनगर समाजातील महिला प्रथमच क्रांतीची मशाल घेऊन रणांगणांत उतरणार आहेत, समाजाच्या न्याय व हक्कासाठी लढणार आहेत, झटणार आहेत आणि झगडणार आहेत. आपण सर्वांनी मल्हारराव होळकर बनून महिला दिनादिवशी दि.८ मार्च २०१८ रोजी मुंबई येथिल मोर्चात सहभागी होऊन अहिल्याईंच्या लेकींना पाठबळ द्यावे, प्रेरणा द्यावी ही अखंड धनगर समाजातील माझ्या तमाम समाजबांधवांना व बंधूभगिनींना नम्र विनंती आहे.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
आलाच
*✍️नितीनराजे अनुसे✍️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
No comments:
Post a Comment