आज आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे अरे जग जिंकायला निघालेल्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावृत्त करणार्या आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य यांच्या जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी, आशिया खंडावर अधीपत्य गाजवणार्या राजा सम्राट अशोकांचे तुम्ही-आम्ही वारसदार, अटकेपार झेंडे फडकवणारे धुरंदर लढवय्यै राजे मल्हारराव होळकर, रणरागीणी अहिल्यामाई होळकर, महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर, वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर पुरुषांचे मर्द मावळे आणि ज्यांनी आई-बहिणींच्या रक्षणासाठी अन्यायाविरोधात कुर्हाड उगारून तब्बल ३५ खून करून १४ वर्ष तुरूंगवास भोगला तरी आजही निर्दोष असलेल्या त्या बोरगावचा ढाण्या वाघ बापू बिरु वाटेगावकर म्हणजेच आमचे लाडके आप्पा आणि धनगर समाजाला जागं करुन आमच्या हातात क्रांतीची मशाल देणारे यशवंत सेनेचे संस्थापक स्व. बी के कोकरे साहेब यांच्याच जातीत जन्माला आलेल्या तुम्ही-आम्ही औलादी आज अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून आज प्रस्तापितांकडे भिक मागत बसलोय याची आम्हाला खरंतर लाज वाटायला पाहिजे.
आमचे पुर्वज, थोर महापुरुष जर वरतून आमच्या नेत्यांच्या आणि समाजबांधवांच्या असल्या या पोरकट लीला बघत असतील तर कदाचीत वरतून थुंकत असतील ते आमच्यावर... त्यांनाही खेद वाटला असेल अरे कोणत्या समाजात आपण जन्माला आलो म्हणून डोकं फोडून घेत असतील. अरे ज्यांना आपल्या न्याय व हक्कासाठी संघटित होऊन एकत्रितपणे लढता येत नाही झगडता येत नाही त्यांना अशा थोर महापुरुषांचे वारसदार म्हणायचं तरी कसं? " मल्हार आया मल्हार आया म्हटलं तर अफगाणीस्तानच्या अब्दालीला देखिल कापरं भरायचं. दुश्मनांचे डेरेच्या डेरे ओस पडायचे, तोंड कुठ लपवायचं हे शत्रुंना समजत नव्हतं अशा मल्हाररावांचे मावळे आम्ही... त्याचप्रमाणे "हे राज्य माझ्या पुर्वजांनी तलवारींशी खेळून प्रसंगी रक्त सांडून मिळवलेलं राज्य आहे. आणि मला एक अबला स्त्री समजून हे राज्य जर तुम्ही स्वताच्या घशात घालायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला साखळदंडाने बांधून हत्तीच्या पायी देईन नाहीतर सुळावर लटकवेल ....तरच मी मल्हारराव होळकरांची सून." अशा निर्भीड शब्दांत पेशव्याला खडसवणार्या अहिल्यामाईंचे मर्द मावळे म्हणवून घ्यायला आज आम्हाला लाज वाटायला पाहिजे.
अरे आज एवढं षंढ झालात तरी कसे?? कुठे गेला तो आमचा मल्हारी बाणा?? नुसत्याच महापुरूषांच्या जयंत्या आणि पुणतिथ्या साजर्या करत बसायचं का?? नुसतंच महापुरुषांच्या फोटोंची जंगी मिरवणूक काढून लाखो रुपये उधळपट्टी करुन धांगडधिंगा घालायचे धंदे आतातरी बंद करा. महापुरुषांचे विचार त्यांचा इतिहास आणि त्यांचे कार्य डोक्यात घालायला शिका. महापुरुषांचे अनुकरण करायला शिका. Ahilyadevi Holkar was the great administrator of the 18th century असं आम्हाला ब्रिटीश पार्लमेंटने सांगितलं, पण याच मातीत अहिल्यामाईंच्या मावळ्यांची दखल इथलं जातीवादी प्रशासन घेत नाही. त्याच उत्तम राज्यकर्ती आणि उत्तम प्रशासक असलेल्या अहिल्यामाईंचे वारसदार आजच्या प्रशासनात आणि जिथे कायदे बनवले जातात तिथं नाहीयेत ही एक सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट म्हणावी लागेल. आज धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून तहसीलदारला निवेदन द्यायला गेलं तर तो तहसीलदार त्या निवेदनाला केराची टोपली दाखवतो. मग कायद्यानुसार राज्यघटनेत दिल्याप्रमाणे धनगर समाजाला न्याय व हक्क मिळत नसतील तर मग आम्हाला लढायला पाहिजे झगडायला पाहिजे. जर प्रशासन आणि माजलेलं सरकार कायद्याप्रमाणे आणि राज्यघटनेप्रमाणे राज्यकारभार करत नसेल तर मग आम्ही का म्हणून कायदे पाळायचे?? आमच्या हक्काचं आम्हाला दिलं जात नसेल तर मग आम्ही का गप्प बसायचं.?? गप्प बसण्याइतपत आता आम्हाला *** औलाद समजू नका. कायदे हातात घ्यायला आता आम्हाला वेळ लागणार नाही. आता जर आम्ही रस्त्यावर उतरलो तर तुमचे कायदे आमच्या आडवे आणू नका आणि आणायचे असतील तर तुम्ही अगोदर कायद्याप्रमाणे वागा. तरच आमच्या वाटेला जा नाहीतर मग तुमच्या वाटेवर येवून तुमची वाट लावल्याशिवाय या धनगराच्या औलादी कदापी शांत बसणार नाहीत. आम्हाला आमचे हक्क मागून मिळत नसतील तर आम्ही हिसकावून घेऊ.
७ डिसेंबर २०१५ पासून नागपूर विधानभवनात हिवाळी अधिवेशन पार पडणार असून धनगर समाजातील स्वार्थी नेत्यांनी वेगवेगळे मोर्चे आयोजित करून धनगर समाजाचं विभाजन करायचं ठरवलंय. कोणी ८ डिसेंबरला मोर्चा काढायचं म्हणताहेत तर कोणी १० डिसेंबरला तर कोणी अजून तळ्यात-मळ्यातच करत बसलेत. म्हणजे "धनगरी जत्रा आणि कारभारी सतरा" ही म्हण सार्थ कराण्यासाठी धनगर समाजातील काही स्वार्थी नेत्यांनी जणू काय सुपारीच घेतलेली दिसते आहे. धनगर समाजातील सर्व नेत्यांना/संत्र्यांना/मंत्र्यांना आजी/माजी आमदार असतील नाहीतर कोणी जहागिरदार असतील त्यांना सांगायचं आहे की बाबांनो तुम्ही वेगवेगळं मोर्चे आयोजित करून स्वताच्या स्वार्थासाठी धनगर समाजाचं विभाजन करत बसाल तर संपूर्ण धनगर समाजाचं फार मोठं नुकसान होणार आहे. आजकाल व्हाटसपवर वेगवेगळ्या पोस्ट फिरताहेत त्यात प्रत्येकजण म्हणतोय नागपूर विधानभवनावर निस्वार्थीपणाणे आमुक-आमक्याच्या अन् तमुक-तमक्याच्या अध्यक्षतेखाली धनगर समाजबांधवांचा भव्य मोर्चा. पण कोण कशासाठी मोर्चा काढतंय ?? हे आम्हाला चांगलंच माहित आहे आम्हाला शिकवायचा कोणीही प्रयत्न करू नका. जर तुम्ही निस्वार्थीपणे मोर्चा काढत असाल प्रत्येक संघटनेच्या पदाधिकार्यांशी तुम्ही कधी चर्चा केलीत का?? ज्या आजी/माजी आमदारांनी मोर्चा काढायचं ठरवलंय त्यांनी राज्यभरातील कीती जिल्ह्यातील धनगर समाजाच्या नेत्यांसोबत बैठका आयोजित करुन चर्चा केली?? उद्या डिसेंबर मध्ये नागपूर विधानभवनावर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी मोर्चा काढायचा असेल तर नेत्यांनीही आणि संघटनेच्या पदाधिकार्यांनीही एकत्रित येऊन चर्चा विनीमय करावा आणि एकच कोणतातरी दिवस निश्चित करावा अन्यथा समाजाच्या नावावर स्वताची राजकिय पोळी भाजून मलिदा खायचा धंदा बंद करावा. धनगर समाजातील आजी/माजी आमदार असतील अथवा कोणत्यातरी एखाद्या सघटनेचे नेते पदाधिकारी असतील त्यांना मी नितीनराजे अनुसे ओपन चैलैंज करतो की नागपूर विधानभवनावरील "विराट जन आंदोलन" उभे करून यशस्वी करायचे असेल सर्वांशी चर्चा करा सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चेत घेऊन कोणत्यातरी एखाद्या संघटनेचे नाव अन् झेंडा न घेता एकच दिवस निश्चित करुन सर्वांना सोबत घेऊन चला तरच पाच लाखांच्या (५०००००) ऐवजी पंचवीस लाखांच्या (२५००००० ) वरती धनगर समाजबांधव एकत्रित आणायची जबाबदारी माझी. अन्यथा २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करायचं ठरवलं तर तुमच्या नातेवाईकांव्यतिरीक्त तुम्हाला हाजरीनं लोकं जमवावी लागतील अणि सच्चे स्वाभिमानी समाजबांधव घरातून बाहेर सुद्धा पडणार नाहीत याची दखल घ्यावी. मग समाजात एकी करायची का बेकी करायची हे धनगर समाजातील नेत्यांनी ठरवायचं आहे. धनगर समाजातील नेत्यांच्या मागं मागं पळाणारा आता भोळा समाज नाही राहिला तर समाजप्रबोधनातून सक्षम आणि समर्थ समाज घडवतोय तो धनगर समाजातील नेत्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही.
कळावे.
जागो उठो संघर्ष करो।👊
अपने हक हासिल करो।✊
जय मौर्य।। जय मल्हार।। जय अहिल्या।।
👉नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
No comments:
Post a Comment