Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Wednesday, 13 July 2016

वारी वारी आरक्षणाची वारी...

...वारी वारी आरक्षणाची वारी...
आजकाल कोणीही उठतोय अन् राज्यघटनेत नसतानाही आरक्षण मागत बसतोय अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यात दिसून येतेय. ज्या वंचित घटकाला राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ठेवली होती त्या आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाला अजूनही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तोपर्यंत इतर समाज पायात पाय अडकवण्याठी आरक्षणाची वारी वारी करत  बसलेत हे कीती मोठे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र राज्याचे.??
बाबासाहेबांच्या विचारावरती, राज्यघटनेवरती हे संबंध राष्ट्र सुरळितपणे मार्गक्रमण करते आहे पण सनातनी आणि पुरोगामी विचारांनी बरबटलेल्या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि भारतीय राज्यघटनाच मान्य नाही असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आणि जर राज्यघटना मान्य असती तर आज धनगर समाजाला घटनादत्त अधिकार असलेले अनुसूचित जमातीची अंमलबजावणी कधीच झाली असती. डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेमद्ये शोषित समाजाच्या उद्धारासाठी राज्यघटनेत तरतूद केली नसती तर आज धनगर-बहुजन समाजातील पोरं ब्राह्मनांच्या घरी धुणे-भांडी करत बसली असती हे सत्य विसरून चालणार नाही. इतिहासांतही डोकावून पाहिले तर बहुजन समाजाच्या त्याचप्रमाणे दलित अस्पृश्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या महात्मा फुलेंचे विचार हे बाळ गंगाधर टिळकांना पटत नव्हते कारण टिळक हे सनातनी विचारांचे होते. आजही महाराष्ट्र राज्यांत नव्हे तर अखंड भारतामद्ये बहुजन समाजाच्या विकासाचा जर चढता आलेख पाहिला तर सनातन्यांच्या ज्या औलादी राजकारण करताहेत त्यांच्या पोटात दुखू लागते.
आज इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाज हा विकासपासून कोसो दूर आहे. जन्मापासूनच आयुष्याचा संसार लादलेल्या घोड्याच्या पाठीवर बसून आमची भटकंती सुरू झाली, कोकऱ्या-करडांचं लटाबणं सोबत घेऊन वेळप्रसंगी काट्या-कुट्यांचा, दगडधोंड्यांचा विचार न करता अनवाणी पायानं पोटाची खळगी भरण्यासाठी गावच्या गावं पालथी घालणारी आमची धनगर जमात रानावनात आणि जंगलातच राहिली. पोरं-बाळं सोबत घेऊन रोजच्या भाकरीसाठी वणवण फिरण्यामुळे धनगर समाजातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. समाजात शिक्षणाची कमतरता असल्याने विकासाच्या प्रवाहापासून ही धनगर जमात दूरच राहिली. ६-१४ वयोगटातील मुलां-मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून काय फायदा?? गावोगाव भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची पोरं आई-वडिलांसोबतच या गावावरून त्या गावाला भटकंती करणार मग ६-१४ वयोगटातील मुलं-मुली शिक्षण घेणार तरी कोठून??
शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे, गायराने ही सरकारने हडपली. काही ठिकाणी मस्तावलेल्या माजग्या पुढाऱ्यांनी स्वताच्या खाजगी कंपन्या उभा केल्या तर सर्रास चराऊ कुरणांवरती वनखात्याने मेंढपाळांना पाबंदी घातली. मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करण्याशिवाय मेंढपाळांसमोर पर्यायच उरत नाही मग धनगर जमातींमधील मुलं-मुली शिक्षण घेणार कोठून? रानावनात, जंगलात राहणाऱ्या, तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून आदिवासी जीवन जगणाऱ्या या जमातीचा सर्व अभ्यास करूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले होते पण "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आणि धनगर समाजाची हजारो मुलं-मुली आय ए एस, आय पी एस, डाॅक्टर, इंजीनीयर, वकील होण्यापासून वंचित राहिली.
आजपर्यंत धनगर समाज अज्ञानाचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेला होता पण आता समाज कुठेतरी जागृत होऊ लागला आहे. त्यामुळे समाजातील जागृत युवा वर्गाने तरून-तरूनींनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होतं नाही तोपर्यंत धनगर समाजाचा काहीच उद्धार होणार नाही. जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजीवणी झाली तरच उद्याची पीढी सुज्ञान आणि सुशिक्षीत असेल. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर हजारो IAS/IPS, Advocates, Doctors, Engineers या समाजातूनच उदयाला येतील आणि भारताचं प्रशासन चालवतील, अखंड भारताचा राज्यकारभार धनगर समाजातील पोरं चालवतील तेव्हा राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे स्वप्न साकार होईल अन्यथा उद्याच्या पिढीवरही आजच्यासारखे अन्याय व अत्याचार सहन करायची वेळ आली तर उद्याची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. "र" चा "ड" झाला म्हणून धनगर समाज रडत बसलाय ही भाषा बोलणाऱ्यांनो पुन्हा बोलताना थोबाड सांभाळून बोला नायतर ही धनगराची औलाद तुम्हाला बोलायला तुमचे थोबाडच जाग्यावर ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही इतरांसारखे राज्यघटनेत नसताना भिक मागत बसत नाही तर डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत दिलेले आमचे हक्काचे मागतोय पण आमचा जर संयम सुटला तर लाथा घालून हिसकावून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आमच्या नसानसात महाराजा यशवंतराव होळकरांचं रक्त सळसळतंय.... राज्यघटनेत आरक्षण दिले नसताना देखील इतर समाजातील समाजबांधव आणि त्या त्या समाजातील नेते पक्ष, संघटना, गट-तट बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्रित येतात, चर्चा करतात आणि आंदोलन मोर्चे रास्तारोखो करतात पण धनगर समाजातील नेते मात्र मी मोठा होतोय की तू मोठा होतोय म्हणून भांडत बसलेत अन् एकमेकांची जिरवाजिरवी करत बसलेत त्यामुळे धनगर समाजाचे वाटोळं होतंय. धनगर समाजाचे एखादं संघटन मजबूत असावं म्हणून एखाद्याला उठवून उभा करून घोड्यावर बसवला तर तो धनगर समाजाला फाट्यावर मारून समाजातील नेत्यांनाच विरोध करत स्वार्थासाठी स्वताचंच घोडं दामटत बसतोय मग या सर्व प्रकाराला नक्की काय म्हणायचे?? तरी एक म्हण सर्वज्ञात आहेच "धनगरी जत्रा अन कारभारी सतरा" असे नाइलाजाने मला म्हणावेसे वाटतेंय.
बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं,
पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं,
माझ्याच धनगर समाजात आज एकी नाहीये,
नाहीतर.....महाराष्ट्रावर नव्हे तर
अख्ख्या भारतावर फक्त आमचंच राज्य असतं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 5 July 2016

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

यशवंत युवा सेनेची बैठक उत्साहात पार पडली

रविवार दि.३ जुलै २०१६ रोजी पश्चिम महाराष्ट्राच्या मध्यवर्ती भागातील सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात यशवंत युवा सेनेची पहिली बैठक उत्साहात पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातून यशवंत मावळे बहुसंख्येने या बैठकीमद्ये सहभागी झाले होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने थोडासा व्यत्यय आला यामुळेच काही भागातील कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नव्हते. धनगर-बहुजन समाजातील वंचिताच्या न्याय व हक्कासाठी, प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी स्वाभिमानी युवा वर्ग यशवंत युवा सेनेच्या माध्यमातून एकत्रित येत असल्याचे चित्र सांगोला येथे पार पडलेल्या बैठकीतून दिसून आले.
धनगर-बहुजन समाजावरती परकीयांप्रमाणेच स्वकीयांनीसुद्धा अन्याय व अत्याचार केलेला आहे आणि आजही करत आहेत याचा समाचार घेण्यासाठीच युवकांनी भंडारा उचलला असून धनगर-बहुजन समाजावर झालेला अन्याय अत्याचार सहन करून घेतला जाणार नाही असे प्रतिपादन यशवंत युवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने सर यांनी केले. त्याचप्रमाणे समाजातील नेत्यांमधील चाललेले वाद, एकमेकांवरची टीकाटीपनी संपवून युवा वर्गाने यशवंत युवा सेनेच्या माद्यमातून एकत्रित यावे व समाजहितासाठी हातभार लावावा असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते मा.अनिल महारनवर साहेब यांनी केले. धनगर समाज त्याचप्रमाणे बहुजन समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच स्वाभिमानी आणि स्वावलंबी युवकांनी एकत्रित येवून यशवंत युवा सेनेची स्थापना केली असून या संघटनेची जबाबदारी माझ्या खांद्यावरती दिलेली आहे आणि मी ती जबाबदारी स्वीकारली असून माझ्या हातून समाजहीताचेच कार्य पार पडेल. विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठीच त्याचप्रमाणे महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे व पक्ष, गट-तट बाजूला ठेवून धनगर समाजातील युवकांनी महाराजा यशवंतराव होळकरांचा वारसा जपत नविन इतिहास घडिविण्यासाठी यशवंत युवा सेनेत सहभागी व्हावे असे आवाहन करत कोणत्याही नेत्याला विरोध न करता समाजाच्या हीतासाठी पिवळ्या भंडाऱ्याची शपथ युवकांनी घेतली असल्याचे यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
या बैठकीदरम्यान उपस्थित समाजबांधवांनी तसेच धडाडीच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पदांचा कार्यभार स्वीकारला. यशवंत युवा सेना प्रमुख मा.विवेक कोकरे साहेब, यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य प्रदेशाद्यक्ष मा.प्रा.सचिन होनमाने साहेब तसेच बहुसंख्य धनगर समाजातील त्याचप्रमाणे बहुजन समाजातील समाजबांधवांच्या उपस्थितीमध्ये विविध पदांवरती कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली असून ती पुढील प्रमाणे...
१)मा.विष्णू देशमुख साहेब
(कार्याद्यक्ष यशवंत युवा सेना महाराष्ट्र राज्य)
 मो.नं.+91 99-60-444256

२)मा.अॅड.रविकिरण कोळेकर साहेब
(सरचिटणीस यशवंत युवा सेना महा.राज्य)
मो.नं.+91 8275-206651

३)मा.अवधूत वाघमोडे साहेब
(यशवंत युवा सेना संपर्क प्रमुख महा.राज्य)
मो.नं.+91 98-90-506501

४)मा.ज्ञानेश पाटील सर
(सांगली जिल्हा संपर्क प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 91-45-131950

५)मा. आण्णासाहेब कोळेकर
(आटपाडी तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 96-89-136365

६)मा.दिनेश हुबाले (दादा)
(माण तालुका प्रमुख यशवंत युवा सेना)
मो.नं.+91 97-65-127726

     या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भंडारा लावून निवड करण्यात आली त्याचप्रमाणे सर्व पदाधिकाऱ्यांनी संघटनेची व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निष्ठा राखणार त्याचप्रमाणे ज्या समाजासाठी या यशवंत युवा सेना संघटनेची स्थापना त्या समाजासाठी अहोरात्र कार्य करणार असल्याची शपथ सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबरोबर स्व बी के कोकरे साहेबांचे नुसतेच विचार सांगून नव्हे तर ते कृतीतून दाखवून देणार असल्याचीही शपथ नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्याबद्दल त्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनापासून हार्दिक हर्दिक अभिनंदन, समाजाच्या उज्वल भवितव्यासाठी त्याचप्रमाणे माता-भगिणी व समाज रक्षणासाठी तुमच्या हातून चांगले कार्य घडो हीच मल्हारचरणी प्रार्थना.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कोठून येणार??

ह्रदयं झालीत दगडाची, संवेदना कुठून येणार??
       मी फार मोठा विचारवंत नसलो तरी सामाजिक बांधिलकीची जबाबदारी म्हणून एक लेखक या नात्याने या विषयाला हात घालावासा वाटला. कारण आजचे आसपासचे दुषित वातावरण पाहिले की माझ्या मस्तकाची शीर उठते अन् तळपायाची आग पार मस्तकापर्यंत जाते आणि मेंदूवर आघात करायला सुरवात करते. आज आजूबाजूच्या वातावरणात फिरताना/वावरताना समाजात "संवेदना" शिल्लकच राहिली नाही हे दिसून येते आणि ते तितकेच सत्यही आहे. कालपरवा कोल्हापूर मधील बोंद्रेनगर येथील घडलेली घटना ताजी असतानाच रोजच्याच वृत्तपत्रात तशाच आणि चित्रविचित्र घटना घडल्याची कीतीतरी उदाहरणे देता येतील.
       आज सकाळी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रवासात खचाखच गर्दी असल्याने उभा राहूनच प्रवास करवा लागला तेव्हा बाजूलाच बाकड्यावरती बसलेल्या एका वृद्धाच्या हातात असलेल्या लोकमत वृत्तपत्रातकडे सहज नजर गेली अन् पुन्हा पुन्हा माझे डोळे त्या वृत्तपत्रातील बातमीकडे विस्फारून पाहत होते अशी "बापानेच सहा वर्षाच्या चिमुरड्या मुलीला नदीत फेकले" या आशयाची बातमी वाचली अन् अक्षरशा माझे मन सुन्नच झाले. मुलीचं आणि बापाचं नातं हे अनोख्याप्रकारचे असते कारण बाप मुलीला मुलापेक्षाही जास्त जीवापाड जपत असतो आणि बापाला सांभाळून घेणारी फक्त मुलगीच असते. वडिलांच्या आवाजात जरी बदल झाला तरी मुलगी पटकन ओळखते असे नाते असताना त्या बातमीबद्दल लाखो विचारांनी डोक्यात थैमानच घातले. बाप दगडाच्या ह्रदयाचा कसा काय बनू शकतो?? यांवर माझा विश्वासच बसत नव्हता. आजच्या परिस्थीतीचा आढावा घेतघेतच विचार मनांत येत होते. मुलींच्याच बाबतीत घडणाऱ्या या मानवाच्या वाइट प्रवृत्तीला कसा आळा घालायचा?? यासाठी डोक्यात विचारचक्र सुरू झाले मग ठरवले की ज्याप्रमाणे इतिहासांत तलवारीने शत्रूंची डोकी नांगरली जायची, सपासप कापली जायची त्याचप्रमाणे या एकविसाव्या शतकातील वासनेने हपापलेल्या, गोरगरीब मजबूर असलेल्या तरुणींच्या आब्रुचे लचके तोडणाऱ्या लांडग्यांची त्या नराधमांची जर डोकी नांगरायची असतील तर कलमच चालवावं लागेल आणि प्रतिष्ठीतेचा बुरखा पांघरलेल्या नागरिकांना एक चपराक द्यावी म्हणून यासाठी मांडलेला हा लेखप्रपंच.
     स्त्रिभ्रूणहत्या, मुलींची छेडछाड, बलात्कार, विवाहीतेवर अन्याय अत्याचार, हुंडाबळी इत्यांदी सारख्या धटनांची यादी वाढवेल तितकी वाढतच जाईल पण कमी नाही आणि अशा प्रकारच्या घटना रोजच्याच आहेत आणि त्या काही नवीन नाहीत असे एखादा रोजचाच वाचक सहज बोलून जातो मग त्या वाचकाला माझा पुढचा प्रश्न असा असेल की 'आजपर्यंत घडलेल्या घटनांमद्ये अथवा इथून पुढे घडणाऱ्या घटनांमद्ये जर तुमची मुलगी असेल, आई-बहिण असेल आणि तुमच्याच नातेवाईंकापैकी कोणी स्त्री अथवा पत्नी असेल तर तुम्ही काय केले असते??' ती घटना तुमच्यासाठी नविन नसून जूनीच असेल तर या जगात तुमच्यासारख्या संवेदनाशून्य असलेल्या व्यक्तींचा आणि प्रवृत्तीचा मी खरंतर धिक्कार करतो. कारण त्या त्या पिडीत मुलीचा बाप, भाऊ, मुलगा अथवा पती या नात्याला तुम्ही कलंक आहात असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. म्हणूनच की काय आजच्या वर्तमानपत्रातील ती घटना घडली असावी. ज्या चिमुरडीला तिच्या बापाने नदीमद्ये फेकून दिले सुदैवाने ती वाचली दहा तास मृत्यूशी झुंज देत होती. पण त्या घटनेचे कारण असे की वरील परिस्थीती भविष्यात कधीही उद्भवू शकते म्हणूनच...  या एकविसाव्या शतकात मराठी फिल्मइंडस्ट्रीच नव्हे तर बाॅलीवूड अथवा हाॅलीवूड असो यांसख्या चित्रपटातून भावना चाळवतील अशी लुभावणारी दृश्य दाखवल्याने तरूण पिढीच्या मनावरती विपरीत परिणाम झाला आणि होतही आहे. चित्रपटातील तोकडी आणि तंग कपडे पाहून भारतीय संस्कृत्ती विसरून पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत अंगप्रदर्शन करणाऱ्यांमुळे आज समाजातील तरूणांच्या लैंगिक वासना भडकवल्या जातात मग मस्तावलेली टपोरी पोरं वाटेल तसे जीवन जगू लागतात. रस्त्यावरून एकटी चाललेली तरूणी म्हणजेच त्यांच्या बापाचा माल असे समजून तुटून पडतात, मग त्या घरच्यांचे संस्कार नसलेल्या त्या टपोऱ्या पोरांच्या हव्यासापोटीच कमजोर आणि मजबूर मुली त्या वासनाधीन लांडग्यांच्या शिकार बनतात. जर एखाद्या मुलीसोबत अशी घटना घडत असेल, कोणी तिची छेडछाड करत असेल, कोणी त्रास देत असेल तर ती मुलगी कधीही आणि कोणाकडेही तक्रार करत नाही याकडे त्या दुर्लक्ष करतात आणि जर पालकांकडे तक्रार केलीच तर बदनामी होईल म्हणून पालकच त्या मुलीची मुस्कटदाबी करून तिला शांत राहण्यास प्रवृत्त करतात मग सततच्या या त्रासाला कंटाळून पल्लवी बोडेकर सारख्या आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या मुली ऐन तारूण्यातच आत्महत्या करून जीवनयात्रा संपवितात.
     राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता अहिल्याई होळकर, क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांच्या लेकी असा अन्याय अत्याचार करणाऱ्या टपोऱ्यांना त्यांच्या मुस्काडात वाजवून प्रतिकार करत नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस जास्तच वाढत चाललेत. मग अशा घटना सर्रास घडत असतानाच मुलीची बदनामी होऊ नये म्हणून इज्जतीसाठी मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नसतो मग पुढे मुलीच्या लग्नासाठी देखील खिशात आणा नसताना समाजातील हुंडापद्धतीलाही सामोरे जायचे असते, भविष्यातील मुलीच्या भल्यासाठी झटत असताना आजूबाच्या वासनेने बरबटलेल्या कुत्र्यांशी दोन हात करण्यापेक्षा दगडासारखं ह्रदय बनवून तिला गर्भात मारणे अथवा मुलगी जन्माला आल्यानंतर त्या मुलीचा जीव घेणं हे बापालाही मान्य नसतं पण आजूबाजूचे दुषित झालेले वातावरण त्या बापाला दगडासारखं ह्रदय बनवण्यास मजबूर करते. पण पोलिसयंत्रणा, कायदा आणि सुव्यवस्था मात्र हातावर हात बांधून शांत बसते आणि मग ज्या बापाच्या हातून हे अपराध घडतात ते बापच गुन्हेगार ठरतात, त्यांना लगेच शिक्षा होते पण मुलींची छेडछाड काढणारी, इज्जत लुटणारी, समाजातील हुंडाबळी घेणारी कुत्री मात्र मोकाटच बोंबलत फिरतात त्यांना आवर घातला पाहिजे.
      खरंतर ही जबाबदारी आता सामाजिक संघटनांवरती येऊन ठेपली असली तरी आज काही सामाजिक संघटना (सर्वच नव्हे) अशा घटनांचा (स्वार्थासाठी) निषेध करतात, पिडीतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करून त्यांची जबाबदारी स्विकारतात खरं पण स्वताच्या प्रसिद्धीसाठी त्याचा एवढा अवडंब करतात /टेंभा मिरवतात की त्यांच्याशिवाय एवढे चांगले काम कोणीच करू शकत नाहीत या अहंकारात गडी नाचत असतात बोंबलत असतात पण ज्याप्रमाणे "दिव्याखाली अंधार" असतो त्याप्रमाणे मुलींची छेडछाड, बलात्कार, स्त्रिभ्रूणहत्या, हुंडाबळी यांसारख्या घटनांना कारणीभूत असलेल्या कलंकित पोरांना सोबत घेवून अशा संघटना काम करत असतील तर तुमच्या त्या कार्याला काय अर्थ?? त्या कलंकित वृत्तीच्या आणि संकुचित बुद्धीच्या वासनेने भुकेलेल्या गिधडांना स्वताच्या आई-बहीणींदेखील दिसत नाही एवढे त्यात बुडालेले असतात मग त्या संबंधित संघटनेतला प्रत्येक कार्यकर्ता बदनामीस पात्र ठरतो. त्या कलंकितांची ह्रदयं ही दगडाची असल्याने त्यांना सोबत घेऊन काम करणाऱ्यांची ह्रदयं सुद्धा दगडाचीच आहेत असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही, मग "संवेदना" कुठे शिल्लक राहतेय तेच मला समजत नाही.???

जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 31 May 2016

अहिल्याईंच्या प्रशासनाचा अवलंब करा...

माता अहिल्ये तुझी जगभर कीर्ती
तूच होतीस महान प्रशासनकर्ती
माते तुझी घेऊनिया स्फूर्ति
लढण्यासाठी घेऊन तलवार हाती
आम्हीही उतरतो आता रणांगणावरती.....

एक स्त्री असूनदेखिल या देशाच्या विशाल भूभागावर जवळजवळ २८ वर्ष राज्यकारभार करणारी राज्यकर्ती, १८व्या शतकातील एक आदर्श आणि महान प्रशासक असा उल्लेख अक्षरशा ब्रिटिशांनी करून ठेवला आहे. पण आम्ही अजूनही अंधारातच आहोत. आपल्या राज्यातील प्रजेलाच नव्हे तर अखंड भारतातील प्रजेला पोटच्या लेकरांप्रमाने सांभाळणारी मायमाऊली, एवढेच नव्हे तर जाती-धर्माच्या भींती तोडून स्वताच्या मुलीचा आंतरजातीय विवाह करून समाजासमोर आदर्श ठेवणारी थोर समाजसुधारक, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन मंदिरांचा जिर्णोध्दार, मंदिरांचे बांधकाम, मश्चिदींचे बांधकाम, शेतकऱ्यांसाठी शेततळे, तलाव, विहीरी, वाटसरूंसाठी बारवे, धर्मशाला, नदीवरील घाट अशी कीतीतरी विकासकामे प्रजेच्या हीतासाठी करणारी पुण्यश्लोक, वेळप्रसंगी प्रजेच्या रक्षणासाठी हाती तलवार भाले घेऊन दुश्मनांच्या चिंधड्या उडवणारी रणरागीणी, राजमाता, महाराणी, लोककल्याणकारी माता अहिल्याई होळकर यांची आज २९१ वी जयंती त्यानिमीत्त माझ्या राजमातेला मानाचा पिवळा जय मल्हार.
जाती धर्माच्या पलिकडे जाऊन प्रजाहितरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या अहिल्याई होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजानेच साजरी करणे हा खरंतर अहिल्याईंचा अपमान  आहे पण जातीवादाने बरबटलेल्या या महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर अखंड भारत देशामध्ये ही जातावादाची अन् भूरसटलेल्या विचाराची पेरण करून सनातन्यांनी सर्वसामान्यांचे पार कंबरडच मोडलंय. राजमाता अहिल्याई होळकर असो अथवा अन्य कोणी थोर महापुरूष किंवा समाजसुधारक असो यांची जयंती अथवा स्मृतिदीन साजरा करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी असताना त्या त्या महापुरूषांचे विचार आत्मसात करून त्या मार्गावर चालणे हे समाजाच्या हीताचे आहे. नुसतंच महापुरूषांच्या जयंत्या साजऱ्या करणं, लोकवर्गणीतून हजारो-लाखो रुपये उधळून डी जे लावून धांगडधींगा घालणे हे समाजजीगृतीचे लक्षण नसून समाजाला त्या महापुरूषांच्या विचारांपासून परावर्तित करण्याचे लक्षण आहे असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
राजमाता महाराणी अहिल्याई होळकर यांची प्रशासन पद्धत पाहून, अहिल्याई होळकर यांचा राज्यकारभार आणि प्रशासन याचा अभ्यास करून युरोप खंडांतील देशांनी विकासाचा पल्ला गाठला, शेती, शिक्षण तसेच औद्योगिकरणातून त्या त्या देशांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात प्रगती केली पण त्याच राष्ट्रमाता अहिल्याई होळकर यांचा भारत देश मात्र अधोगतीच्या मार्गावर आहे यासाठी धर्मनिरपेक्षतेचा उगाच आव आणणाऱ्या भारत देशाची जातीव्यवस्था (धर्मभेद, जातीभेद) ही भारताच्या अधोगतीशी कारणीभूत आहे. आजपर्यंत सनातन्यांनी राष्ट्राप्रति सर्वस्व अर्पन करणाऱ्या महापुरूषांचा इतिहास चुकीचाच लिहला  आणि खरा इतिहास मात्र दडवून ठेवला लपवून ठेवला कारण की चुकीचा इतिहास लिहणारे इतिहासकारच खरंतर चुकीचे जन्माला आले होते.
आज धनगर समाज जागा झाला, समाजाला खरा इतिहास समजू लागला उमजू लागला पण समाजाचे भांडवलीकरण करून, समाजाला प्रस्तापितांच्या दावणीला बांधायचे काम धनगर समाजातील नेत्यांनी केले म्हणजेच आगीतून उठला अन् फुफाट्यात पडला हीच अवस्था धनगर समाजाची झाली आहे. अरे एकेकाळी राजा समाज असणारी ही जमात गुलामगीरीत का वागतेय? हे सांगून सांगून थकलो तरीही धनगर समाज अजून अज्ञानाचं, अंधश्रद्धेचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेलाय हे समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव आणि याच कारणांमुळे धनगर समाजाचा विकास खुंटलाय असं म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही.
असो आजचा युवक शिकलाय, सवरलाय, अन्यायाच्या विरोधात लिहायला, वाचायला आणि बोलायला लागलाय त्यामुळे कुठूनतरी आशेचा किरण उगवलेला दिसतोय, कुठूनतरी समाजप्रबोधनास नव अंकुर फुटलेला दिसतोय. आजचा युवक स्वाभिमानाची भाषा बोलायला लागलाय. नक्कीच आजचा यूवक हा उद्याच्या भावी पिढीसाठी एक नवा इतिहास रचून जाईल. एक वेळ अशीही येईल की राजा मल्हारराव होळकर यांचे "मल्हारतंत्र" अवगत करून, रणरागीणी अहिल्याई  होळकर यांचा आदर्श आणि एकमेव अद्वितीय महाराजा यशवंतराव होळकर यांची दूरदृष्टी डोळ्यांसमोर ठेऊन सर्व धनगर समाजबांधव, नेते एकत्रित येऊन क्रांती घडवतील हीच आशा मनी बाळगून समाजप्रबोधनासाठी चालू केलेला हा लेखनप्रपंच....
पुनःश्च एकदा राष्ट्रमाता,राजमाता पुण्यश्लोक अहिल्याई होळकर यांच्या २९१ व्या जयंतीनिमित्त (३१ मे १७२५) त्यांच्या प्रेरणादायी सक्षम विचारांना व समाज उध्दारक दैदिप्यमान कार्याला विनम्र अभिवादन...! मानाचा पिवळा जय मल्हार!! तसेच सर्व समाजबांधवांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्याई!! जय यशवंत!!!
आपलाच
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ती.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Sunday, 1 May 2016

...तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल.


आज महाराष्ट्र दिन या दिवशी १०५ हुतात्म्यांनी प्राणाची आहुती दिली त्या शुरवीरांना खरंतर मानाचा जय मल्हार!! जय महाराष्ट्र!! कोटी प्रणाम!! तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हर्दिक शुभेच्छा!!
आज राज्यभर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छांचे संदेश सर्व सोशल मिडीयावरती फिरताहेत चांगली गोष्ट आहे पण याच महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजावरती जर विनाकारण अन्याय व अत्याचार होत असेल तर मग काय म्हणून महाराष्ट्र दिन साजरा करायचा? असा प्रश्न पडतो.
      कारण काल परवाच "धनगरांना आरक्षणाचे दरवाजे बंद". अशा आशयाची बातमी वाचायला भेटली तेव्हा तळपायाची आग पार मस्तकापर्यंत गेली. केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम म्हणतात की गृहमंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या जनगनणा महासंचालनालयाने (रजिस्टर्ड जनरल ऑफ इंडिया) अर्थातच RGI ने ही मागणी फेटाळली आहे. पण खरंतर ती मागणी धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याबद्दलची होती आणि ती कोणी ? व कधी? पाठवली याबाबत माहिती उपलब्ध नाही.
सांगायची वस्तूस्थिती अशी की धनगर समाज अगोदरपासूनच अनुसूचित जमातीच्या यादीत आहे मग सामाविष्ट करण्याचा प्रश्नच येतो कुठे?? त्यातच सदरच्या राज्य सरकारने अजूनही धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात असा अनुकूल प्रस्ताव केंद्र सरकारला अर्थातच आरजीआय ला पाठवलाच नाही मग धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करण्याचा प्रस्ताव नेमका कोणी? व कधी ? पाठवला याचा अभ्यास करणे गरजेचे आहे, जो प्रस्ताव आरजीआय ने फेटाळला आहे. गेल्या ६६-६७ वर्षापासून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित आहे. दिवसभर उन्हातान्हात, थंडीवाऱ्यात धो धो कोसळणाऱ्या पावसाचा विचार न करता रानावनात, डोगरदऱ्यांत राहून जंगलात भटकंती करणाऱ्या या धनगर समाजाला शेळ्या मेंढ्या राखण्यामुळे आपण अनुसूचित जमातीमध्ये आहोत की नाही आहोत याचाच अभ्यास नव्हता अर्थातच शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाचे नेतृत्वच म्हणावे असे मजबूत आणि अभ्यासू नव्हते म्हणूनच आजपर्यंत धनगर समाजाची उपेक्षा झाली, अवहेलना झाली.
भारतीय राज्यघटनेत कलम क्र.३४२ वरती असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टात अ.क्र.३६ वर धनगड, ओरान असा स्पष्ट उल्लेख आहे. पण जेव्हा राज्यघटना लिहली गेली तेव्हा भारतीय समाजव्यवस्थेचे चार भागात विभाजन करून भारतामध्ये सर्वसमानता प्रस्थापित करण्यासाठी.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भविष्याचा वेध घेऊनच देशाच्या स्वातंत्र्यापुर्वी दि. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या अहवालाचा संदर्भ घेऊन भारतीय समाजव्यवस्था तयार केली. कोलंबिया विद्यापीठात सादर केलेल्या "आंबेडकर बाबासाहेब वांङमय" या अहवालात भारतीय जनजाती, संस्कृती यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय जातीव्यवस्थेच्या लोकसंख्येचा आणि त्या जातीजमाती कोणत्या भागात आढळतात याचा आढावा दिला होता. त्यामध्ये "धनगड" नावाच्या जमातीचा कोठेही उल्लेख आढळून येत नाही मग स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटना लिहली गेली तेव्हा अचानक "धनगड" नावाची जमात कशी काय जन्माला आली ?? याचा अभ्यास करायला हवा.
"धनगर" या शब्दाचा "धनगड" असा शब्दछल झाल्याने धनगर समाज विकासापासून कोसो दूर आहे, जसे Gurgaon चे गुडगाव, Orissa चे ओडिसा, Acer चे एकड त्याचप्रमाणे Dhangar चे धनगड असा स्पेलिंग मिस्टेक झाल्याने धनगर समाजावर फार मोठा अन्याय झालेला आहे. आजही महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतामध्ये "धनगड" नावाची कोणतीही जमात आस्तीत्वात नाही अथवा धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात यासाठी जेव्हा जेव्हा आंदोलने झाली तेव्हा "धनगड" नावाच्या जमातीचा एकही व्यक्ती विरोधात पुढे नाही. मग राज्यघटनेत उल्लेख असलेल्या धनगड जमातीचे आरक्षण नक्की कोण लाटतंय? धनगड जमात आस्तित्वातच नाही तर मग ३६ नंबर वर असलेल्या धनगड जमातीचा आदिवासी विकास निधी नेमका कोण लाटतोय याकडे गांभीर्याने लक्ष द्यायची गरज आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाव्यात म्हणून सर्वप्रथम १९८९ साली यशवंत सेना संस्थापक स्व.बी.के.कोकरे साहेबांनी जेव्हा लाखो यशवंत सैनिकांना सोबत घेऊन खंबाटकीच्या घाटात आंदोलन केले होते त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी सांगली येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थितीत धनगर समाजाला "अनुसूचित जमाती" ऐवजी जाणूनबुजून "भटक्या जमातीत" घालण्याचा निर्णय घेतला आणि शेवटी धनगर समाजाला वाटाण्याच्या अक्षता दाखवून धनगर समाजाला भटक्या जमातीत घातले आणि आजच्या धनगर समाजातील हजारो मुलामुलींचे भविष्य अंधारात ठेवले. धनगर समाजाची हजारो पोरं आय ए एस, आय पी एस बनण्यापासून वंचित राहिली याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे धनगर समाजाचा खरा शत्रू शरद पवार होय.
धनगर समाजावरती झालेल्या अन्यायाला बारामतीचा बोका जेवढा जबाबदार आहे तेवढेच धनगर समाजातील ठराविकजण सोडले तर बाकीचा सुशिक्षित वर्ग / प्रशासकीय अधिकारी  जबाबदार आहेत आणि धनगर समाजाचे भांडवलीकरण करुन समाजाचे बाजारीकरण करुन प्रस्तापित नेत्यांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील पुढारी/नेते तितकेच जबाबदार आहेत. कारण त्या नेत्यांना समाजासाठी राजकारण करायचे नाही तर स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचा वापर करुन स्वतःची घरं भरायची आहेत त्यामुळे त्यांना समाजाबद्दल काही घेणेदेणे नाही. यासाठी माडीत आणि साडीत गुरफटलेल्या व्यावसायिक बांधवानी सुशिक्षित वर्गाने जर प्रामुख्याने लक्ष घातलं तर धनगर समाजाला न्याय आणि आपले हक्क मिळायला क्षणमात्रही विलंब होणार नाही. आज केंद्रीय आदिवासी विकास मंत्री ज्यूएल ओराम बरळतात की धनगर समाजाला आरक्षणाचे दरवाजे बंद आहेत पण ओरामांना कुठे माहित आहे की इंग्रजांना सळो की पळो करुन सोडणाऱ्या यशवंतराव होळकरांचा वारसा लाभलेला क्रांतीकारी हाडाचा अन् सळसळत्या रक्ताचा प्रत्येक धनगर जेव्हा अन्यायाच्या विरोधात खवळून उठेल, पेटून उठेल तेव्हा उभा महाराष्ट्रही पेटलेला दिसेल आणि धनगर समाजाला बंद असलेले आरक्षणाचे दरवाजेे देखील आपोआप उघडलेले असतील. जिथे मराठी=मरहट्टी भाषिकांच्या प्रदेशात जर  मरहट्टींना (कर्नाटक शब्द मर=मेंढी,मेंढरू  व  हट्टीजन-मेंढ्या राखणारे, मेंढ्या पाळणारे धनगर)  यांना जर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होत नसेल तर मग आजचा महाराष्ट्र दिन काय म्हणून साजरा करायचा?  पाठीमागे जाटांनी हरियाना पेटवला होता तर केंद्र सरकार त्यांची दखल घ्यायला लागले पण डोळ्यावरती अज्ञानाचे घोंगडे पांघरून घेतलेले धनगराचे वाघ जेव्हा पेटून उठतील तेव्हा उभा महाराष्ट्र पेटलेला दिसेल हे मात्र नक्की.
  जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 29 April 2016

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

एकत्रिकरणातूनच समाजाचा विकास -मा.विवेक कोकरे

समाजाच्या अज्ञानपणामुळे विखुरल्या गेलेल्या धनगर समाजाला एकत्रित करणे ही आपल्या सर्वांची नैतिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन यशवंत सेनेचे महाराष्ट्र राज्य युवक प्रदेशाध्यक्ष मा. विवेक कोकरे साहेब यांनी काल मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर तसेच पेन्नूर (मोहोळ) येथे आयोजित केलेल्या बैठकीदरम्याण केले. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मा.विवेक कोकरे साहेबांनी मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला तसे मोहोळ तालुक्यातील धनगर समाजबांधवांशी चर्चा केली होती. कोणतीही व्यक्ती समाजापेक्षा मोठी नाही तर समाज सर्वापेक्षा मोठाच असतो म्हणून समाजाला कोणी वेठीस धरू नये अथवा स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे कोणी भांडवलीकरण करू नये असेही त्यांनी सांगितले. धनगर समाज पोटजाती मध्ये विभागला आहेच शिवाय अज्ञानपणामुळे विखुरला गेला. या भरकटलेल्या समाजाला जर एकत्रित केले तरच समाजाचा विकास होऊ शकतो आणि त्यासाठी मी अहोरात्र कार्य करायला तयार असल्याचे यशवंत सेना युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब यांनी सांगितले.
मंगळवेढा तालुक्यामध्ये मा.एडव्होकेट रविकिरण कोळेकर साहेब आणि सहकाऱ्यांनी बैठकीचे अतिशय उत्कृष्टरित्या नियोजन केले होते त्यावेळी ३०-३५ युवक बैठकीसाठी उपस्थित होते तर पंढरपूर येथे मा.नानासाहेब खांडेकर व सांगोला येथे मा.विशाल वाघमोडे, अवधूत वाघमोडे यांनी बैठकीचे नियोजन केले होते. काल दि.२७ रोजी.लग्नसराई चे दिवस असतानादेखिल प्रत्येक ठिकाणी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव चर्चेसाठी उपस्थित राहिले होते यारुनच लक्षात येते धनगर समाज प्रगतीच्या दिशेने जायला सज्ज झाला असून स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी करुन अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाच्या  क्रांतीची मशाल देणाऱ्या यशवंत सेना संस्थापक स्व बी.के.कोकरे साहेबांच्या क्रांतीकारी संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येत असून आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या नात्याने युवा पिढी यशवंत यशवंत सेनेत सहभागी होत आहेत. यशवंत सेना नेहमीच व्यक्तीपेक्षा समाज मोठा या तत्वाने काम करत राहील असे यशवंत सेनेचे युवक प्रदेशाध्यक्ष मा.विवेक कोकरे साहेब बोलताना म्हणाले.
मंगळवेढा, पंढरपूर, सांगोला, मोहोळ येथील दौऱ्यामध्ये मा.विवेक कोकरे साहेबांसोबत मा. विशाल वाघमोडे, मा.विशाल कोकरे, मा.राजाराम वाघमोडे आदी युवक सहभागी झाले होते.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Tuesday, 19 April 2016

...तर धनगर म्हणवून घेऊ नका


धनगर समाजात जन्माला आलेली एकाच मातेची अर्थातच अहिल्याईची आम्ही लेकरं आज पोटजातीच्या विळख्यात अडकून बसलोय म्हणूनच माझा धनगर समाज इतरांपेक्षा ५०-६० वर्ष पाठीमागे आहे असे म्हणायला काही वावगं वाटणार नाही. आज कोणी म्हणतो मी हटकर, कोणी म्हणतो मी खूटेकर, कोणी म्हणतो झेंडे धनगर, तर कोणी म्हणतो बंडे धनगर, कोणी म्हणतो अहिर, तर कोणी म्हणतो डंगे धनगर, कोणी म्हणतो अमुक धनगर तर कोणी म्हणतो तमूक धनगर. अशा रीतीने प्रत्येकाने व्यवसायनुरूप, कुळानुरूप आणि कर्तव्याच्या आधारावर पोटजाती वाटून घेतल्या आणि एकत्रित गुण्यागोविंदाने जगणाऱ्या माझ्या धनगर समाजाचे विभाजन केले. अरे नुसतेच विभाजन केले नाही तर पार वाटोळे केले माझ्या धनगर समाजाचे, पण आजच्या सुशिक्षित युवा वर्गाने तरी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा. असाच पोटजातींचा डंका मिरवत बसला तर आरक्षणाची अंमलबजावणी दुरच सोडा ज्या ज्या वेळी समाजातील आपल्याच आई-बहिणींवरती अन्याय अत्याचार  होईल त्या त्या वेळी पोटजातीच्या अहंकाराने माजलेली आपलीच माणसं मदतीला धावून येणार नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.
एकाच रक्ताच्या आम्ही औलादी अर्थातच मल्हारबांचे मावळे, लोककल्याणकारी रणरागिणी महाराणी अहिल्याईची आम्ही लेकरं, अद्वितीय महाराजा भारताचा नेपोलीयन बोनापार्ट म्हणून अख्खं जग ज्यांना ओळखते त्या राजे यशवंतराव होळकरांचे आम्ही वारसदार आज पोटजातीच्या नावाखाली वेगवेगळे बस्तान बसवतोय अन् प्रस्तापित जातींना डोक्यावर घेऊन मिरवतोय कीती दुर्दैव आमचे... जेवढे धनगर म्हणून जगाल आणि धनगर म्हणूनच एकत्रित याल तरच आपले हक्क/अधिकार आपण हिसकावून घेऊ शकतो पण पोटजातींचा स्वाभिमान बाळगून आम्हीच कसे श्रेष्ठ आहोत हे बोंबलत बसला तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही उलट धनगर समाज अजून जास्तच पोटजातीत विभागला जाईल आणि एकदा का धनगर समाज विभागला गेला तर या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अखंड भारतात सनातनी विचारांनी बरबटलेली आणि ज्यांनी धनगर समाजाला आजपर्यंत अंधारात ठेवले होते अशी प्रस्तापित पिलावळ एकेकाळी राजा समाज असणाऱ्या जमातीवर राज्यकारभार करायला एकहाती मोकळी होइल याचा विचार माझ्या धनगर समाजातील तरुण बांधवानी करावा.
आज समाजात विवाह असो अथवा कोणताही कार्यक्रम सोहळा असो जिथे तिथे पोटजातींचेच साखळदंड आडवे येताहेत मग पोटजातींचा अहंकार बाळगणारे धनगर कसले? असाच प्रश्न मला पडतो. होळकर(विरकर)-शिंदे यांचा हकटर-खुटेकर मधील रोटी बेटी व्यवहार, तद्नंतर अहिल्याईंनी मुक्ताचा विवाह यशवंतराव फणसे यांच्याशी करुन दिला होता, राजर्षि छत्रपती शाहू महाराज आणि महाराजाधिराज शुरवीर राजे यशवंतराव होळकर यांच्यातील भोसले-होळकर कुटुंबात झालेला रोटी-बेटी व्यवहार आजही चालत आहे मग त्याच माझ्या धनगर  समाजात आज आम्हाला पोटजातींचा अडथळा कशासाठी?? जर तसे असेल  तर धनगर समाजबांधवांनो ज्यांना ज्यांना  पोटजातीला प्राधान्य द्यायचे असेल, पोटजातींचा डंका मिरवायचा असेल अथवा पोटजातींचाच उदोउदो करायचा असेल तर धनगर जमातीच्या प्रमाणपत्राऐवजी त्या त्या पोटजातींचीच प्रमाणपत्रे घ्या अन् स्वताला धनगर म्हणवून घेऊ नका.
एक कट्टर धनगर
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 17 March 2016

एक धनगर लाख सिकंदर... :नितीनराजे अनुसे


         मनगटाच्या जोरावर आणि तलवारीच्या धारेवर भल्या-भल्या दुश्मनांना चारीमुंड्या चित करणाऱ्यांच्या जमातीत जन्माला आलेली आम्ही माणसं आमच्या थोर महापुरूषांनी सुवर्णाक्षरात कोरुन ठेवलेला आमचा दैदिप्यमान इतिहास विसरतो आणि मग तिथेच आमचा विकास खुंटतो. जो समाज आपला इतिहास विसरतो तो कधीच प्रगती/विकास करू शकत नाही हे तितकच सत्य आहे. या भारत देशावर इंग्रजांनी आक्रमण करून फंद फितुरी करत १५० वर्षे राज्य केले तर भारतीय इतिहासकार त्या फिरंग्यांचा उदो उदो करत बसले आणि निर्लज्जप्रमाणे सांगू लागले की इंग्रजांनी भारताला १५० वर्षे गुलामगीरीत ठेवलं. पण धनगर समाजाने या भारतावरती नव्हे तर आशिया खंडाच्या विशाल भूभागावरती ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करून गुलामगीरीत ठेवले होते इंग्रजांना कापून काढत यशवंतराव होळकरांनी त्यांना सळो की पळो करून सोडले होते हे प्रत्येकाच्या लक्षात असूद्या.
       आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य, राजा सम्राट अशोक, थोरले श्रीमंत मल्हारराव होळकर, रणरागिणी राजमाता महाराणी अहिल्याई होळकर, आद्यस्वातंञ्यसेनानी महाराजा यशवंतराव होळकर, आद्यमहिला स्वातंत्र्यसेनानी वीरांगणा भिमाई होळकर अशा थोर महापुरूषांचा जमातीत जन्माला आलेले दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे आम्ही वारसदार, आम्हाला आमचाच इतिहास माहित नसल्याने इथल्या माजलेल्या आणि मस्तावलेल्या प्रस्तापितांची गुलामगीरी अन् चमचेगीरी करण्यातच आजच्या सरदारांनी (प्रस्तापितांच्या चपला उचलणाऱ्या नेत्यांनी) समाधानता स्विकारली हे धनगर समाजाचे सर्वात मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. कदाचित आमचा इतिहास चुकीचा लिहला गेला कारण आमचा इतिहास लिहणारे इतिहासकारच चुकीचे जन्माला आले होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पण आमचा इतिहास दुरुस्त करण्यासाठी तरी कीतीजण प्रयत्न करतात याचा पण अभ्यास करायला हवा.
        आज जर धनगर समाजाला आपला खरा इतिहास समजला तर प्रेमळ तितकाच अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारा आणि ध्येय्यवेडा असलेला धनगर समाज पुन्हा या जगावरती राज्य करू शकतो पण आजपर्यंत आम्हाला आमचे आस्तित्व समजले नव्हते म्हणून धनगर समाजाचे फार मोठे नुकसान झाले. आज आम्हाला आमच्या आस्तित्वाची जाणीव करून घ्यावी लागेल, त्यासाठीच
आता
गरज आहे आमचा खरा इतिहास जाणून घेण्याची
गरज आहे तरुणांमध्ये स्वाभिमान जागवण्याची
गरज आहे समाजाला जाग्रूत करण्याची
गरज आहे समाज प्रबोधन करण्याची
गरज आहे समाज संघटन करण्याची
गरज आहे समाजाला योग्य दिशा देण्याची
गरज आहे समाजाचे प्रश्न समजून घेण्याची
गरज आहे ते समाजाचे प्रश्न सोडवण्याची
गरज आहे स्व.बी.के.कोकरे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची
यासाठी हवा आहे विश्वास अन् साथ फक्त तुमची
 पुन्हा एकदा खवळून उठेल धनगर समुद्रासारखा,
 पुन्हा एकदा पेटून उठेल धनगर वादळासारखा,
 पुन्हा एकदा धनगर भरवेल धडकी सह्याद्रीच्या पर्वतरांगेला अन्     पुन्हा एकदा कवेत घेईल त्या  हिमालयाला. सळसळत्या रक्तामध्ये अन्यायाची चीड आणि लालबुंद डोळ्यामध्ये रसरसलेला निखारा साठवून ठेवलेला धनगर ज्यादिवशी पेटून उठेल आणि ज्यादिवशी महाराष्ट्रातील एकाच रक्ताचा अन् हाडामांसाचा प्रत्येक धनगर जातीसाठी माती खाऊन हक्कासाठी रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्राचा फक्त हरियाणा (जाटांचे आंदोलन) होणार नाही तर यशवंतराव होळकरांच्या वारसदारांनी घडवलेल्या नवीन इतिहासाची पुस्तकं वाचायला मस्तकं शिल्लक राहणार नाहीत.
म्हणूनच म्हणतो खबरदार जर आम्हावर अन्याय कराल तर उद्याचा सुर्य उगवू देणार नाही.
जय मल्हार॥ जय अहिल्या॥ जय यशवंत॥
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१८५ ३००० ४१२३
nitinrajeanuse123.blogspot.com

Saturday, 23 January 2016

एक ऐसा शासक, जिसके सामने अंग्रेजों ने हरबार टेक दिए घुटने।


Dainik Bhaskar News | Feb 24,2012

भोपाल। एक ऐसा भारतीय शासक जिसने अकेले दम पर अंग्रेजों को नाकों चने चबाने पर मजबूर कर दिया था। इकलौता ऐसा शासक, जिसका खौफ अंग्रेजों में साफ-साफ दिखता था। एकमात्र ऐसा शासक जिसके साथ अंग्रेज हर हाल में बिना शर्त समझौता करने को तैयार थे। एक ऐसा शासक, जिसे अपनों ने ही बार-बार धोखा दिया, फिर भी जंग के मैदान में कभी हिम्मत नहीं हारी।
इतना महान था वो भारतीय शासक, फिर भी इतिहास के पन्नों में वो कहीं खोया हुआ है। उसके बारे में आज भी बहुत लोगों को जानकारी नहीं है। उसका नाम आज भी लोगों के लिए अनजान है। उस महान शासक का नाम है - यशवंतराव होलकर। यह उस महान वीरयोद्धा का नाम है, जिसकी तुलना विख्यात इतिहास शास्त्री एन एस इनामदार ने 'नेपोलियन' से की है। भास्कर नॉलेज पैकेज के अंतर्गत आज हम आपको इसी वीर योद्धा के बारे में बताने जा रहे हैं।
पश्चिम मध्यप्रदेश की मालवा रियासत के महाराज यशवंतराव होलकर का भारत की आजादी के लिए किया गया योगदान महाराणा प्रताप और झांसी की रानी लक्ष्मीबाई से कहीं कम नहीं है। यशवतंराव होलकर का जन्म 1776 ई. में हुआ। इनके पिता थे - तुकोजीराव होलकर। होलकर साम्राज्य के बढ़ते प्रभाव के कारण ग्वालियर के शासक दौलतराव सिंधिया ने यशवंतराव के बड़े भाई मल्हारराव को मौत की नींद सुला दिया।
इस घटना ने यशवंतराव को पूरी तरह से तोड़ दिया था। उनका अपनों पर से विश्वास उठ गया। इसके बाद उन्होंने खुद को मजबूत करना शुरू कर दिया। ये अपने काम में काफी होशियार और बहादुर थे। इसका अंदाजा इसी से लगाया जा सकता है कि 1802 ई. में इन्होंने पुणे के पेशवा बाजीराव द्वितीय व सिंधिया की मिलीजुली सेना को मात दी और इंदौर वापस आ गए।
इस दौरान अंग्रेज भारत में तेजी से अपने पांव पसार रहे थे। यशवंत राव के सामने एक नई चुनौती सामने आ चुकी थी। भारत को अंग्रेजों के चंगुल से आजाद कराना। इसके लिए उन्हें अन्य भारतीय शासकों की सहायता की जरूरत थी। वे अंग्रेजों के बढ़ते साम्राज्य को रोक देना चाहते थे। इसके लिए उन्होंने नागपुर के भोंसले और ग्वालियर के सिंधिया से एकबार फिर हाथ मिलाया और अंग्रेजों को खदेड़ने की ठानी। लेकिन पुरानी दुश्मनी के कारण भोंसले और सिंधिया ने उन्हें फिर धोखा दिया और यशवंतराव एक बार फिर अकेले पड़ गए।
उन्होंने अन्य शासकों से एकबार फिर एकजुट होकर अंग्रेजों के खिलाफ लड़ने का आग्रह किया, लेकिन किसी ने उनकी बात नहीं मानी। इसके बाद उन्होंने अकेले दम पर अंग्रेजों को छठी का दूध याद दिलाने की ठानी। 8 जून 1804 ई. को उन्होंने अंग्रेजों की सेना को धूल चटाई। फिर 8 जुलाई, 1804 ई. में कोटा से उन्होंने अंग्रेजों को खदेड़ दिया।
11 सितंबर, 1804 ई. को अंग्रेज जनरल वेलेस्ले ने लॉर्ड ल्युक को लिखा कि यदि यशवंतराव पर जल्दी काबू नहीं पाया गया तो वे अन्य शासकों के साथ मिलकर अंग्रेजों को भारत से खदेड़ देंगे। इसी मद्देनजर नवंबर, 1804 ई. में अंग्रेजों ने दिग पर हमला कर दिया। इस युद्ध में भरतपुर के महाराज रंजित सिंह के साथ मिलकर उन्होंने अंग्रेजों को उनकी नानी याद दिलाई। यही नहीं इतिहास के मुताबिक उन्होंने 300 अंग्रेजों की नाक ही काट डाली थी।
अचानक रंजित सिंह ने भी यशवंतराव का साथ छोड़ दिया और अंग्रजों से हाथ मिला लिया। इसके बाद सिंधिया ने यशवंतराव की बहादुरी देखते हुए उनसे हाथ मिलाया। अंग्रेजों की चिंता बढ़ गई। लॉर्ड ल्युक ने लिखा कि यशवंतराव की सेना अंग्रेजों को मारने में बहुत आनंद लेती है। इसके बाद अंग्रेजों ने यह फैसला किया कि यशवंतराव के साथ संधि से ही बात संभल सकती है। इसलिए उनके साथ बिना शर्त संधि की जाए। उन्हें जो चाहिए, दे दिया जाए। उनका जितना साम्राज्य है, सब लौटा दिया जाए। इसके बावजूद यशवंतराव ने संधि से इंकार कर दिया।
वे सभी शासकों को एकजुट करने में जुटे हुए थे। अंत में जब उन्हें सफलता नहीं मिली तो उन्होंने दूसरी चाल से अंग्रेजों को मात देने की सोची। इस मद्देनजर उन्होंने 1805 ई. में अंग्रेजों के साथ संधि कर ली। अंग्रेजों ने उन्हें स्वतंत्र शासक माना और उनके सारे क्षेत्र लौटा दिए। इसके बाद उन्होंने सिंधिया के साथ मिलकर अंग्रेजों को खदेड़ने का एक और प्लान बनाया। उन्होंने सिंधिया को खत लिखा, लेकिन सिंधिया दगेबाज निकले और वह खत अंग्रेजों को दिखा दिया।
इसके बाद पूरा मामला फिर से बिगड़ गया। यशवंतराव ने हल्ला बोल दिया और अंग्रेजों को अकेले दम पर मात देने की पूरी तैयारी में जुट गए। इसके लिए उन्होंने भानपुर में गोला बारूद का कारखाना खोला। इसबार उन्होंने अंग्रेजों को खदेड़ने की ठान ली थी। इसलिए दिन-रात मेहनत करने में जुट गए थे। लगातार मेहनत करने के कारण उनका स्वास्थ्य भी गिरने लगा। लेकिन उन्होंने इस ओर ध्यान नहीं दिया और 28 अक्टूबर 1806 ई. में सिर्फ 30 साल की उम्र में वे स्वर्ग सिधार गए।
इस तरह से एक महान शासक का अंत हो गया। एक ऐसे शासक का जिसपर अंग्रेज कभी अधिकार नहीं जमा सके। एक ऐसे शासक का जिन्होंने अपनी छोटी उम्र को जंग के मैदान में झोंक दिया। यदि भारतीय शासकों ने उनका साथ दिया होता तो शायद तस्वीर कुछ और होती, लेकिन ऐसा नहीं हुआ और एक महान शासक यशवंतराव होलकर इतिहास के पन्नों में कहीं खो गया और खो गई उनकी बहादुरी, जो आज अनजान बनी हुई है।

संकलन:-
            - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Thursday, 21 January 2016

आक्रोश मेंढपाळांचा...


एकाच रक्ताच्या आणि हाडामांसाच्या औलादी माझ्याच समाजावरती एवढा अन्याय करत असतील असे कधी स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. पण स्वार्थी विचाराने बरबटलेल्या धनगर समाजातील नेत्यांनी(अपवाद वगळून) समाजाचे भांडवल आणि बाजारीकरण करून धनगर समाजाला देशोधडीस लावण्याचा जणू काय ठेकाच उचललाय की काय? या प्रवृत्तीचा विरोध करण्यासाठी आनंद नामदेव कोकरे यांसारखे सुशिक्षित मेंढपाळ वाचा फोडण्यासाठी पुढे सरसावत आहेत पण धनगर समाजातील ठराविक सोडले तर बाकीचे उच्चशिक्षित उच्चविभुषित इंजिनीयर, डॉक्टर, एडव्होकेट प्रशासकीय अधिकारी मात्र हातावर हात ठेवून मौनवृत्त धारण करून धनगर नेत्यांनी आणि प्रस्तापितांनी चालवलेला नंगानाच उघड्या डोळ्यांनी बघत बसलेत याचेच दुख होते.
धनगर समाजाच्या वाट्याला आलेली भटकंती ही जणू काय पाचवीलाच पुजलेली आहे. आज इथे तर उद्या तिथे रात्रंदिवस रानोमाळी डोंगरदरीतून सावजा-माजरांचा, साप-विंचू यांचा विचार न करता दगडधोंडे आणि काटेकुटे तुडवत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायाच्या नडग्या वाळवणार्या माझ्या धनगर समाजातील मायबापांचा विचार करायला आज कोणाकडे फुरसतही नाही. मी ज्या धनगर समाजात जन्माला आलो, ज्या वातवरणात शिकलो सवरलो खेळलो-बागडलो लहानाचा मोठा झालो त्या धनगर समाजाचे मी काहीतरी देणे लागतो याचा साधा पुसटसा विचारसुद्वा मनात न येणं ही दुर्दैवाची गोष्ट आहे. धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीच्या लढ्यात धनगर समाज जागृत होताना दिसताच प्रस्तापितांच्या तुकड्यावर तुटून पडलेल्या नेत्यांना धनगर समाज दिसू लागला. तापलेल्या तव्यावरती स्वताची भाकरी भाजून घ्यावी याच विचारात काही महाबहाद्दर राजकारणात उतरले तर काही मोर्चे आंदोलने करू लागले. प्रत्येकजण ओरडतोय बोंबलतोय आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी पण धनगर म्हणून एकत्रित येण्याची त्यांची लायकी नाही कारण आरक्षणाचे श्रेय माझ्याच पारड्यात कसं पडेल अशा भ्रमात आरक्षणाचा खेळखंडोबा करणारे दुसरे तिसरे कोणी नसून धनगर समाजातील स्वताला विद्वान समजून घेणारे सर्वच नव्हे तर काही अपवाद सोडले तर बाकीचे नेतेच जबाबदार आहेत असे म्हणायला काही वावगे वाटणार नाही.
समाजसेवक मेंढपाळ आनंद कोकरे यांनी जे विश्लेषण केले याचे धनगर समाजातील नेत्यांनी, बुद्धिजीवी वर्ग तसेच उच्चशिक्षित, उच्चविभुषितांनी चिंतन, मनन आणि आत्मरिक्षण करायला हवे. धनगर समाजबांधव आजही भटकंती करत या गावावरुन त्या गावाला पायपीट करत असतात. घोड्याच्या पाठीवर आयुष्याचा संसार लादून करडा-कोकरांचं आणि पोराबाळांच लटांबण सोबत घेऊन पोटाची खळगी भरत असतात. भारत सरकारने ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाची सोय करून दिली हे खरं पण मेंढ्यामागे आईबापांसोबत गावंच्या गावं पालथी घालणार्या धनगर समाजाच्या पोरांनी नेमकं शिक्षण घ्यायचं कुठं?? रहायचं कुठं?? खायचं काय ? याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. अनुसुचित जमातीचे आरक्षण हा एक डॉ. बाबासाहेबांनी दिलेला घटनादत्त अधिकार आहेच आहे पण त्यासाठी नेत्यांनी कोणीतरी धाकल्या बापाचं होऊन एकत्रित यायला हवं होतं पण तसे होत नाही आणि याच कारणामुळे धनगर समाजाच्या करोडो नव्हे तर अब्जावधी रूपयांचा चक्काचूर होतो आणि शेवटी हातात राहतो तो म्हणजेच बाबाजीचा ठुल्लू. पाठीमागच्या हिवाळी अधिवेशनात नेमकं तेच घडलं पण नेत्यांना याचे काय देणे घेणे?? आश्वासनांवरती आश्वासनं दिली जातात आणि त्याचा पाठपुरावा करण्यातच चार-पाच पिढ्या बरबाद होतात याला कारणीभूत म्हणजे समाजातील नेत्यांचा मनभेद-मतभेद आणि स्वार्थी भावना. या सर्व कारणामुळेच मग घोडं पेंड खाऊ लागतं... त्यासाठी एक व्हा आणि  नेक व्हा असं बुद्धिजीवी वर्ग सांगून सांगून थकला पण पालत्या घड्यावर पाणी ओतावं त्यातला प्रकार आजपर्यंत पहावयास मिळाला. एकत्रित येऊन  संघर्ष कराल तर कोई माई का लाल इस दुनिया मे पैदा नही हुआ जो धनगर समाज को रोख दे।
धनगर समाजाच्या शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे सरकारणे स्वताच्या घशात घालून घेतलीत एकीककडे जंगलच्या जंगल उध्वस्त करून कारखाने, सुतगिरण्या तर रासायनिक प्रकियेमुळे जिवित हानी पोहचवणार्या केमीकल कंपन्या उभारल्या जातात तर दुसरीकडे शेळ्या-मेंढ्यां, गाई-म्हैसीसाठी असलेली चराऊ कुरणे औद्योगिक संस्थांसाठी वापरली जातात मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करून पोट भरण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो मग धनगर समाजातील मुलं-मुली आई-वडिलांसोबतच जातात त्यांच्या शिक्षणासाठी, राहण्यासाठी निष्क्रीय सरकार काही करू शकत नाही पण करोडो अब्जो रूपयांची राखरांगोळी करणार्या नेत्यांनी मी धनगर मी धनगर म्हणून उदो उदो करत बसण्यापेक्षा तुमच्या आंदोलनात, मोर्चात साध्या चहाची सुद्धा अपेक्षा न ठेवता प्राणपणाने झटणार्या आणि झगडणार्या भटकंती करणार्या मेंढपाळांच्या पाल्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्विकारली तर सोन्याहून पिवळं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             - नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
           +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com