![]() |
धनगरांनो जागे व्हा... लेखक- अविनाश धायगुडे |
वाचक अभिप्राय
पुस्तकाचे नाव :- धनगरांनो जागे व्हा
लेखकाचे नाव :- अविनाश धायगुडे (युवा व्याख्याते)
समाजप्रबोधनाच्या माध्यमातून कडीला कडी जोडत जावी व त्याची पुढे साखळी व्हावी असेच समाजप्रबोधनाच्या साखळीशी जोडले गेलेले आमचे सहकारी, बंधुतुल्य प्रिय मित्र तथा युवा व्याख्याते व लेखक मा. अविनाश धायगुडे आपणांस मानाचा
जय मल्हार॥
रविवार दि. ०५ फेब्रुवारी २०१७ रोजी विद्येचे माहेरघर पुणे येथे स्वारगेट जवळील राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या स्मारकाजवळ आपली सर्वप्रथमता भेट झाली. त्यानंतर जहागीरदार अमरजितराजे बारगळ (दादा) यांच्या घरी भेटीसाठी तुम्ही व तुमचे मित्र, यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब व मी असे आपण सर्वजण एकत्रित आलो असता तुम्ही लिहलेले “धनगरांनो जागे व्हा...” हे पुस्तक तुम्ही मला आदराने, आत्मीयतेने भेट दिले. खरंतर त्याच रात्री मी “धनगरांनो जागे व्हा...” हे पुस्तक वाचून हातावेगळे केले होते. प्रतिक्रियांच्या स्वरूपातील अभिप्राय लेखन देखिल मी तेव्हाच केले होते परंतू वेळे अभावी आणि काही तांत्रिक अडचणींमुळे मी तुम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरुपात अभिप्राय पाठवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व....
धनगरांनो जागे व्हा... या आशयावरून मी एकटाच नव्हे तर अखंड धनगर समाजातील प्रत्येक वाचक हा समाजप्रबोधनाच्या निष्कर्षापर्यंत पोहचतो आणि त्याच वेगाने त्याच उत्साहाने पुस्ताकाचे स्वागत करून मनमुरादपणे वाचनाचा आनंद घेऊ लागतो. हल्ली समाजमन हे भरकटलेले असून निद्रावस्थेत असलेल्या समाजाला जागे करण्यासाठी आदरणीय होमेश भुजाडे सर यांच्या “धनगरांची दशा आणि दिशा” या समाजप्रबोधनपर पुस्तकापाठोपाठ “धनगरांनो जागे व्हा...” या तुमच्या पुस्ताकातून धनगर समाजाला जागे करण्याचा तुम्ही जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे त्या प्रयत्नाला एक सर्वसामान्य वाचक या नात्याने खरंतर सलाम करतो. प्रस्तुत समाजप्रबोधनपर पुस्तकात धनगर समाजाला जागे करण्यासाठी तुम्ही सरळ इतिहसामध्ये हात घालून समाजमनाची पाळं-मुळं हलवली आणि समाजाची जी दयनीय अवस्था झाली आहे त्या दयनीय अवस्थेचा अभ्यास करून त्यावरती ज्या काही उपाययोजना करता येतील याचा शोध घेऊन तुम्ही लिखान केले आणि भरकटलेल्या समाजमनाला तुम्ही एकप्रकारे पुस्तकाच्या आशयाला शोभेल असे समाजाला जागे करण्याचे फार मोठे कार्य केले आहे. इतिहासाचे दाखले देत कर्तृत्ववान अशा राष्ट्रमाता अहिल्याई होळकर तसेच विरांगना भिमाई होळकर तसेच वीर शहीद शिंग्रोबा धनगर यांच्या अलौकिक इतिहासाची तुम्ही जाणीव करून दिल्याने समाजमनामध्ये अज्ञानाची जी पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी तुम्ही भरून काढली आणि समाजाला प्रबोधनातून जागृतीकडे खेचून आणले. खरंतर मेंढपाळाला धनगरांना मार्गदर्शक म्हणून संबोधले आहे परंतू त्याच धनगरांना जागे करावे लागते हे आपल्या समाजाचं दुर्दैव ओळखून समाजाने काय करायला हवे आणि काय नको याचे अचूक विवेचन केल्याने माझ्या सारखा वाचक प्रेमी तुमच्या या समाजप्रबोधनावर भाळला गेला.
मी काही फार मोठा लेखक नाही व्याख्याता नाही अथवा विचारवंतदेखिल नाही पण जेव्हा “धनगरांनो जागे व्हा...” हे समाजप्रबोधनपर पुस्तक वाचून हातावेगळे केले तेव्हा मला यामधून खूप काही शिकायला मिळाले. लहान वयात तुम्ही तुमच्या कुशाग्र बुद्धीचे दर्शन समाजाला घडवले आणि एका युवा व्याख्यात्याबरोबरच एका युवा लेखकाचा देखिल जन्म झाला. आज जरी मी तुमच्यापेक्षा वयोमानाने मोठा असलो तरीही मी स्वताला एक विद्यार्थी समजून जेवढे जास्त शिकायला मिळेल तेवढे शिकून घेत असतो. समाजबांधवांना देखिल “धनगरांनो जागे व्हा...” हे समाजप्रबोधनपर पुस्तक फार आवडले हे प्रथम आवृत्तीच्या सर्व प्रति संपल्यावरूनच हे लक्षात येते. त्यामुळे “धनगरांनो जागे व्हा...” या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरात लवकर प्रकाशित करून आम्हा वाचक प्रमींना ते वाचण्याची संधी द्यावी ही प्रामाणि अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे तुमच्या लेखनीची धार अशीच तळपत राहून समाजमनावर समाजप्रबोधनाचा आघात (प्रहार) करत राहो याच तुम्हाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून हर्दिक हर्दिक सदिच्छा.
आपलाच
- ✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
Email :- nitsanuse123@gmail.com
https://nitinrajeanuse123.blogspot.com
No comments:
Post a Comment