Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 11 December 2016

आपलेच दात आणि आपलेच ओठ

*आपलेच दात आणि आपलेच ओठ*
हजारो वर्षापेक्षाही अधिक काळ फक्त हिंदुस्थानवर नव्हे तर आशिया खंडावर देखिल प्रभुत्व गाजवलेल्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेले आम्ही त्यांचे भाग्यशाली वारसदार... ना फक्त संस्थानासाठी तर अखंड स्वराज्यासाठी तर कधी या राष्ट्रासाठी अक्षरशा छातीची ढाल आणि मनगटाची तलवार करून पाण्यासारखं रक्त रणांगणात सांडून बलिदान देणाऱ्या शुरवीरांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी, एकेकाळी राजा समाज म्हणून थाटात जगणारे आम्ही आज कोणते जगणे जगतोय याचा साधा विचार जरी केला तरी स्वताचीच स्वताला लाज वाटू लागते. मग ही वेळ आली कोणामुळे?? कशामुळे?? आणि का?? याला नक्की जबाबदार कोण?? असे एक ना अनेक प्रश्न मनांत थैमान घालून बसतात तेव्हा ओठांतून नकळतच शब्द फुटतात की या सर्व गोष्टींना माझाच धनगर समाज कारणीभूत आहे, जबाबदार आहे. म्हणूनच सदरचा ब्लाॅग लिहताना *आपलेच दात आणि आपलेच ओठ* हा आशय उचित ठरतो असे माझे वैयक्तिक मत आहे.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाज ज्या सवलतींपासून वंचित आहे त्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी या मागणीसरशी आजपर्यंत कितीतरी एक ना अनेक मोर्चे माझ्या धनगर समाजाच्या वतीने तहसिल कार्यालय, प्रांत/जिल्हाधिकारी कार्यालय, विधानभवन/ संसदभवन अशा ठिकाणी झाले.  पण एवढे सगळे करूनही आम्हा धनगर समाजाच्या वाट्याला काय आलं ?? नोकरदार वर्गातील माझ्या युवकमित्रांनी, समाजबांधवांनी रजा टाकून खाडे करून मोर्चांना हजेरी लावल्या तर दिवसरात्र पायाच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणाऱ्या माझ्या वडिलधाऱ्यांनी शेळ्या-मेंढ्यांना  कोंढवाड्यात कोंढून मार्चांना हजेरी लावली त्याचे काय फलित झाले?? दिवसभर ती मुकी जणावरं अन्नपाण्याशिवाय राहीली हेच का त्या मोर्चाचे फलित?? का नोकरीवरती खाडे/रजा टाकल्याने महिन्याखीरी मिळालेला कमी पगार हे त्याचे फलित?? या गोष्टींचा विचार मोर्च्याचे आयोजन करणाऱ्या धनगर समाजातील नेत्यांनी कधी केला होता की नाही कोणास ठाऊक म्हनूनच परवाच्या नागपूर येथील मशाल मोर्चात धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा चा प्रत्यय आला. मला कोणाबद्दल वाइट बोलायचे नाही पण झाला प्रकार तो समाजाला काळीमा फासण्यासारखाच होता. त्याचे कारण असे की ज्या धनगर समाजाने लाखोच्या संख्येने बारामतीसारख्या ठिकाणी एकत्रित येऊन अख्ख्या महाराष्ट्रासमोर आदर्श ठेवला त्यानंतर उत्तरप्रदेश मद्येही याच धर्तीवर मोर्चे निघाले मग महाराष्ट्र राज्यात अनेक मुक मोर्चे निघाले, क्रांती मोर्चे निघाले, ॲट्राॅसिटी बचाव मोर्चे निघाले ते धनगर समाजाने काढलेल्या मोर्चाचा आदर्श ठेऊनच. कारण धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती आरक्षण दींडी यात्रा काढून शांततेच्या मार्गाने ते आंदोलन केले होते तेव्हा पाच ते सहा लाख धनगर समाजबांधव  बारामतीत एकत्रित आला होता पण जर त्या आंदोलनाला वेगळे वळण लागले असते तर आज बारामतीची अवस्था काय झाली असती महाराष्ट्र राज्याची अवस्था काय झाली असती याचा विचार तुम्हीच करायला हवा. पण ज्या धनगर समाजाने आपला आदर्श अख्ख्या महाराष्ट्र राज्यासमोर नव्हे तर अखंड भारत देशासमोर ठेवला त्याच धनगर समाजाच्या मोर्चातून नागपूर सारख्या ठिकाणी माझ्याच धनगर समाजाचे असे धिंदोडे निघावेत हे माझ्यासारख्या सर्वसामान्य समाजबांधवांना अपेक्षित नव्हते.
*खरंतर धनगर समाज पेटून उठला तर उभा महाराष्ट्र पेटवायला फार उशीर लागणार नाही.* अन्यायाच्या विरोधात आम्हालाही लढतां येते, आमच्याही भावनांचे बांध फुटतात, आम्हालाही अन्याय सहन होत नाही त्याचे कारण ही तसेच आहे ज्यांचे रक्त आमच्या नसानसातून सळसळ सळसळ सळसळतंय ते महाराजा यशवंतराव होळकर पुण्याला आले असता पेशव्यांच्या व शिंद्यांच्या कटकारस्थानमुळे पुण्याची काय अवस्था झाली होती?? हडपसर पासून वानवडी आणि पर्वतीच्या पायथ्यापर्यंत पुण्याची दशा न पाहण्याजोगी का झाली होती?? व ज्याला आपण पळपुटा बाजीराव म्हणतो ते पेशवे कोकणात का पळून गेले?? याचा जर रक्तरंजित आणि ज्वलंत इतिहास अभ्यासला तर आजचा धनगर समाज आपल्या औकातीवर आल्यावर काय करू शकतो आणि काय नाही याची भविष्यवाणी करायची गरजही पडणार नाही. पण कोणीतरी म्हंटलंय की खरे शत्रू हे परकीयांमद्ये नसतात तर ते आपल्यातच असतात मग एकवेळ शत्रुंशी लढताना काहीच वाटत नाही पण आपल्याच माणसाशी लढताना फार जड जाते उदा.महाभारतातील कौरवांच्या विरोधात लढताना अर्जूनाची जी अवस्था झाली होती तशीच अवस्था माझ्याच धनगर समाजाची झाली आहे. जिकडेतिकजे आपलेच दिसताहेत मग लढायचं कोणाच्या विरोधात? आपल्यातलेच नेते एकमेकांच्या विरोधात लढायला उभे ठाकलेत. कुठल्यातरी पक्षासाठी, पक्षश्रेष्ठींची धोतरं सांभाळण्यासाठी धनगर समाजाचे भांडवलीकरून, समाजाला त्या लांडग्यांच्या दावणीला बांधून समाजाची दलाली उचलेगिरी करून एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांची जिरवाजिरवी करायचे सर्वत्र चालू आहे आणि जोपर्यंत हे चालू आहे तोपर्यंत तरी माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाचा विकास होऊ शकत नाही. धनगर समाजाने ज्या नेत्यांवर विश्वास टाकला आहे त्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या विश्वासाला धनगर समाजाचे नेते पात्र नाहीत अशी समाजबांधवांची भावना झाली आहे त्यामुळे भविष्यात लोकप्रतिनीधी अडचणीत येऊ शकतात. ज्यांना समाजाने जनतेने विधानसभेत पाठवले, ज्यांना विधानपरिषदा मिळाल्या मंत्रीपदं मिळाली ते माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजामुळेच मिळाले आहे कारण या समाजात जन्माला आला ते तुमचे भाग्य समजा. त्यातल्या ठराविकजणांचा विषय सोडला तर बाकीच्यांनी विधानभवनात, विधानपरिषदेत कधी आरक्षण संदर्भात साधा 'ब्र' देखिल काढला नाही. कितीतरी उन्हाळी पावसाळी हिवाळी अधिवेशने झाली पण भाजप सरकार स्थापण झाल्यानंतर सुरवातीचा काळ सोडला तर नंतर धनगर आरक्षणाचा मुद्दा थंडच होत गेला. त्यामुळे साहजिकच धनगर समाजाच्या आमदार/खासदार तसेच मंत्री यांच्यावर धनगर समाजाचा रोष असणार पण आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी अवस्था असल्याने आपल्याच दाताने आपले ओठ चावले तर त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो आणि होणारही आहे त्यामुळे आता धनगर समाजातील नेत्यांनी देखिल नुसती आश्वासने देत बसू नये कारण *We are not believe in your statement but now we believe only in implementation regarding our reservation.* आम्ही तुमच्या आश्वासनांवर आता विश्वास ठेवणार नाही तर जे राज्यघटनेत आमच्या हक्काचे अनुसुचित जमातीचे आरक्षण आहे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी यासाठी धनगर समाजातील नेत्यांनी उर्जा खर्च करावी पण एकमेकांची जिरवाजिरवी करण्यासाठी नव्हे. मग ते आजी माजी आमदार/खासदार असोत, मंत्री संत्री असोत अथवा माझ्या भोळ्या-भाबड्या समाजाचे भांडवलीकरण करून प्रस्थापितांची धोतरं सांभाळणारे नेते असोत त्यांना एक विनंती आहे की बाबांनो तुमच्या स्वार्थासाठी माझ्या समाजाचं भांडवलीकरण करून माझ्या समाजाचे वाटोळे करू नका व माझ्या समाजाची इभ्रत वेशीवर टांगायचा प्रकार करू नका.
*जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे*
            *नितीनराजे अनुसे*
*अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली*
          *+९१७६६६९९४१२३*
*nitinrajeanuse.blogspot.com*

2 comments:

  1. Thanks i watching that our people are strong by mind but weak by integrity.

    ReplyDelete
  2. Thanks i watching that our people are strong by mind but weak by integrity.

    ReplyDelete