आदिवासी धनगर समाजाची साहित्य पंढरी
ज्या धनगर समाजाने सर्वप्रथम ५००० वर्षांपूर्वी अक्षरांचा शोध लावला तीच अक्षरे आज धनगर समाजापासून कोसों दूर गेली ती आता पहिल्या आदीवासी धनगर समाज साहित्यसम्मेलनाच्या माध्यमातून सर्वांसमोर येणार त्याबद्दल सर्वप्रथमता मी त्या सर्वांचे अभिंनदन करतो व आभार मानतो ज्यांनी दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापूर येथे होणाऱ्या धनगर समाजाच्या पहिल्या साहित्यसम्मेलनाचे आयोजन केले. साहित्यसम्मेलनाचे संस्थापक अध्यक्ष मा.डाॅ.अभिमन्यू टकले, साहित्यकार मा.अमोल पांढरे साहेब,मा.जयसिंगतात्या शेंडगे तसेच आदीवासी धनगर साहित्यसम्मेलनची सर्व टीम ज्यांनी ज्यांनी पुढाकार घेऊन या ऐतिहासिक सोहळ्याचे आयोजन केले त्या सर्वांचे समाजातील एक छोटासा व नवखा लेखक या नात्यानं अभिनंदन करून आभार मानतो. आजपर्यंत आम्ही अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन, ओबीसी साहित्य सम्मेलन, दलित साहित्य सम्मेलन, मुस्लिम साहित्य सम्मेलन आमुक सम्मेलन तमूक सम्मेलन असेच ऐकत आलो होतो पण धनगर समाजाचे कधी साहित्यसम्मेलन झाले का?? समाजाच्या किती साहित्यिकांना सम्मेलनात मानाचं स्थान होतं?? धनगर समाजात असे कितीतरी साहित्यिकार जन्माला आले असताना त्याचे कधीच मोजमाप झाले नाही अर्थातच धनगर समाजाच्या साहित्याला आणि साहित्यकारांना आजपर्यंत दुजाभाव देण्यात आला ही खरंतर दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. धनगर समाजाचे साहित्य अफाट फार अफाट आहे पण ते कलागुणांच्या माद्यमातूनच पाहायला मिळते त्याचे ऐच्छिक असे साहित्य म्हणावे इतका नाही. आजपर्यंत धनगर समाजाच्या इतिहासावरती, धनगर समाजाच्या जीवनमानावरती, भटकंतीवरती अनेकांनी साहित्य निर्माण केले, चित्रपट काढले पण त्या साहित्याचा माझ्या धनगर समाजाला काही फायदा झाला का?? का नुसतंच धनगर समाजावरती साहित्य लिहून समाजाची सहानुभुती मिळवली पण त्या धनगर समाजाच्या अफाट साहित्याचे जतन करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी त्याबाबतीत कोणतीच ठोस पाऊले उचलली गेली नाहीत याचा अर्थ स्पष्ट असा होतो की धनगर समाजाची जी लोकपरंपरा आहे, जी संस्कृती आहे ती कुठेतरी संपुष्टात आणण्याचे कुटील कारस्थान हे जातीयवादी साहित्यकारांकडून आणि प्रस्थापित व्यवस्थेकडून होत असल्याचेच दिसून येते एवढंच काय तर धनगर समाजाचा इतिहास सुद्धा चुकीचा लिहून तो विकृत करण्याचे षड्यंत्र असल्याचे स्पष्ट होते आहे. याचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि हे कुठेतरी थांबायला हवे त्यासाठी धनगर समाजाची संस्कृती, परंपरा, समाजाचे परंपरागत आदीवासी जीवनमान, धनगर समाजाची लोककला, भटकंती, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय दुरावस्था हे सर्वच साहित्याच्या माद्यमातून जगाच्या समोर यायला हवे आणि त्या सर्वांचे जतन व संवर्धन व्हायला हवे यासाठी आयोजकांनी सोलापूर येथे दि.७ व ८ जानेवारी रोजी पहिले धनगर आदीवासी साहित्य सम्मेलन आयोजित केले असून धनगर समाजातील जेष्ठ साहित्यकारांना तसेच नवख्या साहित्यकारांना मानाचं स्थान आणि स्वतंत्र व्यासपीठ लाभणार असून त्या दोन दिवशीय साहित्य सम्मेलनासाठी धनगर समाजातील विचारवंत, कवी, लेखक, व्याख्याते, इतिहासकार, ओवीकार, धनगर गजी-ढोल नृत्यकार, धनगर समाजाच्या प्रश्नांचे अभ्यासक तसेच धनगर समाजबांधव या सर्वांनी शनिवार व रविवार दि.७ व ८ जानेवारी २०१७ रोजी सोलापुर येथे उपस्थित राहून पहिल्या धनगर साहित्य सम्मेलनाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
आपलाच एक समाजबांधव
✍️️नितीनराजे अनुसे✍️️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment