Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Sunday, 11 December 2016

समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा

मराठी वांङमय साम्राजावर अधिराज गाजवलेले विख्यात कवि वि.वा. शिरवाडकर उर्फ "कुसूमाग्रज" यांच्या "कणा" काव्यातून प्रेरित होऊन प्रस्थापित यंत्रणेकडून समाजावरती झालेल्या अन्यायाची खंत व्यक्त करताना मला सुचलेल्या काही सुंदर ओळी आणि त्यातूनच समाजप्रबोधन व्हावं हीच प्रामाणिकपणे अपेक्षा...
                -नितीनराजे अनुसे.

ओळखलंत का समाजबांधवांनो मी मोठा नाही कोणी,
तुमच्यातीलच मी सर्वसामान्य गातो महापुरूषांची गाणी.

विचार करत बसलो होतो आजची ही दशा पाहून,
समाजास दिशा द्यावी म्हणतोय बघुया प्रयत्न तरी करुन.

एकाच रक्ताच्या औलादींनी एवढे अत्याचार कसे केले??
अहो आशा दाखवून समाजाला अतोनात लुटले गेले.

विचार नासलेत प्रयत्नही फसलेत प्रस्थापितांच्या नादी लागून,
आमचेच हक्क कसे मिळतील हो प्रस्थापितांकडेच भिक मागून.??

प्रस्थापितांच्या दावणीला जावून समाजाची पार बरबादी झाली,
सुचलं थोडसं शहाणपण म्हणून आमची आजची ही पीढी सावरली.

बुद्धिजीवी वर्गासंगे बांधवांनो अन्यायाच्या विरोधात लढतो आहे,
विस्कटलेल्या समाजाला एकत्रित करून माणसं जोडतो आहे.

वैयक्तिक प्रसिद्दीसाठी नव्हे तर हक्कासाठी मी लढतो आहे,
वैचारिकतेची लढाई लढून समाजासाठी झगडतो आहे.

कपाळी भंडारा लेवून आता नव्या जोमाने लढतोय पुनः
पाठीवरती हात ठेवून समाजबांधवांनो फक्त लढ म्हणा.

       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

No comments:

Post a Comment