आज सकाळी दिपावली निमित्त ओवाळून औक्षण करताना माझी ताई म्हणाली की "दिन दिन दिवाळी आणि गाई म्हैसी ओवाळी." म्हणजेच प्राचीन काळापासून पशुपालक असलेली आदिम जमात आजही प्रत्येक सन-उत्सवामध्ये गाई-म्हैस-शेळ्या-मेंढ्या-घोडे-कुत्रा अशा जनावरांची पुजा करतात. म्हणूनच धनगर जमात ही देखिल प्राचीन संस्कृतीचा वारसा जपणारी आदिम जमात आहे अर्थातच धनगर जमात ही अनुसुचित जमातीच्या आरक्षणासाठीचे निष्कर्ष पूर्ण करते.
असो... औक्षण करताना पुढे ताईने कोणते गिफ्ट मागितले नाही तर एक मागणी केली ती तमाम महाराष्ट्र राज्यातील सर्व बहिनींनी आपापल्या भावाकडे हीच मागणी केली ती म्हणजे "इडा पिडा जाऊ दे (टळू दे) आणि बळीचं राज्य येऊदे". माझ्या डोक्यात लगेच क्लिक झाले आणि गोंधळ उडाला की परवा परवाच झी गौरव पुरस्काराचे वितरण करताना एक महाशय म्हणाला की बळी नावाचा राजा एक आसूर (राक्षस) होता आणि विष्णूने वामनाचा अवतार घेऊन बळीराजाच्या डोक्यावर पाय दिला. हे खरंतर वैदिक (ब्राह्मणी) संस्कृतीचे उदात्तीकरण करायचा धंदा आहे.
पण मला प्रश्न पडतो की जर बळी नावाचा राजा हा आसूर(राक्षस) असेल तर मग आजच्या भगिनी औक्षण करताना "इडा पिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊदे" असे का म्हणतात? खूप विचार केल्यानंतर अभ्यास केला आणि इतिहासात डोकावून पाहिलं तेव्हा समजले की प्राचीन कालीन इतिहासामध्ये बळी नावाचा एक कुरूवंशीय (धनगर) राजा होऊन गेला. ज्याच्या राज्यातील प्रजा, पशुपालक, शेतकरी हे धनधान्याने समृद्ध होता. बळी राजाच्या राज्यात पाऊस वेळेवर पडत होता आणि सर्वच गोष्टींचा सुकाळ होता. प्रजा, शेतकरी व पशुपालक हे आनंदी होते. परंतू तत्कालीन वैदिक संस्कृतीला शेतकरी तसेच प्रजा ही समृद्ध आणि आनंदी असलेली बघवत नव्हते म्हणून त्या बळीराजाला फसवून त्याला सत्तेवरून जाणूनबुजून हटवण्यात आले. अर्थातच आजकालची प्रचलित म्हण म्हणजे "बळीचा बकरा झाला." परंतू जेव्हा बळी राजाला राज्यकारभारावरून हटवण्यात आले त्यानंतर बळीच्या राज्यावरती अनेक संकटे उद्भवली. प्रजा ही रोगराईने तडफडून मरू लागली. एकेकाळी धनधान्याने समृद्ध असलेला शेतकरी दुःखांत बुडाला. बळीचं सशक्त आणि समृद्ध असलेले राज्य उध्वस्त झाले. तेव्हापासून आजपर्यंत शेतकरी हा कधीच सधन झाला नाही. हजारो शतकं उलटून गेली पण माझ्या शेतकऱ्यांना अजून न्याय मिळालाच नाही. न्याय मिळत होता तो फक्त कुरूवंशीय (धनगर) असलेल्या बळीच्या राज्यातच मिळत होता म्हणूनच आजच्या शेतकरी कुटूंबातील कुरूवंशीय धनगर असलेल्या प्रत्येक माता-भगिनी आपल्या भावाला ओवाळताना एकच मागणी करते ती म्हणजे बळी राजाचे राज्य उध्वस्त झाल्यापासून माझा शेतकरी कधीच समृद्ध झाला नाही त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांवरती जी संकटे आली आहेत ज्या काही इडा पिडा आहेत त्या टळू दे दूर होऊदे आणि जसे बळीचे समृद्ध राज्य होते तसेच राज्य आजही येऊदे.
परंतू तमाम भगिनींची ही मागणी (इच्छा) केवळ मागणीच राहिली आहे. आजही वैदिक संस्कृतीचे पाइक असलेले सनातनी व्यवस्थेचे पुरस्कर्ते आणि राज्यसरकार देखिल माझ्या शेतकऱ्यांना सुखाने जगू देत नाहीत त्यामुळेच शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते. त्यामुळे तमाम भगिनींचे भाऊ आपल्या बहिणींची ही मागणी कधी पूर्ण करताहेत ते बघूया...!
इडा पिडा टळू दे अन् बळीचं राज्य येऊ दे।
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

No comments:
Post a Comment