एकमेकांवर टिकाटिप्पणी करत पार खालच्या पातळींवर जाऊन टिका करणे हे नेत्यांना जमत नाही असे नसते तर नेते मुद्दामहून तसे करत नाहीत पण कार्यकर्ते मात्र यात माहिरच म्हणायचं की... मग टिका करताना तिथे कोणीही असो मग आपला किंवा परका हे कोण त्यांना कळतच नाही. हल्ली सोशल मिडीयावर अशा बहाद्दरांनी चांगले थैमानच घातले आहे. कोणत्याही नेत्याने दारू मटण अंडी दिली तर जाऊ नका आणि म्हणनारे सोशल मिडीया बहाद्दर असलेले कार्यकर्ते मात्र कुत्र्यांची-गाढवांची मटणं खायला सर्वात पुढे असतात. कोणत्याही नेत्यांकडून पैसे घेऊन मतदान करू नका म्हणनारे मात्र माझ्यामागे माझी भाऊकी आहे असे सांगून आपल्या
नेत्यांकडे लाखोंचे पॅकेजेस मागत असतात. एवढंच काय भावकीतल्याची किंवा गावकीतल्याची जिरवायची म्हणून एका पक्षाचे स्वाभीमानी कार्यकर्ते म्हणून काम करणारे महाबहाद्दर दुसऱ्या पक्षातील नेत्यांच्या चपला उचलून त्यांचे तळवे चाटणारे व अंडी-मटणं खाऊन चार-पाच लाख उकळणारे देखिल खूपजन स्वाभीमानी असतात हो... एकाच गावातील एकाच भावकीतील हे महाबहाद्दर गावच्या विकासासाठी व्हाटसप फेसबुकला कधीच एखादी चांगली पोस्ट शेअर करणार नाहीत लिहणार नाहीत. पण माझ्याच नेत्याला असाच का बोलला म्हणून सोशल मिडीयावर देखिल भावकीतल्यांची आई-बहिण काढायला मागेपुढे पाहात नाहीत. फार मोठे संस्कार आहेत... अरे पण एवढा उपद्व्याप कोणासाठी? खरंतर एवढा स्वाभिमान त्यांचा उतू चाललेला असतो की बोलायचे कामच नाही राव... खरंतर तो कोणाची जिरवण्यासाठी म्हणून दुसऱ्यांची अंडी-मटण खातो का त्याला विकासाचे महत्व कळते म्हणून तो करतो हे कोणास ठाऊक? पण त्यांना एवढे का कळत नाही की बाबांनो जिवंत आहे तोपर्यंत नेते नेते करत बसला तरी तुम्हाला कोणी काही आणून देणार नाही पण मेल्यावर मात्र ज्यांना तुम्ही शिव्या हासडता, ज्यांची तुम्ही डोकी फोडता, कुठल्यातरी नेत्यांच्या सांगण्यावरून ज्या भाऊभावकीतील लोकांचे कुऱ्हाडीने हातपाय तोडतां तेच भावकीतले भाऊबंद खांदा द्यायला पुढे येणार आहेत याचे भान राखा आणि गावच्या भकासासाठी नव्हे तर विकासासाठी काय करता येईल ते बघा तरच तुमचा स्वाभिमान दिसून येईल.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com
No comments:
Post a Comment