देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटून गेली पण या देशांतल्या आयुष्यभर भटकंती करणाऱ्या धनगर समाजाला राज्यघटनेने दिलेले अधिकार अजूनही मिळाले नाहीत हे भारत देशाचे खरंतर दुर्दैवच म्हणावे लागेल. राज्यघटनेत अनुसुचित जमातीच्या ३४२ व्या कलमातील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अनु क्रमांक ३६ वरती ओराॅन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे परंतू केवळ शब्दच्छल झाल्याने "र" चा "ड" अर्थातच "धनगर" चा "धनगड" झाला आणि महाराष्ट्र राज्यातील संख्येने दोन कोटी असलेल्या धनगर समाजावर अन्यायाची कुऱ्हाड कोसळून पार मानगुटीमध्ये घुसली ती आजपर्यंत धनगर समाजाच्या मानगुटीतून बाहेर आलीच नाही. अहो येईलच कशी? वक्रतुंडाची कृपाच अशी की ती कुऱ्हाड बाहेर काढण्याऐवजी अजून ती खोलवर घुसवण्याचा प्रकार स्वताला जाणते राजे म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी केला. एकीकडून आम्ही धनगर समाजाला आरक्षण द्यायला तयार आहोत असे म्हणायचे आणि उलट सुलट अहवाल सादर करून धनगर ऐवजी धनगड या शब्दाची खुंटी मारून ठेवायचा प्रकार पवारांनीच केला. म्हणूनच धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या विधानसभा निवडणूकांत घरी बसवले पण आजा मेला अन् नातू झाला, घरात माणसं तेवढीच या म्हणीप्रमाणे भ्रष्टवादी असलेले पवारांचे राष्ट्रद्रोही सरकार सपशेल पडले आणि नपुंसक असलेले भट जात सरकार सत्तेवर आले. पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो म्हणनाऱ्यांनी सतरा कॅबिनेट झाल्या तरी तीन वर्षात अजून आरक्षणाबद्दल ब्र देखिल काढला नाही. धनगर समाजाने ज्या ज्या वेळी आरक्षणाचा जाब विचारला त्या त्या वेळी अभ्यास करतोय असेच उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले.
अरे पण अभ्यास कधीपर्यंत करायचा असतो? जर पोरगंच नालायक असेल, शाळा न शिकणारे आणि अभ्यास करणारे नसेल तर बाप त्याला शाळेतून काढून टाकतो दोन चार म्हैसी-गाई घेऊन त्याला बरोबर कामाला जुंपतो. फडणवीस सरकारची पण आता तीच वेळ आली आहे तुमचा बाप धनगर समाज आहे तुम्ही अभ्यास करण्याच्या लायकीचे नाहीत त्यामुळे २०१९ च्या विधानसभेमध्ये प्रवेश घेऊ देणार नाही, तुम्हाला घरी बसवून मेंढ्याच वळायला ठेवतो ते बघा...
धनगर समाज काय आरक्षणाची भीक मागत नाही तर
1. अगोदर दिलेले राज्यघटनेत असलेले अनुसुचित जमातीच्या कलम ३४२ वरील महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अनुक्रमांक ३६ वरील ओराॅन, धनगर हक्काचे आरक्षण मागत आहे.
2. धनगर समाज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची मागणी अजिबात करत नाही. तर राज्यघटनेतील दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी धनगर समाजाची रास्त मागणी आहे.
3. धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये आरक्षण द्या अशाप्रकारच्या बातम्या जातीयवादी मिडीयावाले मुद्दामहून दाखवतात. खरंतर हा मिडीयीवाल्यांचा प्रकार म्हणजे धनगर समाजाला मूळ मागणीपासून परावृत्त करण्यासाठी आहे. मिडीयावाल्यांना तसे करण्यासाठी फिडबॅक देण्याचे काम जातीयवादी असलेले भटजात सरकार करत आहे.
4. एखाद्या जातीचा/जमातीचा सामावेश जर अनुसुचित जाती/जमाती मध्ये करायवयाचा असल्यास त्याबद्दल अहवाल देण्यासाठी समिती नेमली जाते. परंतू धनगर समाज अगोदरपासूनच अनुसुचित जमातीच्या यादीत आहे त्यामुळे TISS या समितीची नेमणूक करून सरकार आणि धनगर समाजातील नेते धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देऊ पाहत आहेत.
5. धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात यासाठी फक्त आणि फक्त राज्य सरकारची शिफारस केंद्र सरकारला पाठवायची असताना TISS चे भूत धनगर समाजाच्या मानगुटीवर बसवून धनगर समाजाच्या हक्काचे आरक्षण लांबवण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. यासाठी धनगर नेत्यांनी वेळीच जागे व्हायला हवे अन्यथा समाजाचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही.
जोपर्यंत धनगर समाज पूर्णपणे जागा होत नाही जातीयवादी सरकारचे षडयंत्र हाणून पाडत नाही तोपर्यंत समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होणार नाही. माझा भोळा-भाबडा धनगर समाज रानावनातून, डोंगरदऱ्यातून काट्या कुट्याचा विचार न करता भर ऊन पावसात शेळ्या-मेंढ्याची राखण करतो. आयुष्यभर भटकंती करत असल्याने शिक्षणाचे दरवाजे तर माझ्या भावंडासाठी बंदच आहेत. चराऊ कुरणे सरकारच्या घशात आहेत. मग माझ्या भोळ्या-भाबड्या मेंढपाळ बांधवांनी जगायचे का मरायचे? असा प्रश्न डोक्यात सतत घोळत असतो मग जमातींमधील पुढारी एवढे षंढ कसे काय झालेत? खरंच तुम्ही धनगर जमातीत जन्माला आला असाल TISS चे भूत बाजूला करून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतींची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला भाग पाडा मग तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा त्या त्या पक्षाच्या वरिष्ठांचे तळवे चाटत बसण्यापेक्षा आयुष्यभर पायाच्या नडग्या वाळेपर्यंत भटकंती करणाऱ्या माझ्या समाजातील मेंढपाळ बांधवांचे प्रश्न सोडवा. नाहीतर मग लक्षात ठेवा,
कभीना कभी हर कुत्ते का समय आता है।
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे जे आरक्षण दिले होते ते राजकीय आणि सामाजिक मागासलेपणाच्या तत्वावर दिले होते. याशिवाय आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रात धनगर समाज अजून मागासलेलाच आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे "भारत देश हा संविधानावर (राज्यघटनेवर) चालतो, कोणत्या राजकीय (बाहुल्यांच्या) पुतळ्यांच्या इशाऱ्यावर नव्हे. त्यामुळे धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणीची मागणी ही भारतीय संविधानाला अनुसरून आहे. नाहीतर हक्कासाठी संघर्ष करण्याचा कायदा डाॅ.बाबासाहेबांनी दिलेलाच आहे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
हम 😎पर_ राज 🔫करने _वाला _सिर्फ ☝ख़ुदा😍 होगा
ReplyDeleteजो😏 कोशिश 😲करेगा 👊उसका _सर💆 👺जिस्म _से _जुदा_ होगा😠😈
💪।। हिसाब सबका होगा ।।💪
Dhangar Tigers
ReplyDelete