भारत हा तसा सर्वात मोठी लोकशाही असलेला लोकशाही प्रदान देश आहे. हे आजपर्यंत नागरिकशास्त्रात वाचायला भेटायचे परंतु खरंतर लोकशाही (?) म्हटलं की आता प्रश्नचिन्ह उभे राहते आहे. खरंच इथे लोकशाही आहे का? डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेत प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले, मतदानाचा अधिकार दिला परंतु आम्हाला त्याचा योग्य वापरच करता येत नसेल तर त्या व्यक्तिस्वातंत्र्याला आणि मतदानाच्या दिलेल्या अधिकाराला अर्थच काय उरतो बरे?
असो आता थोडसं मी माझ्या धनगर समाजाकडे वळतो. कदाचित काहीजण मला जातीयवादी म्हणतील सुद्धा... पण हरकत नसावी कारण या भारत देशात मला कळतंय असे जातपात विरहित आणि धर्मनिरपेक्ष पणे राज्यकारभार चाललेला कुठेच दिसून आला नाही. त्यामुळे मला जातीयवादी म्हणणारे अगोदरच जातीयवादी असतील त्यात तीळमात्र शंका नसेल. एकेकाळी राजा समाज असणाऱ्या या धनगर जमातीने आज स्वतःचीच अवस्था काय करून ठेवली आहे ते लोकसभा आणि विधानसभेच्या निकालातून स्पष्ट दिसून आलेच असेल. इ.स.च्या पूर्वीपासून या धनगर जमातीने हिंदुस्थानच नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावर जवळपास १८०० वर्षे राज्यकारभार केला होता. त्यावेळची सत्ताधारी आणि शक्तिशाली असलेली ही धनगर जमात आज गुलामगीरीचं जगणं जगत बसली आहे यापेक्षा सर्वात मोठे दुर्दैव काहीच नसावे.
जेव्हा बापूसाहेब कोकरे अर्थातच धनगरांचा क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेब नावाचे वादळ महाराष्ट्र राज्यात घोंघावत होते. तेव्हा त्या माणसाने स्वतःच्या घरादाराची राखरांगोळी करून यशवंत सेना स्थापन केली आणि त्या माध्यमातून बी.के.कोकरे साहेब महाराष्ट्र राज्यातील अखंड धनगर समाजाला जागे करत होते तेव्हा एका माजी मुख्यमंत्र्याला भरसभेतून सांगावे लागले की "बाबांनो या महाराष्ट्र राज्यातील जो धनगर समाज आहे तो धनगर समाज शांत निपचित झोपला आहे. त्या समाजाला तसेच झोपू द्या, हवं तर एकाऐवजी दोन दोन घोंगडी टाकून तसेच झोपी घाला. नाहीतर तो धनगर समाज जर जागा झाला आणि राजकारणात/सत्ताकारणात येऊ लागला तर आपल्याला आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना राजकारण करता येणार नाही." त्या गुरूचे शब्द शिष्याने नीट ध्यानात ठेवले आणि पहिला बळी घेतला तो क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांचा... प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या एखाद्या समाजाला अजून ४०-५० वर्ष मागे फेकायचे असेल तर त्या समाजाच्या नेतृत्वाचे खच्चीकरण करायचे आणि नेतृत्व संपवायचे ही चाणक्य नीती नव्हे तर पवार नीती आहे. असे इतिहासातील कितीतरी दाखले देता येतील. त्यातीलच एक म्हणजे खुद्द चाणक्याने चंद्रगुप्त मौर्य यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मगधचा राजा धनानंदाचा नाश केला. आजही महाराष्ट्र राज्यातील चाणक्याच्या वारसदारांनी धनगरांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून धनगरांचेच नेतृत्व संपवण्याचा प्रयत्न केला तो तर उघडच आहे.
खरंतर आम्ही अभिमानाने सांगतो की कधीकाळी अर्धा संसार घोड्याच्या पाठीवर लादलेल्या त्या घोड्याचा लगाम हातात धरून आई-बापासोबत माळराने, दगडधोंडे तुडवत, काट्याकुट्यातून अनवाणी पायाने वाट काढत चालणारी धनगर समाजातील युवा पिढी शिकली/सवरली आहे तीच युवा पिढी आज समाजाला आंधकारातून आणि अज्ञानाच्या खाईतून बाहेर काढेल. परंतु तसे झाले नाही उलट त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना दोन-चार शब्द शिकायला शाळेत पाठवणाऱ्या त्या आई-बापाचा विश्वासघात झाला आहे असे म्हणायला मला वावगे वाटणार नाही. अरे ज्या बापाने पायाच्या नडग्या वाळवत माळरानं तुडवली, जो पहाडासारखा शेळ्या-मेंढ्यामागे उभा राहिला. ऊन पाहिले नाही, वारा पाहिला नाही ना पाऊस... धो धो कोसळणाऱ्या पावसात सुद्धा तो उभा राहून मेंढ्या राखत होता तो दुसऱ्या तिसऱ्या कोणासाठी नव्हे तर माझा पोरगा शिकला तर सावलीतली ती पण खुर्चीवरची नोकरी करून आम्हाला सुख लावेल म्हणून... भरपावसात त्या बापाने घेतला असता थोडासा अडोसा आणि घेता ही आला असता, झोपला असता डेरेदार वृक्षाच्या सावलीखाली शांत निपचित पण काय करणार एखादा गावगुंड आला तर कोकरू उचलून घेऊन जाइल, एखादा लांडगा आला तर मेंढरू पळवून घेऊन जाइल मग मी माझ्या पोराला शिकवायचा कसा? त्याला अधिकारी बनवायचा कसा? पोरीचं लग्न करायचं कसं? हा विचार करत करत पोटाच्या तुंबड्या भरण्यासाठी आज इथे तर उद्या तिथे, जिथे रात्र होईल तिथे तीन दगडाच्या चुलीवर स्वयपाक करून अर्धीकोर खाऊन जमिनीचे अंथरूण आणि आकाशाचं पाघरून करून दगड उशाला घेऊन झोपणारे व पाऊस आला तर भरपावसात चवढ्यावर बसून रात्र रात्र काढणारे आई-बाप आमच्या समाजातील पोरांना आठवले नाहीत मात्र पुढच्या सात पिढ्या राजकारणातून बरबाद होऊ नयेत म्हणून एकदाच पावसात भिजत भाषण ठोकणारे शरद पवार त्या पोरांना बाप वाटले. इथंच आमच्या पोरांच्या शिक्षणाचा आणि त्यांनी शिक्षण घेऊन प्रगती करावी म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, त्यांच्यासाठी भर उन्हातान्हात, भर पावसात ठेचा खाणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टाचा पार सत्यानाश झाला.
समाजाला काय हवं आहे आणि काय दिले आहे प्रस्थापित नेत्यांनी? याचा आम्ही कधी विचार केलाच नाही ना...? कदाचित करणार पण नाही कारण आम्ही आमची बुद्धी दुसऱ्यांच्या बुटाखाली गहाण ठेवली आहे. म्हणूनच... या महाराष्ट्र राज्यात कोपर्डी मध्ये ज्या बहिणीची हत्या झाली तिच्या समर्थनार्थ प्रत्येक जिल्ह्यातून क्रांती मोर्चा, मूक मोर्चा निघाला त्या कोपर्डी घटनेचा निषेध आम्हीही केला, आमचेही धनगर समाजबांधव त्यात सहभागी झाले. कारण विषय माणूसकीच्या नात्याचा आणि कोपर्डीच्या बहिणीचा होता. मग पुरंदर येथे आमच्या मेंढपाळांच्या मुलीवर बलात्कार होतो तेव्हा कोणी साधा निषेधही करत नाही. तेव्हा कुठे जाते माणूसकी? तेव्हा कुठे असतात पावसात चिंब भिजून मजा घेत भाषण करणारे नेते? कुठे असतात जिजाऊंच्या लेकी? ज्या लोकसभा मतदारसंघात ती घटना घडली त्या मतदारसंघाची खासदार सुप्रिया सुळे कुठे होती? एक स्त्री असूनसुद्धा ती कधी विचारायला तरी तिथपर्यंत गेली का? धनगर नेत्यांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणी मॉसाहेबा जिजाऊचा शिवबा तिथे गेलाच नाही, नाही शिवबाचा मावळा तिथे पोहचला. मग त्या पिडीतांना कोण कोण भेटायला गेले होते, ज्या मेंढपाळांना मारहाण झाली त्यांना कोणी भेटी दिल्या? ज्यांच्या मेंढ्या कोणी उचलून नेल्या होत्या त्यांच्या मेंढ्या कोणामुळे परत मिळाल्या? कोण कोण मुंबईच्या विधनभवनात घुसून पुरंदरच्या ताईला न्याय मागत होते, कोणा-कोणावरती त्यासंदर्भात केसेस झाल्या ते बातम्या काढून बघा, मग विचार करा धनगर नेत्यांव्यतिरीक्त कोणी केसेस घ्यायला का नाही आला? ज्यांच्यावर केसेस झाल्या त्या महाराष्ट्र यशवंत सेनेच्या वतीने प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करून सांगितले होते की बाबांनो धनगरांचे राजकीय आस्तित्व धोक्यात आहे त्यामुळे धनगर उमेदवारांना निवडून आणा... मग कितीजणांनी त्याचे आचरण केले? का त्यांनीच काय मक्ता घेतलाय का? घरात बसून सोशल मीडियावर गप्पा मारायला कोणालाही आणि खूप जमतं पण... ग्राउंड लेव्हलला कधी तुम्ही संघर्ष केला आहे का? जो धनगर समाजातील प्रत्येक नेत्यांनी केला आहे. कोणी मदतीला आला नाही कोणी निषेध करायलाही आला नाही तरीसुद्धा त्या धनगर नेत्यांनी घातलेली बिरोबाची शपथ तुम्हाला आठवते पण धनगर समाजाचं वाटोळं ज्या प्रस्थापितांनी केले तेच तुम्हाला बाप वाटतात वाह! रे पोट्टे हो... आणि पुन्हा सांगत बसता बिरोबाने कोप केला म्हणून...? तुमच्या लाचारीचे, तुमच्या उचलेगिरीचे, अन्याय अत्याचार सहन करण्याचे बिरोबाला तरी चांगले वाटते का? पण काय बिरोबाच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहचलेले धनगर नेते दिसत नाहीत, बिरोबाच्या रूपाने विधानभवनात घुसून न्यायासाठी घोषणा केलेले महाराष्ट्र यशवंत सेनेचे मावळे कदाचित दिसले नसतील. कारण त्या पुरंदरच्या घटनेतील ती बहिण आम्हाला आमची कधी दिसलीच नाही पण तेव्हा नक्कीच दिसेल जेव्हा तुमच्या-आमच्या पैकी स्वतःची बहिण तीच्या जागी असेल... तेव्हा धनगर नेत्यांच्या नावाने खडे फोडू नका म्हणजे झालं. परंतु इथून पुढच्या काळात एखाद्या मेंढपाळाची मेंढरं एखाद्याच्या शेतात गेली तर मारहाण झाल्यावर मुडदे जरी पडले तर कोण येणार आहे का विचारायला? तुमच्या-आमच्या आई-बहिणींची जरी अबू लुटली तर कोण येणार आहे का वाचवायला? तुमच्या जमिनी लुबाडल्या नरडीवरुन फासाचा नांगर जरी चढवला तर आता कोण आहे का तुम्हाला विचारायला? एकवेळ अशी होती जेव्हा ना.प्रा.राम शिंदे साहेब आणि ना.महादेवजी जानकर साहेब मंत्री होते तेव्हा मी स्वतः मंत्रालयात जाऊन त्यांच्या ऑफिसमधून फोन करायला लावले होते. पण आता अशा घटना घडल्यानंतर सांगायचे कोणाला? बोलायचे कोणाला? पावसात भिजत भाषण ठोकणाऱ्यां त्या बापाला धनगरांची एवढी काळजी असती तर स्वतःच्या पोरीला पुरंदरच्या त्या आमच्या ताईची विचारपूस पाठवले नसते का?
दोन-चार शब्द लिहायला वाचायला शिकला, पुण्या-मुंबई सारख्या शहरात राहिला, दोन-चार रूपडं कमवायला लागला म्हणजे तुम्हाला फार मोठी अक्कल यायला लागली असे होत नाही. परिवर्तन हा निसर्गाचा नियम असला तरी ५ वरून १ वरती येणे म्हणजे परिवर्तन नव्हे तर राजकारणापासून परावर्तन होय. राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने जाऊ द्यायचे असते भले ते भावनिकतेवरती चालत नसते हे जरी मान्य असले तरी प्रस्थापितांच्या गुलामगीरीचं ओझं कधीपर्यंत वाहायचं, अन्याय अत्याचाराच्या रहाटगाडग्यात कधीपर्यंत पिचत राहायचे? हे जर समजत नसेल तर त्या शिक्षणाचा काय अर्थ? जे शिक्षण आई-वडिलांनी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून तुम्हा-आम्हाला दिले. इथली प्रस्थापित व्यवस्था धनगर समाजातील नेतृत्व संपवण्यासाठी चंग बांधून बसली होती हे सर्वज्ञात असताना आपल्याच समाजातील खुळचट मंडळी स्वतःचाच आणि स्वतःच्या समाजाचा तमाशा उघड्या डोळ्यांनी पाहत बसत असतील तर धनगर समाजाचे २०१४ ला ५ आमदार विधानसभेत गेले होते त्यावरून ते २०१९ ला १ वरतीच येणार आणि हे असेच जर चालत राहिले तर २०२४ ला इतिहासात जमा होणार. राजकारणाच्या चाली एकट्या पवारांनी अथवा पेशव्यांच्या औलादींनी खेळाव्या असे नाही तर धनगर समाजाचा एखादा नेता अशी चाल खेळला तर भावनिक व्हायचे नसते. वस्तुस्थिती अशी आहे की धनगर
नेत्याचे आपणच असे खच्चीकरण करत असतो की शरद पवारांची आणि ब्राह्मणांची चाणक्य नीती आपल्यावर कधी लागू झाली तेच कळत नाही. कारण आम्ही अभ्यास करत नाही, इतिहास वाचत नाही. फक्त तडकाफडकी निर्णय घेऊन मोकळे होतो आणि निकाल हाती आल्यावर त्याच धनगर नेत्यांच्या नावाने तुणतुणे वाजवत बसतो हीच का आमची राजकीय प्रगल्भता? हीच का आमची सामाजिक आणि वैचारिक प्रगल्भता? यास नेते सुध्दा अपवाद नाहीत ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत जेवढा समाज जबाबदार आहे... एखादा सांगायला गेला तर तो फार शहाणा वाटतो परंतु जो सांगतोय तो अभ्यास करूनच विचार करूनच सांगतोय याकडे लक्ष नसते. फक्त अहंकार नसानसात ठासून भरलेला असतो. आणि तोच अहंकार आज धनगर समाजाचा सर्वात मोठा शत्रू होऊन बसलाय.
खरंतर संघर्षातून पुढे आलेले नेतृत्व कधी संपत नाही. जरी धनगर समाजातील नेते निवडणुकीत पडले असतील पण ते हरले नाहीत आणि हरणार सुद्धा नाहीत. खरंतर प्रस्थापितांच्या पवार नीतीमुळे नेत्यांचेच नाही तर अखंड धनगर समाजाचे फार मोठे नुकसान होत आहे हे जर शिकलेल्या सवरलेल्या युवा पिढीला कळत नसेल, अन्यायची चीड येत नसेल तर काबाडकष्ट करून, भटकंती करण्यासाठी गेल्यावर शेतकऱ्यांच्या शिव्याशाप खाऊन तुम्हा-आम्हाला शहाणपण यावं म्हणून शिकवणाऱ्या आई-बापाचं कष्ट हे निरर्थक म्हणावे लागेल. जर समाजाचा विकास करायचा असेल/प्रगतीपथावर जायचे असेल तर समाजाला राजकारणाशिवाय दुसरा तिसरा कोणताही मार्ग नाही. अजून कधीपर्यंत झोपेचं सोंग घेऊन बसणार आहात? अजून कधीपर्यंत अन्याय सहन करणार आहात? आतातरी डोळ्यावरचं घोंगडं बाजूला करा आणि घोंगड्याची ताकद दाखवून द्या. त्यासाठी "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा" हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवूनच एक व्हा, नेक व्हा.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंत!
✍️️नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
📱+918530004123

👌👌👌👌
ReplyDelete