ज्या माणसानं जात पात न मानता मांगाच्या पोरीची आब्रू वाचवण्यासाठी हातातील मेंढ्यांची काठी बाजूला फेकली आणि अन्याय करणाऱ्यांचा बिमोड करण्यासाठी धनगरांचे हत्यार असलेली कुऱ्हाड हातात घेऊन आया-बहिणींवर अत्याचार करणारे गावगुंड कापून काढले, अनेक सासुरवाशीण पोरींचे संसार उध्वस्त होण्यापासून वाचवले, वाळवा तालुक्यांतील अनेक गावं गावगुंड मुक्त केली त्याच क्रांतीपुरूषाने वाळवा तालुक्यांतील तसेच महाराष्ट्र राज्यातील अनेक गावांवरचे भितीचे सावट बाजूला केले. स्त्रीयांच्या इज्जतीवर हात घालणाऱ्या इतरांनाच काय स्वताच्या मुलाला देखिल गोळी घालून मारणारा स्त्री रक्षणकर्ता म्हणून आप्पांची ओळख आहे. आप्पांचे कार्य आप्पांचा त्याग हा स्वतासाठी नव्हता तर तो समाजासाठी होता म्हणून आप्पा समाजासाठी देव ठरले त्या देवमाणसाला काही नालायक पत्रकार गुंड म्हणत होते त्या पत्रकारांनी विचार करावा की गुंडांना मारणारा गुंड असतो की देव ते तुम्ही अनेक मराठी-हिंदी चित्रपट पाहून जसे तर्क वितर्क काढत असता मग आप्पांच्या बाबतीतच तुमची बुद्धी कुठे शेण खात होती का?
आप्पांना हयातीतच खरंतर समाजभूषण पुरस्कार द्यायला हवा होता पण झाले नाही परंतू आता मरणोत्तर पुरस्कार तरी द्यायला हवा यासाठी मुंबई नगरीत क्रांतीपुरूष महाराष्ट्राचा ढाण्या वाघ बापू बिरू वाटेगावकर उर्फ आमचे लाडके स्व. आप्पा यांची शोकसभा आयोजित करण्यात आली असून सर्व महाराष्ट्र वासीयांनी जात पात न मानता कृपया माणसातल्या या देवासाठी शोकसभेस हजेरी लावून आप्पांना आदरांजली वाहवी ही विनंती
👏👏👏👏👏👏👏👏👏👏
*वार.-मंगळवार.*
*दिनांक.-२०/०२/२०१८ वेळ-सायंकाळी ५.०० ते ८.५०*
*स्थळ.-*
*दामोदर हॉल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड,परळ, मुंबई.*
🙏महाराष्ट्र राज्य धनगर समाज🙏
No comments:
Post a Comment