माझ्या वाढदिवसानिमीत्त दिलेल्या शुभेच्छांबद्दल अभिप्राय... |
काल दि २० मार्च रोजी माझ्या वाढदिवसानिमीत्त अखंड देशभरातून माझे आप्त, मित्रपरिवार, सहकारी वर्ग, वर्गमित्र तसेच महाराष्ट्र राज्यातील ज्ञात/अज्ञात तमाम लहानथोर समाजबांधवांनी फोन वरून, प्रत्यक्ष भेटून तसेच व्हाटसॲप व फेसबुकच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या माझ्यावरती जो शुभेच्छांचा वर्षाव केला त्याबद्दल आणि जे शुभेच्छा देऊ शकले नाहीत त्याबद्दल देखिल तुम्हा सर्वांचा मी ह्रदयाच्या अंतकारणापासून खूप खूप आभारी आहे. मला शुभेच्छा दिल्या नाहीत असे महाराष्ट्र राज्यातील एकही गाव नाही. कारण जिथे साधे वर्तमानपत्र पोहचत नाही दूरदर्शन तरी खूप दूरची गोष्ट अशा डोंगरदऱ्यात राहणाऱ्या समाजबांधवांपर्यंत २६०० पेक्षाही जास्त व्हाटसॲप ग्रुपच्या माध्यमातून माझे समाजप्रबोधनाचे लेख त्यांच्यापर्यंत पोहचत असतात आणि ते मला नेहमी अवर्जून कळवतात देखिल.... अशा प्रत्येक वाड्या-वस्त्यावरून समाजकार्याच्या चळवळीत असलेल्या एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या समाजबांधवांनी शुभेच्छांच्या माध्यमातून माझ्यावरती जे प्रेम व्यक्त केले त्यातून समाजासाठी सत्कार्य करण्याची मला फार मोठी ताकद मिळते/प्रेरणा मिळते. खरंतर मी काही फार मोठा लेखक, वक्ता, व्याखाता, तत्ववेत्ता अथवा फार मोठा काही विचारवंत देखिल नाही परंतू माझ्या भोळ्या-भाबड्या समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे व न्यायासाठी/हक्कासाठी लढणे, झटणे आणि झगडणे हे आमच्या रक्तातच असल्याने तो अन्यायाच्या विरोधातील आवाज मी माझ्या लेखणीच्या माध्यमातून स्वाभिमानी समाजमनापर्यंत पोहोचवतो आणि मी ते माझे आद्यकर्तव्य समजतो.
काही कारणास्तव मी महाराष्ट्र राज्याबाहेर असल्याने सर्वांची भेट घेणे, सामाजिक कार्यक्रम, जयंती सोहळा असो, समाजाचे कोणतेही आंदोलन अथवा मोर्चा असो मला प्रत्यक्षरित्या त्यामध्ये सहभागी होता येत नाही तरी माझा वर्गमित्र राहूल जावीर (RJ) याने काल सांगितल्याप्रमाणे व्हाटसॲप, फेसबुक, ट्विटर, हाइक, गुगल, ब्लाॅगर यांसारख्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून मी प्रत्येक समाजबांवांशी (24*7) संपर्कात असतो. धनगर समाजातीलच काही महान व्यक्ती मला म्हणाल्या की तुम्ही जातीयवाद करता... परंतू जर मला जातीयवाद करायचा असता किंवा करत असलो तर मग जीवाला जीव देणारे अन्य जाती-धर्मातील माझे मित्र माझ्यापासून कधीच दूर झाले असते. त्यांच्या मनात देखिल असा विचार कधीच आला नाही तर मग हा न्यूनगंड माझ्याच धनगर समाजात का? असा प्रश्न मला नेहमीच पडतो... असो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या विचारधारेतून प्रेरित होऊन समाजप्रबोधनाच्या चळवळीतील एक सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील एक छोटासा कार्यकर्ता नव युवा लेखक म्हणून मला जी ओळख मिळाली त्यात माझ्या आई-तात्यांसोबतच तुम्हा सर्वांचं देखिल फार मोठं योगदान आहे. त्याच जोरावर आणि माझे गुरू प्रा.श्रीकृष्ण पडळकर सर (M.Phil) यांच्या मार्गदर्शनातून अन्यायाच्या खाईत होरपळलेल्या/खचलेल्या/पिचलेल्या तसेच अंधकारात गुरफटलेल्या धनगर समाजास “पुन्हा एक नवी दिशा” नावाचं पुस्तक येत्या एप्रिल मध्ये प्रकाशित करून वाचकांसमोर ठेवतोय. तसेच महाराष्ट्राबाहेर असल्याने फार दिवसांपासून प्रलंबित असलेले चरित्र म्हणजेच ज्या माणसानं स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड धनगर समाजाला जागं केलं त्या क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे त्यांचे जीवन चरित्र प्रिंटींग होत असून लवकरच ते देखिल प्रकाशित होईल आणि जेव्हा मी महाराष्ट्रात येईन तेव्हा ते समाजबांधवांच्या हातात असेल.
असो तुम्ही मला शुभेच्छा देऊन माझ्यावर जो प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल पुनश: एकदा मी तुम्हा सर्वांचा ऋणी आहे.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१८५३०००४१२३
No comments:
Post a Comment