![]() |
संघर्षयोद्धा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब |
माणदेशी मातीत जन्माला आलेलं संघर्ष रत्न म्हणून ओळखल्या युवक ह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज जन्मदिवस... सर्वसामान्य कुटुंबातील मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय ना. महादेवजी जानकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात सन २००६ ला प्रवेश केला. गेल्या १२-१३ वर्षांपासून जनतेत मिळून-मिसळून रात्री अपरात्री गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा, अत्याचारीत पिडीतांना न्याय मिळवून देणारा आणि जनतेच्या हितासाठी अहोरात्र संघर्ष करणारा एक संघर्ष योद्धा म्हणजेच गोपीचंद पडळकर साहेब अल्पावधीतच युवकांच्या गळ्यातील ताईत बनले.
राजकारण हा नुसता खेळ नव्हे तर गोरगरिबांच्या/सर्वसामान्यांच्या विकासाचा तो दरवाजा आहे जो सर्वसामान्यांना डावलून प्रस्थापित व्यवस्थेने कपटी भावनेने फक्त पाहुण्याराऊळ्यांसाठीच उघडा ठेवला. तो दरावाजा तोडून त्याची कवाडे सर्वसामान्यांसाठी सदैव उघडी ठेवावीत याच उदात्त भावनेने गोपीचंद पडळकर साहेब यांनी प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात दंड थोपटले. परंतु लोकशाही प्रदान भारत देशामध्ये अशा दरवाजाला प्रस्थापित व्यवस्थेने मात्र जातीयवादाचे भक्कम कुलूप लावून ठेवले आहे की ज्या कुलूपाची किल्ली मात्र त्याच विशिष्ट जातींच्या लोकांसाठी आणि त्यांच्याच कारखान्यात तयार होते. त्यामुळे जर सर्वसामान्यासांठी हा सत्तेचा दरवाजा सताड उघडा ठेवायचा असेल तर त्या कुलूपाच्या किल्लीऐवजी बहुजन समाजाला एकत्रित करून घनरुपी घाव घालून तो दरवाजा तोडावा लागेल यासाठी ते वंचित बहुजन आघाडीमधून सांगली लोकसभा निवडणूक लढले होते. परंतु "एसटी गेल्यावर हात करणे" या वाक्यप्रचाराप्रमाणे धनगर आणि धनगरेत्तर बहुजनांना कळून चुकले की जर त्यांचे बहुमोल मत हे पडळकरांच्या पारड्यात टाकले असते तर एक सर्वसामान्यांचे धडाकेबाज नेतृत्व संसदभवनात सर्वसामान्यांच्या न्याय व हक्कासाठी तथा हितासाठी लढले असते.
असे कितीतरी वेळा गोपीचंद पडळकर हा उमदा नेता जनतेच्या बाजूने, जनतेच्या पैशावर मातब्बर प्रस्थापितांच्या विरोधात लढला आणि लढता लढता पडला पण प्रस्थापितांना मात्र त्यांनी घामच फोडला. अर्थातच पडळकर साहेब लढता लढता मतपेटीतून हरले परंतु जनतेच्या मनात भरले. मात्र "लढता हारलो तरी हरल्याची मला खंत नाही, पुन्हा उठून पुन्हा लढेन कारण शांत बसायला मी काही संत नाही." या विचाराने प्रेरित होऊन ते पुन्हा जनतेसाठी राजकारणाच्या रणांगणात प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभे असतात हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. कालपरवा ते वंचित बहुजन आघाडीमधून बाहेर पडले आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावरती अनेकजणांचे मतभेद आहेत काहीजण राजकीय द्वेषापोटी तर काहीजण व्यक्तिदोषापोटी तोंडसुख घेताना पाहिले. परंतु एकमात्र नक्की आहे की मा.गोपीचंद पडळकर साहेब हे कोणत्याही पक्षातून निवडणूक लढले तरी ते लोक पडळकर साहेब यांच्यावर टिका करणारच... मग जानकर साहेबांच्या रासप मधून लढू द्या, भाजप-शिवसेनेतून लढू द्या नाहीतर कॉंग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेस मधून अन्यथा वंचित मधून कोणतीही निवडणूक लढू द्या. गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावर प्रेम करणारे सच्चे कार्यकर्ते हे कोणत्याही पक्षाला मानत नाहीत तर ते पडळकर साहेब यांच्याशी एकनिष्ठ राहतात कारण त्यांच्या दृष्टीने मा.गोपीचंद पडळकर हाच त्यांच एकमेव आणि उत्तम पक्ष होय.
अशा उमद्या आणि कणखर नेतृत्वाला अर्थातच सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणाऱ्या, लढणाऱ्या तथा झगडणाऱ्या संघर्षयोद्ध्याला जन्मदिवसाच्या अगणित शुभेच्छा। मल्हारी मार्तंड तुमच्या मनगटात बळ देवो, तुम्हास बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना🙏
जय मल्हार!! जय अहिल्याई!! जय यशवंतराजे!!
✍️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+91 853 000 4123
No comments:
Post a Comment