समाजातील माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजबांधवांच्या भावना व सद्य परिस्थिति लक्ष्यात घेवून तसेच अनुभवातूनही माळरानावर आणि डोंगरदरीमध्ये वर्षानुवर्षे भटकंती करणार्या समाजबांधवांच्या भाषेत समाजातील सुशिक्षित शिकल्या सवरलेल्या सुज्ञ वर्गाला उद्देशुन रचलेलं हे काव्य आहे. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक युवकांपर्यंत हे काव्य पोहचावं आणि त्यातून समाजप्रबोधन व्हावं हीच अपेक्षा. कदाचित माझे काही चुकत असेल तर समाजातील एक छोटासा समाजसेवक म्हणून मला माफ करावे ही विनंती.
- नितीनराजे अनुसे
जिथं तिथं समाजाच्या नावावर घेऊनशान कोठा
खूप खूप शिकूनशान लय झाला रं तुम्ही मोठा
गडगंज पगार घेऊनशान जगताय तुम्ही आरामात
पण माझा भोळा समाज अजून माखतोय रं घामात
काय पाप केलं होतं रं या भोळ्या लोकांनी??
तुमचं कौतुक केलं रं समाजातल्या सगळ्यांनी
तुम्ही सगळीजण शिकूनशान गेला निघून तिकडं
आरं माघारी तर वळून बघा या माझ्या समाजाकडं
समाजातल्या नेत्यांनी फक्त वापरच करून घेतलाय
नुसतं "मत" नव्हं तर आमचा त्यांनी जीवच घेतलाय
निवडणूक जवळ येताच झोपडीत येवून हात जोडत्यातं
अन् निवडणूक झाली का पुन्हा पाच वर्सानंच दिसत्यातं
तुम्ही शिकलाय सवरलाय आता तुम्ही तर नीट वागा
कुणावर विस्वास ठेवायचा ते आता तुम्हीच सांगा
माझ्या समाजासाठी न्याय हक्क आतातरी मागा
नायतर आपल्या समाजाची अब्रू येशीवरच टांगा
बरं वाटतंय ना तुम्हाला असलं सगळं वाचायला??
समाजाचा पार तमाशा करून थायथाय नाचायला
अन्यायाविरोधात आवळा आता तलवारीच्या मुठा
लेकांनो खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा
खरंच धनगर असाल तर आताच पेटून उठा
जय मल्हार!! जय अहिल्या!!
-नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................
No comments:
Post a Comment