स्वार्थाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतभूमित सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी निस्वार्थीपणाने झटणाऱ्या व झगडणाऱ्यांची संख्या तशी बोटावर मोजण्याइतपतच आहे त्यातीलच एकमेव जिवंत उदाहरण म्हणजे सर्वसामान्याचा नेता, रणझुंजार जिगरबाज लढवय्या, पडळकरवाडी गावचे सुपुत्र, महाराष्ट्र राज्याची मुलूख मैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर. एकच ध्यास, जनतेचा विकास या ध्येयाने पछाडलेलं एक उमदं नेतृत्व म्हणून अख्ख्या महाराष्ट्र राज्याचं लक्ष वेधून घेणारा धडाडीचा तरून, नुसतंच धडाकेबाज वक्तृत्व नव्हे तर सोबतच निडर नेतृत्व अंगिकारलेला एक सर्वसामान्य कुटूंबातील जन्माला आलेला तळपता सुर्य, ज्याप्रमाणे सुर्याची किरणे सभोवताली पडतात व त्याच्या लख्ख प्रकाशाने सर्व सृष्टी प्रकाशमय होऊन जाते व अंधार नष्ट होतो त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेच्या हीताचे काम करून जनतेच्या मनात स्वताची एक वेगळीच ओळख करणारा हा तरून तडफदार युवक, जनतेच्या मनामनात असलेला आमदार/खासदार/मंत्री म्हणजेच सर्वसामान्यांचा रांगडा नेता मा.गोपीचंद पडळकर साहेब होय.
खरंतर सांगायची वस्तुस्थिती अशी की सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यातील आटपाडी तालुकास्थित मौजे झरे या गावाला पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. असे असताना या गावाला टेंभू योजना असलेल्या कृष्णा-कोयना नदीचे (टेंभूचे) पाणी मिळावे म्हणून अल्पसा सरकारी निधी मिळाला होता पण त्या निधीतून पूर्ण काम झाले नव्हते तर ते अर्धवट झाले होते. कोट्यावधी रूपयांचा निधी येऊनदेखिल प्रस्तापित व्यवस्थेने जाणिवपुर्वक लक्ष दिले नसल्याने या गावावरच नव्हे तर अख्ख्या तालुक्यावर संकट ओढवले होते. पुढील उर्वरित कॅनाॅलचे अर्धे काम रखडल्याने या झरे गावाला पाण्यावाचून वणवण करावी लागत होती, रणरणत्या भर उन्हात पायपीट करून झरे गावातील जनतेला पाण्याची व्यवस्था करावी लागत असे तेव्हा झरे गावाजवळील पडळकरवाडी या गावचे सुपुत्र महाराष्ट्र राज्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत म्हणून ज्यांची महाराष्ट्र राज्यभर ख्याति अाहे अशी महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद(शेठ) पडळकर हे झरे या गावासाठी देवासारखे धावून आले व त्यांनी रखडलेले टेंभूच्या कॅनाॅलचे उर्वरित काम स्वखर्चाने लवकरात लवकर पुर्ण केले तेव्हा टेंभू योजनेचे पाणी झरे गावच्या ओढ्या-ओघळीने वाहायला लागले, तलाव तुडूंब भरून वाहू लागले एवढेच नव्हे तर त्या पाण्यानं फक्त झरे गावाचीच नव्हे तर आसपासच्या गावांची देखिल तहान भागली, हजारो एकर शेतजमिनी ओलिताखाली आल्या, मुकी जणावरं, पशू-पक्षी देखिल पाणी पिऊन तृप्त झाली. म्हणून रविवार दि.११ डिंसेबर २०१६ रोजी झरे ग्रामपंचायत झरे ता.आटपाडी जि.सांगली व दलित महासंघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने जनतेच्या हीतासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या दोन्ही पडळकर बंधूंचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळेस झरे ग्रामपंचायत, दलित महासंघ महाराष्ट्र राज्यचे सर्व पदाधिकारी, आटपाडी तालुक्याचे नेते मा.प्रभाकर पुजारी साहेब, सांगली जिल्हा सोशल मिडीया प्रमुख मा.जयवंत सरगर साहेब, मा.प्रा.विजय वाघमारे (राज्य उपाद्यक्ष दलित महासंघ), आटपाडी तालुका मार्केट कमिटीचे डायरेक्टर मा.विष्णूपंत अर्जून साहेब, मा.राजू(भाऊ) अर्जून, मा.उमेशराजे अनुसे, मा.बिनू (भाऊ) वाघमारे तसेच अनेक मान्यवर युवकसम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्या भव्य नागरी सत्कारासी उपस्थित होते.
पाठीमागे काही महिन्यापूर्वीच पडळकर साहेबांनी आटपाडी तालुक्याला मुख्यमंत्र्यांकडून एमआयडीसी मंजूर करून आणली त्याचा लाभ माणदेशातील प्रत्येक घटकाला होणार असून मुंबई-पुणे सारख्या शहरांकडे स्थलांतर करून हमाली करणाऱ्या युवकांना युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी नवसंजीवनीच मिळवून दिली. अशाप्रकारे माणुसकी हरवलेल्या या जगात माणुसकी जपणारी माणसं फार दुर्मिळ आहेत आणि ती माणुसकी युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व त्यांचे बंधू मा.श्री.ब्रह्मानंद पडळकर साहेब यांनी जपली, तहानेने व्याकुळलेल्या नुसत्या झरे या गावाची नव्हे तर आसपासच्या गावाची, शेतजमिनीची, मुकी जणावरं, पशू-पक्षी तसेच पाण्यावाचून कोमेजलेल्या, वाळून चाललेल्या वृक्ष-वल्लींची तहान भागवून आदर्श प्रशासनकर्ती आदर्श राज्यकर्ती म्हणून जिचा गौरव अख्ख्या जगाने केला त्या राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा जपण्याचे काम कृतीतून करून दाखवले आणि अहिल्याईंचा वारसा जपणाऱ्यांपैकी तरून तडफदार युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब व मा.श्री.ब्रह्मानंद (शेठ) पडळकर यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाचे नाव समोर येते त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तेवढे कमीच... काहीजणांना वाटले असेल की आता पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणूका आल्यामुळे ही सर्व खटाटोप चालली आहे पण तसे काही नाही तर या गावाला टेंभूचे पाणी पुरवण्यामागे या दोन्ही बंधूंचा शुद्ध हेतू होता तो म्हणजे निस्वार्थीपणाने व माणुसकीच्या नात्यानं या तहानेलेल्या गावाची, मुक्या जणावरांची, पशू-पक्षी-वृक्ष-वल्ली यांची तहान भागवणे बस्स एवढंच बाकी काही नाही.
म्हणून अशा या निस्वार्थीपणाने झटणाऱ्या झगडणाऱ्या विकासाच्या महामेरूंना अर्थातच दुष्काळात वाहणाऱ्या या निर्मळ झऱ्यांना माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांच्या व तमाम जनतेच्यावतीने कोटी कोटी सलाम व मानाचा जय मल्हार. राष्ट्रामाता अहिल्याईंनी देखिल सांगितले आहे की लोकांची अंधारात केलेली कामे उजेडात येतात पण आमच्या माणसांनी उजेडात केलेली कामे ही प्रस्तापित व्यवस्थेकडून, विकाऊ आणि जातीयवादाने बरबटलेल्या प्रिंट तथा इलेक्ट्रॉनिक मिडीयाकडून ती कामे जास्तच अंधारात ढकलली जातात हे वास्तव सत्य आहे म्हणून आमच्या माणसांनी केलेली कामे उजेडात यावी यासाठी केलेला हा लेखप्रपंच आहे.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
📱+918530004123
nitinrajeanuse123.blogspot.com
No comments:
Post a Comment