खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्कार स्विकारताना पै कृष्णा (आप्पा) रासकर |
कडेगाव तालुक्यांतील पैलवानकी क्षेत्रात धनगर समाजातील रासकर कुटूंब हे एक नावाजलेले प्रसिद्ध असलेले कुटूंब आणि या कुटुंबाला स्व.पै.खाशाबा रासकर यांच्याकडून लाभलेला पैलवानकीचा वारसा आणि याच जोरावर सिनेसृष्टीला देखिल भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय खिलाडी कुस्तिपट्टू अर्थातच कुस्त्यांमधला जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पै.कृष्णा रासकर उर्फ आप्पा आणि पै.धनाजी रासकर यांचा पुतण्या व स्व.पै.खाशाबा रासकर यांचे नातू धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पै.संदीप रासकर यांना कडेगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक या पुरस्काराने दि.२४ सप्टेंबर २०१७ रोजी सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय पै.कृष्णा (आप्पा) रासकर यांचे सुपूत्र देखिल पै.वैभव रासकर हे कुमार महाराष्ट्र केसरी तसेच मुंबई कामगार केसरी चे मानकरी ठरले आहेत.
आंतरराष्ट्रीय कुस्तिपट्टू ज्यांना कुस्त्यांचा जादूगार म्हणून ओळखले जाते असे पै. कृष्णा रासकर उर्फ आमचे लाडके रासकर आप्पा यांना आज दि.२५ फेब्रुवारी २०१८ रोजी हुतात्मा अपंग बहुद्देशिय विकास कल्याणकारी संस्था कराड आयोजित कराड येथे तृतीय राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार २०१८” या पुरस्कार वितरण सोहळ्यात राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पै. कृष्णा (आप्पा) रासकर हे भारतीय सैन्यदलातील माजी नौसैनिक आहेत. नौदलात कार्यरत असताना पै. कृष्णा रासकर यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर तसेच राष्ट्रीय पातळीवर कुस्त्यांच्या स्पर्धांमध्ये एकुण ७ सुवर्ण पदक, ३ रौप्य पदक व २ कांस्य पदक मिळवली आहेत. एवढेच नव्हे तर सोलापूर येथील मिनीअलौंपिक स्पर्धा, बिहार मधील हिंद केसरी स्पर्धा तसेच दिल्ली येथिल राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गाजवली असून एका वर्षात त्यांनी ३ सुवर्ण पदक, १ रौप्य व १ कांस्य पदक मिळवली आहेत. रासकर आप्पा यांना पैलवानकीचा वारसा लाभला असून आज त्यांचे बंधू पै.धनंजय रासकर हे देखिल भारतीय नौसेना मध्ये राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय पातळीवरील पट्टीचे कुस्तीपट्टू आहेत. अशा प्रकारे रासकर कुटुंबाने केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे नाव उज्वल केले आहे त्यामुळे त्या परिवारातील सदस्य पै.कृष्णा (आप्पा) रासकर यांना लोकप्रिय खासदार मा.राजू शेट्टी याच्या हस्ते राज्यस्तरीय क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल आमचे लाडके आप्पा आदरणीय पै.कृष्णा रासकर यांना क्रिडारत्न पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे हर्दिक हर्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा।।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
Email :- nitsanuse123@gmail.com
nitinrajeanuse123.blogspot.com
Nice
ReplyDeleteThanks
Delete