Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Wednesday, 4 October 2017

काय चुकले माझे?? : कवी राजू झंजे

             
 प्रस्तावना
 शुक्रवार दि.२९ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी मुंबई येथिल  पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन रोड स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत व्यक्तिंच्या भावना अचूक शब्दात मांडून, खेड्यापाड्यातून टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तिचं स्वप्न आणि त्याच्या वाट्याला आलेले अर्थातच नियतीलादेखिल मान्य नसणारं दु:ख काय असते याची जाणीव करून देणारी काव्यरचना परखड मताचे कवी राजू झंजे यांनी त्यांच्या  "काय चुकले माझे?" या काव्यात केली आहे. खरंतर हे नुसते काव्य (कविता) नसून त्या प्रत्येक मुंबईकरांच्या ह्रदयातील जणू भावना आहेत. हे काव्य वाचल्यावर रसिकमित्रांच्या डोळ्यांत नक्कीच पाणी उभे राहील.
             ✍️नितीनराजे अनुसे
             (लेखक व व्याख्याते)
                  ७६६६९९४१२३

        काय चुकले माझे ???
         
  काय चुकले माझे ?
  घडला काय माझा गुन्हा ?
  कोणी शासनावर ओरडा आता ,
  कोणी रेल्वे प्रशासनाला कुचकामी म्हणा  ;
  पण माझे जीवन  आता नाही पुन्हा !

          टीचभर पोटाची खळगी भरण्या ,
           दूर गावावरून आलो होतो  ;
          धकाधकीच्या जीवनात एकरूप होऊन ,
          पक्का मुंबईकर झालो होतो !

गोरगरिबीतच वाढलो ,
पण स्वप्ने खूप पाहिली होती  ;
जन्मदात्या मात्या - पित्यांना अजून ,
"मुंबई" दाखवायची राहिली होती !

           आता कसली मुंबई ,
            अन कसले काय ;
            हंबरडा फोडून रडत असेल ,
            आता माझी माय !

खूप कष्टाने वाढवले होते तिने ,
स्वतःच्या पोटाला चिमटा काढून  ;
शक्य  असते तर आलो असतो ग आई ,
तुझ्यासाठी हे आस्मान फाडून !
 
             माफ कर आई मला ,
             तुझी स्वप्न पूर्ण करू शकलो  नाही  ;
             राब - राब राबायचो आई या मुंबापुरीत ,
             पण कधीच थकलो नाही !

पण आज मी थकलो आई ,
असंख्य पायदळी तुडवला गेलो  ;
गोऱ्यापान अंगाचा मी
आज काळा - निळा झालो !

            उसंत हि मिळाली नाही ,
            क्षणभर कण्हण्यासाठी  ;
            तोंड हि उघडता येईना मला ,
            शेवटचे " आई" म्हणण्यासाठी !

आता नेमतील समित्या ,
दुर्घटनेतील सत्य  जाणण्यासाठी  ;
पण मुंबईकरांचा जीव नेहमीच मुठीत आहे ,
"काय चुकले माझे?" म्हणण्यासाठी !

                  कवी राजू दादासाहेब झंजे
                          ९५९४८१५५८५

Sunday, 1 October 2017

माझा वाढदिवस साजरा करू नका : गोपीचंद पडळकर

महाराष्ट्र राज्याचा बुलंद आवाज गतिमान युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचा आज दि. १ आॅक्टोबर रोजी वाढदिवस त्यानिमीत्ताने या लाडक्या नेत्याला खरंतर वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. परंतू माझा वाढदिवस साजरा करू नका असे आवाहन मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी त्यांच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना गोरगरीब कष्टकरी व शेतकरी जनतेला केले आहे. त्याचे कारण असे की आटपाडी तालुक्यात एवढा पाऊस पडून देखिल दुष्काळ सदृश परिस्थिती अजूनही जशीच्या तशीच आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुका हा खरंतर माणदेशातला एक भाग नेहमीच दुष्काळाच्या छत्रछायेखालचा प्रदेश दगडधोंडे आणि माळरानांनी व्यापलेला हा प्रदेश हिरवळीने नटलेला आम्हीतरी जन्मापासून कधी पाहिलाच नाही. कदाचित पर्जन्यवृष्टीची वक्रदृष्टी या माणदेशावर झाली असावी म्हणूनच माणदेश दुष्काळाच्या झळया सोसत आहे. त्याच माणदेशातला तरूणडफदार युवक राजकारणात येतो व राजसत्ता आणि राजपाथ कधीही मागून मिळत नसतो तर तो नेहमीच हिसकावून घ्यायचा असतो असे सांगत कोणताही राजकीय वारसा नसताना सत्ता तसेच कोणतेही पद नसताना सन २००७ पासून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी अनेक विकासकामांचा अक्षरशा डोंगर उभा केला. जनतेच्या हितासाठी, गोरगरीबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या विकासासाठीच मी जन्म घेतला आहे असे सांगतानाच ते नेहमीच त्यांच्या सभेतून म्हणतात की जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय हा मिळालाच पाहिजे.
२००७ पासून आज २०१७ पर्यंत एकूण १० वर्षांच्या कार्यकिर्दीत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात अनेक संकटांना तोंड देत तसेच प्रस्तापित व्यवस्थेच्या विरोधात (अर्थातच प्रवाहाच्या विरोधातील) सर्वात मोठा संघर्ष कोणी केला असेल तर युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांचे नाव सर्वात पुढे येते. मग तिथे शेतकऱ्यांच्या हिताचा प्रश्न असो, प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून गोरगरिब कष्टकरी जनतेचा अथवा विद्यार्थ्यांची कोणतीही समस्या असेल तर रात्री अपरात्री त्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता म्हणजे गोपीचंद पडळकर साहेब यांची ओळख आहे. आटपाडीतील जनता पाण्यावाचून तडफडत होती तेव्हा टेंभूच्या कार्यालयाची तोडफोड करून गोपीचंद पडळकर यांनी न्याय मागितला होता, माजी मंत्री जयंत पाटील यांची गाडी अडवून पाण्याचा जाब विचारला, माजी केंद्रीय कृषिमंत्र्यांची गाडी आडवण्याचे आवाहन दिले होते पण शरद पवार घाबरूनच भिवघाटमार्गे तासगावला पळून गेले, एका रात्रीत राजेवाडी तलावाचा डावा कालवा फोडून ते पाणी आटपाडीकडे वळवले अशी एक ना अनेक आंदोलने, मोर्चे, रास्तारोखो करून कोणतेही पद नसताना सत्ता नसताना पडळकर साहेबांनी शेतकऱ्यांसाठी कामे केली तेव्हा गोपीचंद पडळकर साहेब यांच्यामुळे प्रस्तापित व्यवस्थेला जबरदस्त सुरूंग लागला म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकण्यापर्यंत आर.आर.पाटील सुद्धा ...ला पाय लावून पळत होते हे अख्ख्या महाराष्ट्र राज्याने पाहिले आहे. एवढेच नव्हे तर आटपाडी-खानापूरच नव्हे तर सांगली जिल्ह्यांच्या राजकारणातला काटा बाजूला करावा म्हणून त्यांच्यावर खोट्या केसेस टाकून पार जिल्हाहद्दपारीची नोटीस देखिल बजावली होती परंतू या कृत्याबद्दल प्रांताधिकारी यांनी प्रस्तापित व्यवस्थेला चांगलेच खडेबोल सुनावले व जिल्हाहद्दपारीची नोटीस रद्द केली होती. जो जनता के लिए लढतां है जनता उसी का साथ देता है। त्यामुळे गोपीचंद पडळकर साहेब यांचा पाण्यासाठीचा लढा हा स्वताची शेती भिजवण्यासाठी नव्हता तर आटपाडी तालुक्याची तहान भागावी म्हणून होता... आणि अजूनही त्यांचा लढा अविरतपणे चालू आहे.
गोपीचंद पडळकर साहेब यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करून सांगितले आहे की माझा वाढदिवस कुठेही साजरा करू नका, कुठेही डीजीटल फ्लैक्स, फेटे, केक, हार, तुरे (पुष्पगुच्छ) या गोष्टींवर निरर्थक पैसा खर्च करू नका त्याऐवजी एखाद्या गरजूंना मदत करा. तुमच्या शुभेच्छां आणि तुमचे प्रेम सदैव माझ्यासोबत आहे त्यामुळे शुभेच्छा देण्यासाठी वेळ पैसा खर्च न करता त्याऐवजी गोरगरिब जनतेची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची सुखदुःख जाणून घ्या शक्य तेवढी त्यांना मदत करा. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून माझ्या बळीराजाच्या अडीअडचणी समजून घ्या प्रशासन विभाग असो मंत्रालय असो तिथे तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा त्यांचा पाठपुरावा करा. शासकीय योजना सर्व तळागळातील जनतेपर्यंत पोहचवा, सध्या बेरोजगारी वाढत चालली असून रोजगारवाढीसाठी रोहयो सारख्या उपयुक्त असणाऱ्या योजनांची माहिती मिळवून त्या योजना आमलात आणा. औद्योगिकीकरणामुळेच देशाचा विकास होतो म्हणून तरूण-तरुणींनी औद्योगिकीकरणाकडे वळावे. राष्ट्रमाता अहिल्याईंचा आदर्श अख्ख्या जगाने घेतला त्याच राष्ट्रमातेचा आदर्श घेऊन झाडे लावा झाडे जगवा ची योजना कागदोपत्रापुरतीच मर्यादित न ठेवतां आमलात आणा. पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेखाली शेततळे, बांध, बंधारे बांधण्यासाठी सरकार खात्यातून निधी घ्या व शेतात जास्तीत जास्त पाण्याचा साचा. निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. माझ्या वाढदिवसासाठी खर्च करायचाच असेल तर मुलींच्या जन्माचे स्वागत करा, मुलींच्या सुरक्षेसाठी मुलींना तायक्वांदो, कराटे ज्यूडो यांचे मोफत प्रशिक्षण द्या. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी तोट्या बसवा, जणावरांसाठी जास्तीत जास्त चारा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पुस्तके पेन वह्या यांचे वाटप करा. तरूणांना नोकरी तसेच उद्योग क्षेत्रांतील माहितीसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करा. सामाजिक प्रबोधन तसेच जागृती करा अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी प्रेरित करा. एकमेकांच्या मदतीला धावून जा असे केले तर प्रत्येक दिवस हा माझा वाढदिवस साजरा केल्यासारखाच आहे असे गोपीचंद पडळकर साहेब म्हणाले.
मनासारखा नेता आणि राजासारखं मन असलेला हा सर्वसामान्यातील एक असामान्य नेता, तरूणतडफदार गतिमान युवा नेतृत्व, महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तथा युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा.  गोरगरिब जनतेच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या हातून असेच कार्य घडो हीच मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना🙏
💐💐💐💐💐💐💐💐
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Tuesday, 26 September 2017

आरेवाडीत उद्या दसरा मेळावा

गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षी देखिल उद्या बुधवार दि.२७ आॅक्टोबर २०१७ रोजी श्री क्षेत्र बिरोबा बन आरेवाडी येथे भव्य दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. विखूरलेला समाज एकत्रित यावा आणि समाजाचे वैचारिक प्रबोधन व्हावे या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्याची मुलूखमैदानी तोफ तसेच युवकह्रदय सम्राट मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. त्यासाठी विवीध जिल्ह्यात बैठका पार पडल्या असून लाखोंच्या संख्येने समाजबांधव या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी देखिल ७ आॅक्टोबर २०१७ रोजी दसरा मेळाव्याला लाखोंच्या संख्येने समाजबांधव व धनगर समाजातील सर्वच नेते एकत्रित आले होते. परंतू यावर्षी सर्वपक्षिय बहुजन समाजाचा दसरा मेळावा भरवण्याचे धाडस मा.गोपीचंद पडळकर साहेब यांनी केले आहे. गेल्या वर्षी धनगर मेळावा आणि यावर्षी बहुजन मेळावा का? गेल्यावर्षी आयोजक धनगर समाज आणि यावेळी स्वता संयोजक गोपीचंद पडळकर साहेब असे का?  अशा चर्चांना सर्वत्र उधाण आले आहे. आणि त्यालाच तेल-चटणी-मीठ लावून अर्थाचे अनर्थ काढून राजकीय सूड घ्यायची प्रवृत्ती जरा जास्तच वाढत चाललेली पाहून थोडंसं लिहावसं वाटलं म्हणून केलेला हा लेखप्रपंच....
या दसरा मेळाव्याच्या आडून त्यांना आमदारकी किंवा खासदारकी मिळवायची नाही आणि मिळवायचीच असेल तर ते स्वताच्या हिंमतीवर मिळवतील ते त्यांच्या कर्तृत्वातून दिसून येत आहेच. राजकारण आणि समाजकारण हे कितीही वेगळं म्हणत बसलो तरी भारतासारख्या जातीयवादी विचारांच्या देशात त्यांची नाळ एकमेकांशीच जोडलेली आहे. धर्मनिरपेक्ष राज्यकारभार हा फक्त नागरिकशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात वाचायला भेटतो मात्र वास्तवात धर्मनिरपेक्ष कुठेही आणि कधीच दिसत नाही आणि असेल तर धर्मनिरपेक्ष राज्यकारभार कुठे चालू आहे ते दाखवून द्यावे हे माझे खुले आवाहन.... राजकीय नेत्यांचेच काय घेऊन बसलाय जर राजकारण करायचे असेल तर अगदी तुम्ही स्वता सुद्धा नुसतंच समाज समाज करत बसाल तर तुमचे राजकीय भवितव्य हे अंधारातच राहील शिवाय धनगर समाजाचे नेतृत्व पुढं यायला देखिल वेळ लागेल. आज समाजासमोर अनेक आवाहने आहेत परंतू नेतृत्वाचा अभाव असल्याने ही आवाहने पुढच्या पिढीला देखिल त्रासदायक ठरू शकतात अर्थातच पुढच्या पिढीचे देखिल भवितव्य धोक्यात येऊ शकते. धनगर समाजातील सामाजिक संघटना या केवळ समाज समाज करू शकतात, समाजासाठी आंदोलन मोर्चा सर्व काही सामाजिक संघटनांना करता येते. कदाचित सामाजिक बांधिलकी असेल तर राजकीय नेते समाजाच्या मोर्चात सहभागी होऊ शकतातही पण अन्य वेळी इतर समाजाला सुद्धा सोबत घेऊन जावे लागते तेव्हा खरे नेतृत्व समाजासमोर येते..... तर आणि तरच राजकारणाच्या माध्यमातून समाजाच्या विकासाला/जडणघडणीला हातभार लावता येतो. मग तिथे धनगर अथवा कोणीही नेता असो त्यासाठी आजपर्यंतच्या आमदार खासदारांचा इतिहास वाचून बघा... म्हणून अखंड बहुजन समाजाचे वैचारिक प्रबोधन करून समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याची भीष्मप्रतिज्ञा गोपीचंद पडळकर या तरूण तडफदार युवा नेत्याने केली अाहे. परंतू मागच्या एक आठवड्यापासून पाहतोय की समाजात ज्या प्रकारच्या उलटसुलट चर्चा चालू आहेत त्यातून नेतृत्व खोडून टाकण्याचा सरळसरळ प्रयत्न चालू असल्याचे एक षडयंत्रच दिसून येते आहे. एका दृष्टीने पाहिले तर दिड ते दोन कोटी धनगर समाजाच्या लोकसंख्येच्या तुलनेत केवळ एकच खासदार तर हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच आमदार महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत आहेत. कणखर दमदार कर्तृत्ववान असे नेतृत्व तयार करायला, नेतृत्व घडायला फार वेळ लागतो परंतू सोशल मिडीयासारख्या माध्यमांतून तेच नेतृत्व खोडायला फार वेळ वागत नाही पण ज्यांच्या रक्तातच कर्तृत्व आणि  नेतृत्व ठासून भरलेले असते ते नेतृत्व सहजासहजी खोडतां येत नाही हे देखिल तितकेच सत्य आहे. म्हणून समाजबांधवांना माझी विनंती आहे की ज्यांना कोणाला दसरा मेळाव्यासाठी जायचे नसेल तर त्यांनी जाऊ नका परंतू एकमेकांची जिरवाजिरवी करण्याच्या नादात चुकीचे मेसेजेस करून समाजात गैरसमज पसरवू नयेत. समाजातील नेतृत्व जेवढे वाढेल तेवढे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर आहे म्हणून समाजातून जास्तीत नेतृत्व तयार करा पण खोडू नका हीच नम्र विनंती.
पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday, 25 September 2017

पै संदीप रासकर यशस्वी उद्योजक पुरस्काराने सन्मानित



कडेगाव तालुक्यांतील पैलवानकी क्षेत्रातील रासकर कुटूंब हे एक नावाजलेले प्रसिद्ध कुटूंब आणि या कुटुंबाला स्व.पै.खाशाबा रासकर यांच्याकडून लाभलेला पैलवानकीचा वारसा आणि याच जोरावर सिनेसृष्टीला देखिल भुरळ पाडणारा आंतरराष्ट्रीय खिलाडी कुस्तिपट्टू अर्थातच कुस्त्यांमधला जादूगार म्हणून ज्यांना ओळखले जाते असे पै.कृष्णा रासकर उर्फ आप्पा आणि पै.धनाजी रासकर यांचा पुतण्या व स्व.पै.खाशाबा रासकर यांचे नातू धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते पै.संदीप रासकर यांना कडेगाव मित्र मंडळ पुणे यांच्या वतीने यशस्वी उद्योजक या पुरस्काराने काल दि.२४ सप्टेंबर २०१७ रोजी सन्मानित करण्यात आले. औद्योगिक क्षेत्रात गरूडझेप घेऊन अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने व बेरोजगारांच्या भाकरीचा प्रश्न मिटवल्याने त्यांना यशस्वी उद्योजक या पुरस्काराने गौरवण्यात आले. पाठीमागे स्व.शांता खाशाबा रासकर यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्याच घरातील त्यांचा नातू पै.संदीप रासकर यांना यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळाल्याने रासकर कुटूंब चांगलेच चर्चेत आले आहे. गरिबीच्या झळया सोसून स्वकष्टातून नावारूपास आलेले हे रासकर कुटूंब हे जीवनाचा खडतर प्रवास करून यशाच्या शिखरापर्यंत पोहचल्यावर खरंतर सर्वसामान्यांसाठी रासकर कुटूंब जणू आदर्शच ठरत आहे. आज या कुटूंबातील संख्या ही जवळपास ४० च्या घरात असून देखिल या रासकर कुटूंबाने एकत्रित कुटूंबाचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यामुळे या कुटूंबाचे कौतुक करावे तेवढे थोडेच पण यापुढेदेखिल पै.संदीप रासकर यांनी अशीच गरूडझेप घ्यावी व समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी लढा उभारावा तसेच बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास असेच प्रयत्नशील राहावे त्यासाठी मल्हारी मार्तंड त्यांना बळ बुद्धी व चातुर्य देवो हीच प्रार्थना व यशस्वी उद्योजक पुरस्कार मिळल्याबद्दल पै.संदीप रासकर यांचे त्रिवार अभिनंदन.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

कडक प्रहार

तुम्हाला एखादी गोष्ट आवडली तर त्यासाठी अवश्य लढा द्या,
पण जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर पूर्वीपेक्षाही अन्यायाच्या विरोधात अधिक तीव्रतेने लढा द्याल तरच तुम्हाला न्याय मिळेल.
-नितीनराजे अनुसे

Sunday, 24 September 2017

वाळवा तालुक्यात मंत्र्यांना बंदी : सागर मलगुंडे

सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव द्यावे अशी मागणी सातत्याने होत आहे. परंतू सोलापूर विद्यापीठाला राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिल्यास जातीय तेढ वाढेल असे बिनबुडाचे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले होते त्यानुषंगानेच अहिल्या भक्तांच्या भावना भडकल्या. या प्रकाराच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दि.२८ आॅगस्ट रोजी लाखोंच्या संख्येने विराट मोर्चा निघाला व १५ दिवसांचे अल्टीमेटम देऊनही सरकार दरबारी दखल घेतली जात नसेल तर मग मूग गिळून गप्प बसायला आमची काय **ची औलाद नव्हे. त्याचाच परिणाम म्हणून सोलापूर येथे विनोद तावडे यांच्यावर भंडारा उधळून धनगर समाजाच्या पाच वाघांनी त्यांचा निषेध केला होता त्यांची नावे अशी की शेखर बांगळे 
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि 
5. म्हाळाप्पा नवले
तर सातारा येथे विनोद तावडेंवर बुक्का उधळणारा धनगराचा वाघ
6. मारूती जानकर
आम्ही आमच्या औकातीवर आलो तर काय करू शकतो आणि काय नाही याचा विचार कोणी करू शकत नाही त्यामुळे आमच्या नादाला लागू नका असे आवाहान करत सांगली जिल्ह्यातील वाळवा (इस्लामपूर) तालुक्यात एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही आणि जर एखादा फिरला तर त्याची गाडी फोडल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही असे आवाहन यशवंत युवा सेनेचे सांगली जिल्हा उपप्रमुख मा.सागर (भाऊ) मलगुंडे यांनी केले आहे. 
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Friday, 22 September 2017

पुन्हा एकदा धनगरी हिसका: सोलापूर विद्यापीठ नामांतरण लढा

सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले तर जातीय तेढ वाढेल असे प्रतिपादन करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अर्थातच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुन्हा एकदा धनगरी हिसका अनुभवला. काही दिवसांपूर्वीच सोलापूर येथे शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे यांच्यावरती भंडारा उधळून अहिल्याभक्तांनी नामांतरण लढ्याची खदखद व्यक्त केली होती. त्यानंतर तरी सरकार ताळ्यावर यायला हवं होतं पण तसे काहीच झाले नाही याचा अर्थ राज्य सरकारला धनगर समाजाच्या मागण्यांशी काहीच देणे घेणे नाही. केवळ धनगर समाजामुळेच भाजप सरकार आज सत्तेत आहे असे स्वता मुख्यमंत्री यांनी अनेक जाहिर सभेतून वक्तव्य केलेले आहे आणि हे सत्य देखिल आहे हे कोणी नाकारू शकत नाही. परंतू ज्या धनगर समाजाच्या जिवावर हे बहाद्दर सत्तेवर आले त्या धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवायला हे सरकार कधीच कमी पडले नाही. आश्वासनांवरती आश्वासने देऊन धनगर समाजाच्या मागण्या कधीच पूर्ण न करण्याची शपथच जणू या सत्ताधाऱ्यांनी खाल्ली आहे. मग धनगर समाजाच्या संयमाचा पारा वाढणारच आणि शेवटी संयम सुटल्यावर काय होते ते सोलापूर येथे विनोद तावडेंनी अनुभवले होते पण आज पुन्हा एकदा सातारा येथे मारोती जानकर नावाच्या धनगराच्या वाघाने विनोद तावडेंवर बुक्का फेकून नामांतरण लढ्याचा आक्रोश व्यक्त केला.
धनगर आरक्षणाचे आणि सोलापूर विद्यापीठाच्या नांमांतरणाचे गाजर दाखवून सत्ता हडपली खरी पण जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही आणि सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार आणि फिरला तर काय अवस्था होते याचा अनुभव त्यांना आलाच आहे. सरकार माय बाप हो आतातरी ताळ्यावर या आणि आमच्या मागण्यांची पुर्तता करा नाहीतर आम्ही पेटलेले आहोत मग तुम्हाला पेटवायला आम्ही कमी पडणार नाही.
धनगर समाजबांधवांनो एक विचार सदैव लक्षात राहूद्या आणि त्या विचारावरती मार्गक्रमण करा...
जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा पण न्याय मात्र मिळालाच पाहिजे.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 20 September 2017

वाघांनो तुम्हाला मानाचा पिवळा जय मल्हार


एकदा मागून पाहिलं दोनदा मागून पाहिलं एवढंच नव्हे तर अनेकदा मागून पाहिले पण सोलापूर विद्यापीठाला लोककल्याणकारी राष्ट्रमाता अहिल्याईंचे नाव द्यायला आडदांड सरकार राजीच होत नाही. नेहमीच आश्वासनांवरती आश्वासने देवून अक्षरशा आश्वासनांचा अगदी महापूर येऊन धडकला तरी निर्दयी सरकार मात्र शांतच बसले आहे तेव्हा धनगरांच्या संयमाचा बंधारा फार काळ टिकणार नव्हता आणि शेवटी तेच झाले धनगर समाजाचा संयम अखेर सुटला... काल परवा अखंड महाराष्ट्र राज्याने याची देही याची डोळा दुरदर्शन, वर्तमानपत्र तसेच सामाजिक माध्यमातून (सोशल मिडीयातून) पाहिले. आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी शिक्षणमंत्री ना.विनोद तावडे हे सोलापूर येथे आले असताना मंचावरून भाषण करत होते तेवढ्यात विद्यापीठाच्या नामांतरण संदर्भात घोषणा देत व यळकोट यळकोट जय मल्हार असा जय जयकार करत मल्हार मावळ्यांनी सभागृह दणाणून सोडले. शिक्षणामंत्र्यांच्या निषेधार्थ पत्रके भिरकावली व भंडारा देखिल उधळला. पिवळ्या भंडाऱ्याची ताकद काय असते हे लवकरच समजेल सत्ताधाऱ्यांना पण ज्या यशवंतसैनिकांनी भंडारा उधळला त्या पाच वाघांची अर्थातच स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या वारसदारांची नावे पुढीलप्रमाणे
1. शेखर बांगळे
2. उमेश काळे
3. शरणू हांडे
4. महेश घोडके आणि
5. म्हाळाप्पा नवले
या पाच वाघांना मानाचा पिवळा जय मल्हार व त्यांचे त्रिवार अभिनंदन. खरंतर कौतुक करावे तेवढे कमीच पण  क्रांतीसुर्य स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या विचारांचा वारसा असाच जपत रहा ही खरी काळाची गरज आहे. तरच समाजाला न्याय मिळू शकतो, धनगर समाज अन्यायाच्या साखळदंडातून मुक्त होऊ शकतो. जर तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर त्यांच्या तोंडात वाजवून न्याय मिळवू या विचाराचे आम्ही आहोत हे एकदा सरकारला दाखवून दिले आणि इथून पुढे देखिल असेच दाखवून देऊ.
अगोदर कितीतरी वेळा सांगितले पण त्यांना समजले नव्हते म्हणून आता सांगतो की, सर्व गोष्टीला अंत होता म्हणूनच धनगर शांत होता पण एक लक्षात ठेवा आता आमची शांतता भंग झाली आहे त्यामुळे आता पेटलेला एकेक धनगर महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही.
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
       ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Wednesday, 13 September 2017

यळकोट यळकोट जय मल्हार

अटकेपार झेंडे फडकावून
राखिले आणि रक्षिले दिल्लीचे तख्त
    आता पुन्हा उठा आणि खेळवा
           तुमच्या नसानसात
    मर्द धनगरांचे सळसळते रक्त
-✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com

Monday, 11 September 2017

वाढदिवस आमच्या रामभाऊंचा


समाजाविषयी तळमळीने संशोधन आणि लेखन करणारे धनगर समाजाच्या प्रश्नांचे गाढे अभ्यासक, समाज प्रबोधक, थोर विचारवंत, धडाकेबाज व्याख्याते, थोर समाजसेवक तसेच आमचे मार्गदर्शक बंधूतुल्य परममित्र यशवंत सेनेचे सरचिटणीस मा.रामभाऊ लांडे साहेब यांना वाढदिवसाच्या हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!
💐💐💐💐💐💐💐
मा.रामभाऊ लांडे साहेब यांच्या कार्यावरती आणि जिवनावरती लिहावं तेवढं कमीच आहे हे सर्वांना ज्ञातच आहे तरीही त्यांच्या हातून असेच अभूतपूर्व आणि अतुलनीय समाजकार्य घडो हीच त्यांच्या वाढदिवसानिमीत्त मल्हारी मार्तंड चरणी छोटीशी प्रार्थना🙏🙏🙏
जय मल्हार! जय अहिल्या! जय यशवंतराजे!!!
शुभेच्छूक,
        ✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +917666994123
nitinrajeanuse123.blogspaot.com
Email :- nitsanuse123@gmail.com