जय मल्हार
आरक्षणासंदर्भात तुमचं मत मला जाणून घ्यायचे आहे म्हणून वैयक्तिकरित्या बोलायचं ठरवलं. खरंतर आजपर्यंत ग्रुपवरतून मी माझे विचार व्यक्त करत होतो आणि धनगर समाजाच्या ५४३ ग्रुपमध्ये असल्याने मला आपले वैयक्तिक मत जाणून घेता आले नाही. प्रतिक्रीयांच्या स्वरुपात तुम्ही माझ्या विचारांना जी दाद दिली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे.
राज्यघटनेनुसार धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी तुम्ही आम्ही झटतो आहोत झगडतो आहोत. प्रत्येकाने या संघर्षासाठी किमान खारीचा वाटा उचलला आहे. पण सर्व संघटना राजकीय नेते यांनी एकत्रित येऊन नागपूर विधानभवनावर एक "विराट जन आंदोलन" काढायचं असं २१ जुलै रोजी बारामती मध्ये झालेल्या प्रेरणा दिनादीवसी रणशिंग फुंकण्यात आले होते. पण डिसेंबर मद्ये होणार्या अधिवेशनादरम्याण नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.
नागपूर विधानभवनावर वेगवेगळे मोर्चे काढले तरी काही हरकत नाही पण समाजबाधवांमध्ये अशा वेगवेगळ्या मोर्चाबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. नेमके कोणत्या मोर्चात सहभागी व्हायचं ? असाही प्रश्न पडलेला आहे. प्रत्येक नेता आपलाच आहे आणि नेते पुढाकार घेताना दिसताहेत याचा मला सार्थ अभिमान सुद्धा वाटतो. पण प्रत्येक नेता आणि प्रत्येक समाजबांधव आपलाच असताना नेमकं कोणाच्या मोर्चात जायच?" का कोणाच्याच मोर्चामध्ये सहभागी व्हायचंच नाही अशा भरपूर प्रतिक्रीया मला समाजबांधवांकडून आल्या. मग नक्की काय करायचं असे वारंवार प्रश्न समाजबांधव करत आहेत. "धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था होऊ नये म्हणजे बरं...
मग सर्व संघटनांच्या पदाधिकार्यांनी नेत्यांनी एकत्रित येउन चर्चा करायला हवी यासाठी सर्व समाजबांधवांनी सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत. तर तुमचं याबद्दल मत काय आहे हे सविस्तरपणे मला सांगितले तर खूप बरं होईल. धनगर समाजातील नेते आरक्षणाची अंमलबजावणी करा अशी मागणी करण्याऐवजी आमदारकी मागत बसल्याचे आरोप आज समाजातून होत आहेत. त्यांनी आयोजित केलेले मोर्चे म्हणजे आमदारकीसाठीचा सर्व खटाटोफ असल्याचे अनेक समाजबांधवांनी सांगितले. खरंतर धनगर समाजाचे आमदार असायला पाहिजेतच पण आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यानंतर आमदारकीला राखीव कोट्यातून धनगर समाजाचे उमेद्वार कमी पडतील अशी वेळ येईल. त्यामुळे नेत्यांनी मोर्चा काढून आमदारक्या मागत बसणं म्हणजे भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा घात केल्यासारखा प्रकार होईल. तद्नंतर शेळ्या-मेंढ्यांची राखण करणारा माझा मायबाप कोणत्याच नेत्यांवर कधीही विश्वास ठेवणार नाही. त्यासाठी सर्व नेत्यांना एकत्रित करुन एकाच विराट मोर्चासाठी चर्चा घडवून आणायचा माझा मानस आहे त्याबद्दल तुमचं मत काय आहे??
सर्व नेत्यांनी व वेगवेगळ्या संघटनेच्या पदाधिकार्यांनी सर्व मतभेद व मनभेद बाजूला ठेवून एकत्रित यावं यासाठी तुम्हालाही खारीचा वाटा उचलावा लागेल.
यावरती तुमचं जे काय म्हणनं आहे ते सविस्तर कळवावे. निशब्द राहून तुमचे विचार मला समजणार नाहीत तर तुम्हाला जे योग्य वाटते ते मला निसंकोचपणे सांगावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
👉नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
👉+917666994123
nitinrajeanuse.blogspot.com
👆👆👆👆👆👆👆👆👆👆
(तुमचं वैयक्तिक मत +917666994123 या नंबरवरती मेसेज, व्हाटसप अथवा कॉल करुन कळवावे)

No comments:
Post a Comment