धनगर स्त्रीयांची दशा... “पण आरक्षण संपलेच असेल तर सरकार देणार तरी कुठून” ✍️ किर्ती नितीनराजे अनुसे |
(पण आरक्षण संपलच आसल तर सरकार देणार कुठून?
✍️किर्ती नितीनराजे अनुसे
दिनांक 29 मे 2017 ची गोष्ट
मी माझी परीक्षा देउन स्वारगेट जामखेड (चोंडी मार्गे) या ST ने गावी जात होते. 2013 पासुन मी पुण्यातच शिकत असल्याने या मार्गे नेहमी प्रवास चालु असायचा पन या वेळी जरा जास्तच उत्सुकता होती घरी जाण्याची कारण लग्नानंतर राजेंसोबत केरळ ला गेले होते अन् एका महीन्यानंतर घरी जात होते मनात खुप विचार धुमाकुळ घालत होते मी तिकडे कुठे कुठे फिरले काय काय पाहीले हे माझ्या भावंडाना सांगायची जणू घाईच झाली होती.
तेवढ्यात गाडी केडगाव चौफुल्यावर थांबली,
एक पती-पत्नी गाडीत चढले गाडी फुल भरलेली होती त्यांना जागा नव्हती, त्यांच्या कडे पाहुन मी लगेच ओळखले हे धनगर कुटुंब आहे सावळ्या वर्णाची ती बाई जेमतेम 18 किंवा 19 वर्षाची असेल, काष्टा साडी घातलेली कपाळावर लांबपर्यंत कुंकवाचा पट्टा ओढलेला, नाकामधे मोठी गोल नथ, कडेवर 9 ते 10 महीन्याचं बाळ, एका हातात पिशवी. ती नजर फिरवुन पहात होती कुठे जागा मिळते का बसायला मी पहील्याच शिटवर बसले होते ती माझ्यासमोरच उभी होती, मी चटकन सरकुन तिच्यासाठी थोडीसी जागा दीली. ती माझ्याशेजारी बसली. तिचा नवराही आमच्या समोरच म्हनजे ड्राइवर च्या शेजारील जागेत एड्ज्स्ट करून बसला. मी तिला विचारले कुठे जायचे आहे तुम्हाला? ती बोलली की सिद्धटेकच्या थोडं आल्याड उतरायचयं. मी विचारले गाव आहे का तिथे तुमचे? तर ती बोलली की, नाही आम्ही केडगावच आहोत पन मेंढर चारायला घेउन आलोय इकडं.
मेंढ्या कुठे आहेत, अन तुम्ही ST ने कस काय अस विचारताच ती सांगु लागली की मेंढ्या घेउन एका महीन्यापुर्वीच गेलोय चारायला.आम्ही दोघंच नाही तर गावातील अजुन 2 - 3 कुटुंब आहेत आमची म्हातारी गावी एकटीच असते, तीला थंडी ताप आल्याचं समजलं म्हणून दुसर्यांना मेंढ्या संभाळायला लावुन आम्ही भेटायला गेलो होतोे. घरी जाउन त्यांना दवाखान्यात नेउन आणलं, आता बरं वाटत होतं म्हणून परत चाललोत.
मला खुप कौतुक वाटल तिचं की ती वयाने किती लहान आहे, खरं तर हे तिचे शिक्षणाचे वय आहे या वयात लग्न होउन कुटुंबाची जबाबदारी संभाळत ती दिवसभर उन वारा पाऊस याची पर्वा न करता आपल्या तहानुल्याला घेउन रानोमाळी मेंढ्यांमागे कशी हिंडत असेल? अजुन एक गोष्ट म्हणजे कष्टाच्या कामासाठी बाहेरगावी असुन सासू साठी सगळं सोडून गावी जाने म्हणजे खरे संस्कार कारण मेंढ्या संभाळायला गेल्यार तिथे रविवार अन सोमवार सारखाच असतो. तिथं कसली आलीय सुट्टी? खुप ठिकाणी आपणास पहायला ऐकायला भेटतं की व्यवसाय किंवा नोकरी साठी बाहेरगावी असणारे सुट्टी नाही असा बहाना सांगून आई-वडीलांना भेटायच टाळतात तर काहीजण त्यांच्या सोबत राहत असुन त्यांची कदर करत नाहीत काही महाभाग तर त्यांना वृद्धाश्रमात टाकतात पण माझ्या धनगर समाजात असं कुठंच पहायला मिळनार नाही या बद्दल मला सर्व समाजबांधवांचा आभिमान वाटतो...
तसच मला त्या दादा-वहीणीचं पण खुप कौतूक वाटलं.
माझ्या सोबत तिला बोलायला जरा वेगळं वाटत होत का ते नाही समजल पन वाटत होत हे नक्की समजल कदाचीत तिला वाटलं असेल की ही शिकलेली आहे मोठ्या घरची असेल वगैरे... मग मी तिच्याकडे स्मीत हास्याने पाहिले अन् बोलले मी तुमचीच पाहुणी आहे मी सुद्धा धनगरच आहे. शिकायला पुण्याला असते आता सुट्टी ला गावी चाल्लेय... मग तिला जरा मोकळं मोकळं वाटलं असेल मग ती मोकळ्यामनाने बोलु लागली कोणतं गाव तुमचं....? तुम्हाला पण मेंढरं हायत का?...
मी सांगितले खर तर मेंढ्याबद्दल मला जास्त माहिती नाही कारण माझ्या माहेरी कोनाकडेच मेंढ्या नाहीत पण माझ्या सासरी भरपूर मेंढ्या आहेत. असेच माहेर सासर च्या गप्पा चालल्या होत्या... तेवढ्यात तिच्या नवर्याने विचारले ताई तुम्हाला कुठं जायच आहे?
मी बोलले चोंडी माझं माहेर आहे मी आता तिकडेच चाल्लीय ..
तेवढ्यात तो खुप खुश झाला अन् बोलला तरी म्हटलं आमची येवढी चौकशी कशीकाय करताय... मी मघाचपासुन पहातोय तुम्ही माझ्या बायको सोबत गप्पा मरताय... शेवटी चोंडीची कन्या आहात समाजाबद्दल तळमळ आसणारच... नाय तर आज काल शिकलेल्या पोरींना मैत्रीनी मध्ये धनगर या शब्दाचीच लाज वाटते तर आमच्या सारख्याला बोलणार कस...? मला तो दादा जरा सुशिक्षित वाटला....
तसं मी त्यांना शिक्षणाबद्दल विचारलं तर बोलले कि 4 थी शिकलोय फक्त ती पन 4 ठीकानच्या शाळेत जाउन कारन आई वडील मेंढ्या संभाळायला जायचे आमची सोय नसायची म्हनुन शाळाच सोडुन द्यावी लागली.
ते पुढे बोलु लागले किती वर्ष झाली अजुन आपल्याला आरक्षण भेटलं नाही. मी दर वर्षी 31 मे साठी चोंडीला येतो कार्यक्रमाला.
आमच्या दोघांची चर्चा चालु होती असच समाजाबद्दल आरक्षणा बद्दल. की कधी भेटतंय काय माहीत? तेवढ्यात त्यांची बायको बोलली की दर वर्षी मेंढ्या माझ्यावर सोपवून जातेत त्या सभेला की आपल्याला कसलं आरक्षण भेटनार हाय.. पण मोकळ्याच हाताने माघारी येतेत कधी देनार सरकार आरक्षण.... आसत तर कधीच दील आसत येवढा तरास नसता दिला समद्यानला....
पण आरक्षण संपलच आसल तर सरकार देनार तरी कुठून...?
मला लवकर समजलच नाही की तिला नेमकं काय बोलायचंय तेवढ्यात तो बोला आगं आरक्षण संपत नसतय तुला नाही समजत तर गप ऐकुन घी की....
त्या दोघांचे बोलने थांबवत मी मध्येच बोलले की तुम्ही दोघे का नाही येत सभेला तेव्हा ती बोलु लागली दर साली सगळे गडी माणसच जातेत अन् मेंढ्या आम्हा बायकांना संभाळायला लावतात. गावाकडं पण जयंती आसती पन वार्या वावटळीच दिस आसत्यात म्हणून मेंढरं सोडुन जाता येत नाय. तस बी येवडे सगळे गडी जातेत तरी सरकार आरक्षण देत नाय मग आमी बायका तर काय करनार जाउन...?
तसं बी एक जण गेला तर दुसरा मेंढरापाशी पाहीजेच की....
मला तीच बोलणं पटलं....
तेवढ्यात त्यांचा स्टॉप आला आणि निरोप घेउन ते उतरले..
आता माझ विचार चक्र चालु झाल माझंच मला कसंतरी वाटु लागलं की आपण शिक्षण घेतलं म्हणजे झालं असं नाही तर आपल्या सर्व समाज बहीणी शिकल्या पाहीजेत.
आरक्षण म्हणजे नेमकं काय हेच अजुन आपल्या काही माता-भगीनींना समजलेलं नाही. म्हणजे समाजाची प्रगती काहीच नाही.सममाज खुप आंधारात आहे अजुनही काही ठिकाणी आपला समाज त्यातल्या त्यात महीला वर्ग....
ज्या समाजातील एका निराधार स्री ने संपुर्ण राज्यकारभार सांभाळला त्या समाजातील स्रीयांनी फक्त स्वत:चाच संसार संभाळुन कस चालेल..?
आपल्याला एका कर्तबगार स्री चा वारसा लाभला आहे हे नेहमी लक्षात असुद्या
पुरूषवर्गाला माझी एकच विनंती आहे की फक्त स्वत:च प्रगत नका होउ तर घरच्या आई बहीणीला सोबत घेउन प्रगती पथावर चला. कारण तुम्हाला माहीतच आहे की एक पुरुष प्रगत झाला तर तो एकटाच धावतो पन जर एक स्री प्रगत झाली तर संपुर्न घराला प्रगतीच्या दिशेने धावायलाा लावते...
पुढच्या आठवड्यात अहिल्या क्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा मा.सौ.कल्याणीताई वाघमोडे यांनी 8 मार्च रोजी मुंबई येथे भव्य महिला आंदोलन आयोजीत केले आहे. आपल्या समाजातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन अहिल्या कन्यांची अन् धनगर स्री ची एकजुट दाखवून द्यावी. कधी पर्यंत मागे राहणार आहात....... महिला वर्ग पुढे आल्याशिवाय सरकारला पण धनगरी ताकत समजणार नाही
सर्व पुरुषांनी आपल्या घरच्या महिलांना पाठिंबा देणे खुप गरजेचे आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या !!
लेखन
- ✍️किर्ती नितीनराजे अनुसे
दाहक वास्तव मोजक्या शब्दात मांडलंय। धनगर मुलींनी , महिलांनी शिकलं पाहिजे या मताशी शंभर टक्के सहमत आहे।
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteधन्यवाद सर
ReplyDeleteसत्य रेखाटलेले आहे सर...
ReplyDeleteधन्यवाद सर
ReplyDelete🙏
Deleteसहमत
ReplyDeleteधन्यवाद सर
DeleteNice खुप छान लेख
ReplyDeleteधन्यवाद सर
Deletereality sangitali aahe tumhi...
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete