![]() |
कोण आहेत हे गोपीचंद पडळकर? |
एकेकाळी कोणतेही वर्तमानपत्र अथवा मिडिया साधे ज्या माणसाचे नाव सुद्धा घ्यायला टाळत होती आणि आज मात्र महाराष्ट्र राज्यातील युवकांनी अगदी डोक्यावर घेतलेले व्यक्तिमत्त्व, टीव्ही चैनल्स, वर्तमानपत्र आणि समाज माध्यमांना गोपीचंद पडळकर यांच्या नावाची, घोषणेची दखल घेतल्याशिवाय त्यांची हेडलाईन बनत नाही असे गोपीचंद पडळकर आहेत तरी नक्की कोण? राजकारणात नावारूपाला आलेल्या पडळकर यांच्या कुटूंबाची पार्श्वभूमी आणि त्यांचा राजकीय प्रवास काय याबद्दल काहीजणांना उत्सुकता लागली असावी.
माणदेश हा तसा दुष्काळी पट्टा म्हणून सर्वज्ञात आहे. त्याच माणदेशाच्या दुष्काळी पट्ट्यातील सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका तसा आजही संघर्षाच्या कथाच गिरवतोय. तिथला शेतकरी स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुष्काळाशी दोन हात करून आजही टिचभर पोटाच्या तुमड्या भरायला अर्धीकोर खाऊन कसाबसा जगतोय म्हणजेच संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. याच मातीतील थोर साहित्यकार ग.दि.माडगूळकर, बनगरवाडी या गाजलेल्या कादंबरीचे लेखक व्यंकटेश माडगूळकर, तराळ-अंतराळचे कादंबरीकार शंकरराव खरात, ना.सि.इनामदार अशा प्रख्यात लेखकांनी, कादंबरीकरांनी संघर्षातूनच संघर्ष गाथा गिरवल्या आणि त्या गाथा साता-समुद्रापार ऐकवल्या.
तेव्हाचा तो आटपाडी तालुका तसेच जत, कवठेमहांकाळ व खानापूरचा काही भाग आजही दुष्काळाच्या छत्रछायेखाली असून त्या झळया सोसतोय. परंतु तिथली हाताच्या बोटावर मोजण्याइतपत प्रस्थापित घराणी सोडली तर प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष आणि संघर्षच आला आहे. स्वातंत्र्य सैनिक क्रांतीवीर स्व.नागनाथअण्णा नायकवडी यांनी आटपाडी तालुक्यासाठी पाण्याचा संघर्ष सुरू केला. त्यांना स्वातंत्र्य सैनिक स्व.जी डी बापू लाड, जेष्ठ अभिनेते स्व.निळू फुले तसेच जेष्ठ नेते आमदार भाई गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचीही साथ मिळाली. दरवर्षी २६ जून ला पाणी परिषद व्हायची परंतु क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या निधनानंतर ती पाणी परिषद बंद झाली. आटपाडी, सांगोला, जत, माण तालुक्यातून, प्रत्येक गावागावांतून हजारोंच्या संख्येने लोक एकत्रित यायचे, पाण्यावरती चर्चा व्हायची, मनोगते व्हायची, उन्हातान्हात मिळेल त्या जागेवर बसून लोक सभा ऐकायचे सभा संपायची आणि सगळे जिकडच्या तिकडे निघून जायचे. परंतु प्रस्थापित व्यवस्था, राज्य सरकार याची दखल घेत नव्हते. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या अथक प्रयत्नानंतर/संघर्षानंतर १९९६ साली टेंभूसाठी (Tembhu Lift Irrigation Scheme) मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आणि स्व.नागनाथअण्णा नायकवडी हे टेंभू योजनेचे खरे जनक ठरले. परंतु २३ वर्षे उलटून देखील ही योजना अजून पुर्णत्वास आली नाही हे आटपाडी तालुक्याचेच नव्हे तर सांगली जिल्ह्याचे दुर्दैव म्हणावे लागेल. आजपर्यंतच्या लोकसभा/विधानसभा निवडणूक या केवळ आणि केवळ पाण्यावरतीच झाल्या परंतु जातपातीचे/गुंडगिरीचे/जिरवाजिरवीचे राजकारण करण्यापलीकडे एकानेही सांगलीचा खऱ्या अर्थाने विकास केला नाही.
जर जनतेला न्याय द्यायचा असेल तर संघर्षाशिवाय दुसरा तिसरा चौथा कोणता मार्ग शिल्लकच नाही असा विचार करून सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे गावच्या नैऋत्येस असलेल्या पडळकरवाडी गावचे सुपूत्र गोपीचंद कुंडलिक पडळकर या तरूणाने २००६ मध्ये राजकारणात पाय ठेवला. वक्तृत्वाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर हे उमदे नेतृत्व पुढे आले. खरंतर जन्मापासूनच या तरूणाने संघर्ष कोळून प्याला आहे. प्राथमिक शिक्षण घेत असतानाच ब्रेन ट्यूमर सारख्या भयंकर आजाराने वडिलांचे छत्र हरपले. वडिलांची सेवा करता करता मोठे बंधू देखील देवाघरी गेले. आई सोबत मोलमजुरी करून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आणि पुढे द्वितीय बंधू ब्रह्मानंद पडळकर यांनी गलाई दुकानदारी केली त्यातून उच्च माध्यमिक आणि पदवी शिक्षण पूर्ण करून नागज फाटा येथे ढाबा सुरू केला. त्यातून हळूहळू व्यवसायात प्रगती होत गेली आणि २००६ साली रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.महादेवजी जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्याची राष्ट्रीय समाज पक्षाची धुरा खांद्यावर घेतली. बघता बघता गोपीचंद पडळकरांची तोफ सांगली जिल्हाभर धडकू लागली, गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी जागृत होऊ लागला, सर्वसामान्य जनतेच्या मनात स्वाभिमान धडधडू लागला तशी आटपाडी तालुक्यातील प्रस्थापित नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली, पडळकरांच्या तोफांच्या माऱ्याने आगगोळे प्रस्थापितांवर दणादण आदळू लागले आणि त्या आगगोळ्याने प्रस्थापित, आमदार, खासदार, मंत्री देखील होरपळू लागले, पडळकरांच्या नेतृत्वाखाली अनेक शेतकरी मेळावे, चारा छावण्यांसाठीची आंदोलने, मोर्चे होऊ लागले तसतसे दुखलेले खुपलेले लोक पडळकरांच्या भोवती गोळा होऊ लागले नव्हे तर गोपीचंद पडळकर हे सांगली जिल्ह्यातील युवकांच्या गळ्यातील ताइत बनले. पुढे अल्पावधीतच २००९ साली विधानसभेची निवडणूक लढवून जवळपास २०,००० हजाराच्या संख्येने मतदान खेचून आणले आणि तिसऱ्या नंबरचे दखलपात्र नेते ठरले. याची धास्ती प्रस्थापितांनी घेतली आणि त्यांच्यावर खोट्या केसेस घालण्यात आल्या. अगदी स्त्रियांच्या मंगळसूत्र चोरीच्या केसेस ज्यामधे गोपीचंद पडळकर यांना कोर्टाने निर्दोष सिद्ध केले. पुढे २०१२ ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकांत तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाचे मतदान पडळकरांच्या पैनल कडे होते त्यामुळे प्रस्थापितांची अजूनच डोकेदुखी वाढली आणि मग पुन्हा सुरू झाल्या चोरीच्या खोट्या केसेस. पुढे २०१३ साली तालुक्यातील २० पेक्षा जास्त ग्रामपंचायतीवर पडळकरांच्या नेतृत्वाखाली रासपचा झेंडा फडकवला आणि युवकांना सोबत घेऊन पाण्याचा संघर्ष हाती घेऊन तत्कालीन गृहमंत्री जयंत पाटील यांची गाडी आडवणे, शेतकऱ्यांना पाणी मिळावे म्हणून टेंभू कार्यालय फोडले, आटपाडी तालुक्याला पाणी मिळावे म्हणून राजेवाडीचा उजवा कालवा फोडला अशी एक ना अनेक जनतेच्या हिताचे प्रश्न हाती घेऊन पडळकर यांनी संघर्ष केला परंतु त्यांच्यावर अनेक खोट्या केसेस दाखल केल्यामुळे त्यांना जिल्हा हद्दपारीचे नोटीस बजावली होती. परंतु वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आंदोलन मोर्चे केले नव्हते तर शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना सुखात जगता यावे, त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे, न्याय मिळावा या हेतूसाठी त्यांच्यावर केसेस झाल्या असल्याने प्रांताधिकाऱ्यांनी त्या केसेस हटवायला लावून गोपीचंद पडळकर यांचे जिल्हा तडीपार रद्द झाले. जिथं तिथं संघर्ष आणि संघर्षच अनुभवायला आल्याने गोपीचंद पडळकर एक संघर्ष रत्न म्हणून नावारूपास येऊ लागले.
![]() |
तालुका दुष्काळात होरपळत असताना मागितले म्हणून पवाराच्या सरकारने लाठीचार्ज करायला पोलिसांना भाग पाडले होते. |
पुढे २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर त्यांनी विधानसभा लढवली आणि तब्बल ४५००० हजारांचे मताधिक्य मिळवून स्वताला संघर्ष पुत्र म्हणून सिद्ध केले पण एवढ्यावरच त्यांनी हार मानली नाही. आमदार नसताना देखील मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवून आटपाडी-खानापूर मतदासंघातील रस्त्यांसाठी भरघोस निधी त्यांनी आणला, आटपाडी तालुक्यासाठी एमआयडीसी, तसेच एकूण २६ बंधारे मंजूर करून आणले. जी कामे आमदारांनी करायची होती ती कामे पडळकरांनी आमदार/खासदार नसताना देखील केली त्यामुळे जनतेच्या मनात गोपीचंद पडळकर हे आमदार/खासदार/मंत्री म्हणून मिरवू लागले. टेंभूच्या चौथ्या टप्प्याच्या कामासाठी भुमिपूजनासाठी मंत्री महोदयांना ते घेऊन आले शिवाय इतिहासात पहिल्यांदाच मुख्यमंत्री सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात आले ते पडळकरांमुळेच.
![]() |
कृषिमंत्री असताना पवारांनी आटपाडीला येण्याऐवजी दुरूनच पळ काढून तासगावला गेले होते. |
गोपीचंद पडळकरांनी नाम फौंडेशनच्या माध्यमातून, लोकसहभागातून अनेक कामे करून घेतली शिवाय निधीअभावी रखडलेल्या टेंभूच्या अर्धवट कालव्याचे काम स्वखर्चाने पूर्ण करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. जनता हेच माझे मायबाप म्हणून पडळकर अहोरात्र जनतेसाठी काम करतात आणि आजपर्यंत त्यांनी स्वार्थासाठी काहीच केले नाही. जर खरोखरच पडळकरांना स्वार्थ साधायचा असता तर भाजपच्या मोठ्या ऑफर्स धुडकावून ते स्वाभिमानाने खासदारकीसाठी उभे राहिले नसते. गोपीचंद पडळकर हे सांगली लोकसभा निवडणूक केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, न्याय व हक्कासाठी लढले होते आणि तब्बल ३ लाख २३४ मतदान त्यांनी स्वबळावर मिळवले होते. त्यांच्या आजपर्यंतच्या संघर्षाचा अनुभव हा सर्वात मोठा गुरु त्यांच्या पाठीशी आहे आणि त्या संघर्षात साथ देणारे सर्वसामान्य तरूण, शेतकरी, कष्टकरी हे त्यांच्या हातात हात देऊन काम करत आहेत त्यामुळे "कष्टाने हाल होतात पण हार होत नाही" हे ब्रीदवाक्य घेऊन पडळकरांचा संघर्षरथ दिवसेंदिवस मजल मारत पुढे चालला आहे.
आज गोपीचंद पडळकर हे बारामती विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवताहेत. बारामती तालुक्यातील उपेक्षित बहुजन समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने दादागिरी, टगेगिरी, घराणेशाही मोडीत काढून सर्वसामान्यांचा पोरगा बारामतीची सुत्रे हलवणार हे काळ्या दगडावरची पांढरी आणि ठळक रेषा आहे. पवारांची उचलेगिरी करणारी मिडिया बारामती मतदारसंघातील जनतेमध्ये जातीच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण करत असले तरी बारामती मधील जनता हुशार आहे. तेथील काही पत्रकार हे पवारांच्या दहशतीखाली त्यांची लाचारी करत असले तरी गोपीचंद पडळकर यांची सोशल मिडिया ही भारत देशातील सर्वात स्ट्राँग आणि निशुल्क काम करते त्यामुळे बारामती मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांचा विजय निश्चित आहे.
![]() |
बारामती मधील जनतेनंच घेतलंय पडळकरांना डोक्यावर |
संघर्षपुत्रा तु विजयी भवः
✍️नितीनराजे अनुसे (लेखक व व्याख्याते)
8530004123
Raje nice
ReplyDeleteThanks so much
Deleteसंघर्ष योद्धा माणूस great work 💯💯✌✌🙏🙏🙏
ReplyDeleteRight
Deleteसुंदर खुपच छान लेख खुपच छान
ReplyDeleteThanks
Deleteखूपच सुंदर
ReplyDeleteधन्यवाद🙏
Deleteखूप खूप धन्यवाद
ReplyDeleteमस्त राजे
ReplyDeleteInspiring story of Gopichand saheb. Nicely narrated Nitin sir. Thank you for sharing this article.
ReplyDeleteThanx a lot of
Deleteएकच छंद गोपीचंद
ReplyDeleteThanks so much
ReplyDeleteGreat man also God man ...🙏🙏
ReplyDeleteMst
ReplyDeleteएकच छंद गोपीचंद
ReplyDeleteखूप अभ्यासपूर्ण लेख व मांडणी
ReplyDeleteधन्यवाद नितीन सर माहिती दिल्याबद्दल
ReplyDelete007king💛💛💛💛🚩
ReplyDelete