"धनगर" जमात ही आदिम काळापासूनची जमात असून आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक आणि राजकिय या क्षेत्रात अतिशय मागासलेली जमात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेत १९५० साली धनगर समाजाचा सामावेश अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वरती केलेला आहे. पण "धनगर" या शब्दाचा हिंदी शब्द प्रयोग "धनगड" असा झाल्याने प्रस्थापित व्यवस्थेने या समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळू दिल्या नाहीत. यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष स्व. बी के कोकरे साहेबांनी सातारा-पुणे हायवेवरती असलेल्या खंबाटकीच्या घाटात लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन तीव्र रास्तारोखो आंदोलन केल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांना दखल घ्यावी लागली पण धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात अशी मागणी असताना शरद पवारांनी माजी मंत्री स्व शिवाजी बापूंना हाताशी धरून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दावल्या. दुधाची तहान ताकावरती भागवण्याचं राजकारण पवारांनी केलं आणि धनगर समाजाला स्वतंत्र सुचि बनवून फक्त महाराष्ट्रापुरतं भटक्या जमाती (क) (एन.टी. क च्या) यादीत टाकलं. पण राज्यघटनेत दिल्याप्रमाणे आमच्या हक्काच्या केंद्र शासनाच्या अनुसुचित जमातीच्या सवलती धनगर समाजाला मिळू दिल्या नाहीत. त्यामुळे धनगर समाजातील हजारो मुलं-मुली आय ए एस / आय पी एस होण्यापासून वंचित राहिली इंजीनीयर, डॉक्टर, वकिल बणन्याऐवजी लाखो पोरं शेतीकडे वळली आणि शेळ्या-मेंढ्या राखू लागली . धनगर समाजासाठी येणारा दरवर्षीचा कोट्यवधी रुपयांचा निधी घशात घालायचं काम त्या प्रस्तापितांनी केलं असताना धनगर समाजितले लाचार नेते आणि माझा अज्ञानी असलेला धनगर समाज बांधव आजही त्यांच्या पाठीमागेच जातोय याचंच दुख वाटतंय.
आजही पवारांनी समाजातील दलालांना जवळ करून आरक्षणाचं गाजर दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे पण आदिवाशी समाजाच्या नेत्यांना विरोध करण्यास सांगून आदिवासी बांधव आणि धनगर समाजात भांडण लावायचा प्रकार शरद पवार करताहेत आजचा तरी धनगर समाजातील युवा वर्ग जागृत, सुशिक्षित आणि सुज्ञ असल्यामुळे शरद पवारांच्या बळीचा बकरा कोणी बनणार नाही हे मात्र निश्चित. धनगर समाजाला अनीसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी धनगर समाजातील बुद्धिजीवी वर्ग कायदेशीर लढा देण्यास सक्षम असतानाच रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी धनगर समाजातील युवा वर्ग पेटून उठला आहे. धनगर समाजातील सर्व संघटनेच्या सर्व पदाधिकार्यांनी एकत्रित येवून विचार विनीमय करून नागपूर विधानभवनेवरील जन आंदोलनाचा कोणतातरी एक दिवस निश्चित करावा. धनगर समाजातील नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाची दिशाभूल करणे, धनगर समाजाचं विभाजन करणे अथवा धनगर आरक्षणाचे श्रेय लाटण्याचे असले धंदे बंद करावेत. मला कोणत्या नेत्याच्या विरोधात बोलून स्वतावरती रोष ओढवून घ्यायचा नाही. पण आज धनगर समाज एकत्रित येत असताना जर त्यामध्ये विभाजन करून स्वताची पोळी भाजायचे तुमचे राजकारण असेल तर माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा अजिबात वापर करू नका. तुम्ही मिडीया विकत घ्याल पण आमच्याकडे सोशल मिडीया आहे त्यामाध्यमातून आम्ही जनजागृती करून समाजाला योग्य न्याय द्यायचा प्रयत्न करू. आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी समाजाचं पार वाटोळं केलं आहे पण इथूनपुढंही माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचं जर वाटोळं करायचं तुम्ही ठरवलं असेल तर मग आम्हाला तलवरी हातात घ्याव्या लागतील ही धमकी समजा नाहीतर चेतावणी.
धनगर समाजातील काही नेत्यांनी प्रस्तापितांसोबत विधानभवनावर मोर्चा काढायचं ठरवलंय पण त्यागोदर काही दिवसापुर्वी धनगर समाजातील काही संघटनांनी जन आंदोलनाचा दिवस निश्चित केला असताना धनगर समाजातील नेत्यांनी चुकीच्या पद्धतीने वागू नये. त्या त्या नेत्यांनी सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांशी चर्चा करावी. आजपर्यंत तुम्ही समाजासाठी काही चांगलं काम केलं असेल आणि समाजाचं वाटोळंही केलं असेल पण आता तुमची संधी संपली. चालायचं असेल तर समाजासोबत चला नाहीतर घरात बसून गप्प राहा पण माझ्या धनगर समाजात विभाजन करू नका. नाहीतर आम्ही पण शुरवीर लढवय्ये राजे यशवंतराव होळकरांचे वारसदार आहोत मग आम्हाला आमच्या औकातीवर यायला फार वेळ लागणार नाही. आजचा युवा वर्ग पेटला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे. आरक्षण मिळाल्यानंतर अनुसुचित जमातीच्या सवलतीमधून आमदार/खासदार बनण्यासाठी राजकारण करा पण आज आरक्षणाचं राजकारण करू नका. एकत्रित येवून लढा द्या.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
👉नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
👉+917666994123
👉nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
No comments:
Post a Comment