धनगरांनो एवढे षंढ कसे काय बनलात? - नितीनराजे अनुसे |
हा प्रश्न जरा जास्तच जिव्हारी लागणारा आहे हे मला माहीत आहेच... कदाचित काहीजणांना हे पचनी पडणार सुद्धा नाही... काही जणांना हा प्रश्न रुतेल तर कोणी या प्रश्नामुळे खुतेल... पण हा प्रश्न मला एकट्यालाच पडतोय असेही काही नाही. कदाचित तुमच्या आमच्या पैकी स्वाभिमानानं जगणाऱ्यांना नक्कीच हा प्रश्न पडत असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. त्याचे कारणही तसेच आहे ते म्हणजे धनगर समाजाच्या दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाची पानं चाळायला जर सुरवात केली तर अक्षरशा अंगावर शहारे येतात, रक्त सळसळू लागतं, नसा (धमन्या) सैरावैरा पळत रक्ताचा पुरवठा संपुर्ण शरीरभर करतात, अहो आहेच आमुचा धनगरांचा गौरवशाली इतिहास असा.... आणि हाच सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचताना जणू काय रणांगणावरती दोन्ही हातात तलवारी घेऊन शत्रुशी झुंज देत असल्याचे आम्ही वाचक स्वताला समजत असतो, स्वःताच त्या इतिहासातील नायक समजून वाचनाची लढाई लढत असतो. छातीची ढाल करून आणि मनगटाची तलवार करून शत्रुंच्या चारी मुंड्या चित करणाऱ्या थोर महापुरूषांच्या जातीत जन्माला आलेल्या आम्ही औलादी आहोत असे समजल्यावर, इतिहास वाचल्यावर अभिमानाने छाती भरून येते तेव्हाच खरंतर आमच्यातला स्वाभिमान जागा होतो. पण आजपर्यंत हा आमुचा गौरवशाली इतिहास आम्हापासून लपवून ठेवला, तर काहीजणांनी तो विकृत आणि चुकीचा लिहला त्याचे कारण असे की धनगर समाजाचा जाणूनबुजून विकृत आणि चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरोखर चुकीचेच जन्माला आले होते. असे म्हंटले तरी मला काही वावगे वाटणार नाही.
आज आमचा सत्य आणि रक्तरंजित इतिहास वाचल्यावर, ऐकल्यावर आणि समजल्यावर एकेकाळी राजा समाजात जन्माला आल्याचा अभिमान आम्हाला वाटतो पण दुसरीकडे आताची सद्य परिस्थिती पाहिली तर खरोखरच स्वतालाच त्याची लाज वाटते असे का बरं??? त्याचे कारण असे की आमच्याच काही लोकांनी स्वताचा स्वाभिमान दुसऱ्यांच्या पायाखाली गहाण टाकल्याने धनगर समाजावर ही वेळ आली आहे. स्वाभिमान काय असतो हेच कळले नसल्याने आजपर्यंत धनगर समाजातील नेत्यांनी प्रस्थापित मस्तवाल नेत्यांची चमचेगीरी केली समाजाची दलाली करून समाजाला लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम हे स्वार्थाने बरबटलेल्यांनी केले कदाचित त्यांना आपल्या ज्वलंत इतिहासाची जाण नसावी. प्रस्तापित नेत्यांची चाकरी करून गुलामी करून फक्त ग्रामपंचायती सोसायट्या आणि पंचायत समिती व जास्तीत जास्त जिल्हा परिषदेच्या पलिकडे मजल मारायची हिम्मत आजपर्यंत धनगर समाजात कधी कोणाची झालीच नाही फक्त आणि फक्त बोटावरती मोजण्याइतपत आमदार सोडले तर.... अंगी हत्तीचे बळ असणाऱ्या, थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या आणि करोडोच्या संख्येने असताना देखिल प्रस्तापितांनी टाकलेल्या तुकड्यांवर जगायची सवय लागलेली असल्याने आमच्या धनगर समाजात नेतृत्वाचा अभावच राहिला याची शोकांतिका वाटते. राजकारण समाजकारण हे आपलं काम नव्हे तर ते पवार पाटील देशमुख ठाकरेंनीच करावे ते आपले काम नव्हे असे म्हणत षंढ राहून थंड बसणाऱ्या औलादींना आमचा खरा इतिहासच कधी समजला नाही हे सर्वात मोठं दुर्दैव....
षंढ राहून थंड बसण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले बरे असे समजून संघर्षातून मार्ग काढत राजकारण आणि समाजकारण करणारे आज अग्रेसर होत चालले आहेत हे नाकारून चालणार नाही आणि हे चित्र आज महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसतंय पण एवढंच हाताच्या बोटावर मोजण्याइतपत धनगर समाजाचं नेतृत्व असून चालणार नाही तर त्यासाठी समाजातलं बंडखोर नेतृत्वही उदयास यायला हवं पण ते धनगर समाजातील नेत्यांचे पाय ओढणारं नसावं... त्यासाठी इतिहास सुद्धा तितकाच अभ्यासायला हवा. ज्याला भारताचा नेपोलियन बोनापार्ट म्हणून ओळखले जाते असा छातीची ढाल करून मनगटाच्या जोरावर लढणारा योद्धा, सर्व काही संपले असताना पुन्हा शून्यातून स्वताचं साम्राज उभा करत अजिंक्य मानल्या जाणाऱ्या कवायती आणि शिस्तबद्ध फौजेची इभ्रत वेशीवर टांगणारा, इंग्रज अधिकाऱ्यांना अक्षरशा गुढगे टेकायला भाग पाडणारा व इंग्रजांना १९ लढायांमद्ये धूळ चारून त्यांच्या सैन्यांना कापून काढणारा एकमेवाद्वितीय धुरंदर लढवय्या व छत्रपती शिवाजी महाराजानंतर स्वताचा राज्याभिषेक करवून घेणारा महाराजाधिराज चक्रवर्ती सम्राट छत्रपती यशवंतराव होळकर यांच्या सळसळत्या रक्ताचे तुम्ही आम्ही वारसदार असताना षंढ बसून राहिल्याची तुम्हाला लाज का वाटत नाही?
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com
भविष्यात धनगर समाज नक्कीच एकत्र येईल आणि धनगर काय असतो हे पुन्हा एकदा दाखवून देऊ शकतो. अजूनही धनगरांच्या मध्ये तशीच रग आहे. फक्त राजकारण ख्वाडा घालतय.
ReplyDeleteबाकी आपण लढवय्ये होतो..आहे..आणि राहणार@
वाघ म्हातारा झाला तरी दरारा हा कायमच असतो. रक्तातच असावं लागतं आणि ते धनगरांच्या रक्तात आहे. परिस्थिती आटोक्याच्या बाहेर गेल्यास धनगर शांत बनणाऱ्यातला न्हवं.
एकदम बरोबर बोललात सर
Delete