Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 26 December 2016

मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे

*मातोश्रींसाठी धावले अहिल्याईंचे मावळे*
दि.२५ डिसेंबर २०१६
काल रात्री दि.२४ डिसेंबर २०१६ रोजी "आम्ही छत्रपती" या व्हाटसप च्या ग्रुपमद्ये चर्चा करत असताना सामाजिक कार्यकर्ते मा.गजानन (भाऊ) ठोंबरे यांनी फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील मेन चौकातच बेवारस अवस्थेत व धूळ पडलेल्या मातोश्रींच्या अर्थातच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या पुतळ्याबद्दल चर्चा केली व समाजाबद्दल खंत व्यक्त केली की ज्या *राष्ट्रमाता अहिल्याईंनी स्वताची संपत्ती खर्ची घालून लोकोपयोगी कामे केली, धरणे बांधली, बंधारे, बारवे, तलाव, विहरी, नदीवरती घाट, वाटसरूंसाठी आश्रमशाळा, उपहारगृह, बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्नोद्धार, खाजगीतला निधी वापरून जनतेची, गोरगरीबांची विकासकामे केली, शेतकऱ्यांसाठी शेततळे, कणसांनी भरलेली शेती पशू-पक्षासांठी खुली करून त्यांची भूक भागवली एवढेच नव्हे तर पाण्यातील जीवांना देखिल नियमितपणे खाद्य टाकून त्यांची भूक भागवणारी लोकजननी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याई होळकर*. जगासमोर एक आदर्श राज्यकर्ती आणि आदर्श प्रशासनकर्ती स्त्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायमाऊलीचा, लोकजननीचा पुतळा असा धूळ खात आणि पडझड झालेल्या अवस्थेत पडत असेल तर तो माझ्या धनगर समाजाला लागलेला एक कलंक आहे आणि यावरून आपण कसे काय म्हणू शकतो की माझा धनगर समाज जागा झाला आहे ?? त्यापेक्षा मेलेला बरा असे गजानन (भाऊ) ठोंबरे यांच्याप्रमाणेच मलाही वाटते. ग्रुपमद्ये अशी चर्चा झाल्यानंतर त्याच मद्यरात्री मी लगेच पश्चिम महाराष्ट्रातील यशवंत युवा सेनेचे सक्रीय समाजसेवक माळशिरसचे सुपुत्र मा.सचिन शेंडगे साहेब यांच्याशी संपर्क साधून चर्चा केली व फोंडशिरस येथील राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाबद्दल त्यांना सांगितले त्यानंतर स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेबांशी मी या सदर घटनेबाबत चर्चा केल्यानंतर *मद्यरात्रीच लातूर वरून यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेब व सांगली जिल्हा संपर्क प्रमुख मा.राजू वाघमोडे साहेब माळशिरस च्या दिशेने मार्गक्रमण झाले* सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब यांनीही लगेच मद्यरात्रीच सर्व यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांशी फोनवरती संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली असता आज दि.२५ डिसेंबर २०१६ रोजी दुपारी बारा वाजता यशवंत युवा सेनेचे सर्व पदाधिकारी हे यशवंत युवा सेना प्रमुखांच्या अद्यक्षतेखाली फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापुर येथे एकत्रित आले तेव्हा तेथिल स्थानिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच मोंडशिरस गावातील समाजबांधव सुद्धा तेथे उपस्थित होते तेव्हा तेथील स्मारकाची पाहणी केल्यानंतर यशवंत युवा सेना प्रमुख मा.कोकरे साहेबांनी खंत व्यक्त केली की ज्या मातेने प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे जपून जनहिताची कामे केली त्याच मायमाऊलीच्या पुतळ्याची अशी बिकट अवस्था होत असेल तर आम्हाला अहिल्याईंचे वारसदार म्हणून जगण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांच्या राज्यकारभाराचा आणि प्रशासन व्यवस्थेचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला असून त्याआधारावरती इतर देश प्रगतीपथावर पोहचत असताना ज्या मातीत अहिल्याई जन्माला आल्या त्याच भारताच्या परिणामी महाराष्ट्र राज्याच्या मातीत अहिल्याईंचे विचार ज्यांच्या डोक्यात बसत नाहीत तर ती डोकी काय कामाची? असे मला वाटते. त्या मायमाऊलीच्या, राष्ट्रमातेच्या पुतळ्याची ही अवस्था पाहिली तर जिथे असतील तिंथे खुद्द राष्ट्रामाता अहिल्याईंना देखिल लाज वाटत असेल की अरे कोणत्या समाजात जन्म घेतला म्हणून...??
स्व.बी.के.कोकरे साहेबांचे वारसदार तथा यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते मा.सचिन शेंडगे साहेब, माळशिरस तालुका यशवंत युवा सेना प्रमुख मा.आबासाहेब बगाडे, माळशिरस तालुका संपर्क प्रमुख मा.सचिन मोटे, तालुका  विद्यार्थी आघाडी प्रमुख मा.रणजीत शेंडगे तसेच *फोंडशिरस गावचे सामाजिक कार्यकर्ते मा.भिसे साहेब, मा.पांडूरंग शेंडगे तसेच गावातील समाजबांधव या सर्वांनी मिळून तेथिल सुशोभिकरणासाठी उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला व राष्ट्रमाता अहिल्याईंच्या स्मारकाच्या कटड्याच्या झालेल्या पडझडीबाबत पुढील दोन दिवसात निर्णय घेऊन त्याचा कायापालट करून सुशोभिकरण करणार* असल्याचे अहिल्याईंच्या स्मारकास हार अर्पण करणाऱ्या मा.भिसे साहेब व मा.पांडूरंग शेंडगे यांनी यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांना  सांगितले. त्यादरम्यान माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेची बैठक देखिल पार पडली व महाराष्ट्र राज्यातील अशा अनेक बेवारस स्थितीत पडलेल्या पुतळ्यांची माहिती मिळवून तेथील सुशोभिकरणासाठी यशवंत युवा सेना कटीबद्द असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले त्यावरती माळशिरस तालुका यशवंत युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच फोंडशिरस ता.माळशिरस जि.सोलापूर येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी संमती दर्शवली.
*यशवंत युवा सेना मद्ये काम कराणारा प्रत्येक कार्यकर्ता हा कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करून नव्हे तर  स्वताच्या खिशातील पैसा खर्च करून निस्वार्थीपणे समाजासाठी झटत असतो आणि झगडत असतो* समाजाचा सर्वांगीण विकास करून समाजाला प्रगतीपथावर घेऊन जाणे हेच एकमेव उद्दीष्ट डोळ्यांसमोर ठेवून तो यशवंत सैनिक कार्य करत असतो मग त्यापाठीमागे कोणतेही राजकारण, समाजकारण अथवा अर्थकारण नसते तर असती ती फक्त सामाजिक बांधिलकी व जबाबदारी आणि *यशवंत युवा सेनेचे कार्यकर्ते हे सामाजिक बांधिलकीसाठी पात्र आहेत कारण ते सर्व गुण यशवंत युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमद्ये आहेत* असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. काही उलट्या खोपडीचे भावनेच्या आवेगाने (इतरांनी शिकवल्याने) विचार न करताच लिहून जातात की राजकीय नेत्यांची दलाली करणाऱ्यांनी खोटे समाजप्रेम दाखवू नये कारण ते समाजकारण, राजकारण जास्त काळ टिकत नाही पण यांत दलाली तर कुठेच दिसून येत नाही उलट महाराष्ट्र राज्यात एकमेव "यशवंत युवा सेना" अशी संघटना आहे की ती समाजकारण अथवा राजकारण करत नाही तर ही संघटना स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारधारेवर चालते ती कोणत्याही राजकीय नेत्यांची दलाली करत नाही आणि करणारही नाही तर उलट *आपल्याच धनगर समाजातील नेत्यांचे नेतृत्व बळकट करण्यासाठी "यशवंत युवा सेना" संघर्ष करते आहे आणि आपल्याच धनगर नेत्यांना आपण मानसन्मान देऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करत आहे मग तो नेता कोणत्याही पक्षाचा असो.* तसेच आपल्या धनगर समाजातून अनेक नवनविन नेतृत्व घडविण्यासाठी आणि ते बळकट करून विधानभवनात आणि संसदेत आमदार/खासदार यांचा टक्का कसा वाढवतां येईल यादृष्टीने "यशवंत युवा सेना" कार्य करत आहे. त्याचप्रमाणे आता येऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर जास्तीत जास्त धनगर समाजाचे उमेद्वार निवडून देता येतील यासाठी यशवंत युवा सेना प्रयत्नशील असून त्यातूनच समाजाचे प्रश्न सोडवता येतात आणि *यशवंत युवा सेनेने पिवळा भंडारा उधळून जे सामाजिक कार्य हाती घेतले आहे त्यासाठी अखंड अविरतपणे संघर्ष करून समाजाचे प्रश्न सोडवणार आहे* त्यामुळे उलट्या खोपडीच्यांनी त्यांची उर्जा व्यर्थपणे खर्च न करता यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून समाजकार्यासाठी हातभार लावावा ही विनंती.
जय मल्हार जय अहिल्या जय यशवंतराजे
     *✍️️नितीनराजे अनुसे✍️️*
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
      📱+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment