...वारी वारी आरक्षणाची वारी...
आजकाल कोणीही उठतोय अन् राज्यघटनेत नसतानाही आरक्षण मागत बसतोय अशी परिस्थिती या महाराष्ट्र राज्यात दिसून येतेय. ज्या वंचित घटकाला राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत आरक्षणाची तरतूद करून ठेवली होती त्या आर्थिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सामाजिक व राजकीयदृष्ट्या मागासलेल्या धनगर समाजाला अजूनही अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही तोपर्यंत इतर समाज पायात पाय अडकवण्याठी आरक्षणाची वारी वारी करत बसलेत हे कीती मोठे दुर्दैव छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र राज्याचे.??
बाबासाहेबांच्या विचारावरती, राज्यघटनेवरती हे संबंध राष्ट्र सुरळितपणे मार्गक्रमण करते आहे पण सनातनी आणि पुरोगामी विचारांनी बरबटलेल्या राजकारण्यांना फुले शाहू आंबेडकरांचे विचार आणि भारतीय राज्यघटनाच मान्य नाही असे म्हणायला मला काही वावगे वाटणार नाही. आणि जर राज्यघटना मान्य असती तर आज धनगर समाजाला घटनादत्त अधिकार असलेले अनुसूचित जमातीची अंमलबजावणी कधीच झाली असती. डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेमद्ये शोषित समाजाच्या उद्धारासाठी राज्यघटनेत तरतूद केली नसती तर आज धनगर-बहुजन समाजातील पोरं ब्राह्मनांच्या घरी धुणे-भांडी करत बसली असती हे सत्य विसरून चालणार नाही. इतिहासांतही डोकावून पाहिले तर बहुजन समाजाच्या त्याचप्रमाणे दलित अस्पृश्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या महात्मा फुलेंचे विचार हे बाळ गंगाधर टिळकांना पटत नव्हते कारण टिळक हे सनातनी विचारांचे होते. आजही महाराष्ट्र राज्यांत नव्हे तर अखंड भारतामद्ये बहुजन समाजाच्या विकासाचा जर चढता आलेख पाहिला तर सनातन्यांच्या ज्या औलादी राजकारण करताहेत त्यांच्या पोटात दुखू लागते.
आज इतर समाजाच्या तुलनेत धनगर समाज हा विकासपासून कोसो दूर आहे. जन्मापासूनच आयुष्याचा संसार लादलेल्या घोड्याच्या पाठीवर बसून आमची भटकंती सुरू झाली, कोकऱ्या-करडांचं लटाबणं सोबत घेऊन वेळप्रसंगी काट्या-कुट्यांचा, दगडधोंड्यांचा विचार न करता अनवाणी पायानं पोटाची खळगी भरण्यासाठी गावच्या गावं पालथी घालणारी आमची धनगर जमात रानावनात आणि जंगलातच राहिली. पोरं-बाळं सोबत घेऊन रोजच्या भाकरीसाठी वणवण फिरण्यामुळे धनगर समाजातील मुला-मुलींना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. समाजात शिक्षणाची कमतरता असल्याने विकासाच्या प्रवाहापासून ही धनगर जमात दूरच राहिली. ६-१४ वयोगटातील मुलां-मुलींना मोफत शिक्षणाची व्यवस्था करून काय फायदा?? गावोगाव भटकंती करणाऱ्या मेंढपाळांची पोरं आई-वडिलांसोबतच या गावावरून त्या गावाला भटकंती करणार मग ६-१४ वयोगटातील मुलं-मुली शिक्षण घेणार तरी कोठून??
शेळ्या-मेंढ्यांसाठी असलेली चराऊ कुरणे, गायराने ही सरकारने हडपली. काही ठिकाणी मस्तावलेल्या माजग्या पुढाऱ्यांनी स्वताच्या खाजगी कंपन्या उभा केल्या तर सर्रास चराऊ कुरणांवरती वनखात्याने मेंढपाळांना पाबंदी घातली. मग शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगाव भटकंती करण्याशिवाय मेंढपाळांसमोर पर्यायच उरत नाही मग धनगर जमातींमधील मुलं-मुली शिक्षण घेणार कोठून? रानावनात, जंगलात राहणाऱ्या, तीन दगडाच्या चुलींवर स्वयंपाक करून आदिवासी जीवन जगणाऱ्या या जमातीचा सर्व अभ्यास करूनच डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगर जमातीला अनुसुचित जमातीचे आरक्षण दिले होते पण "र" चा "ड" झाल्यामुळे सगळा राडा झाला आणि धनगर समाजाची हजारो मुलं-मुली आय ए एस, आय पी एस, डाॅक्टर, इंजीनीयर, वकील होण्यापासून वंचित राहिली.
आजपर्यंत धनगर समाज अज्ञानाचं घोंगडं पांघरून गाढ निद्रावस्थेत झोपी गेला होता पण आता समाज कुठेतरी जागृत होऊ लागला आहे. त्यामुळे समाजातील जागृत युवा वर्गाने तरून-तरूनींनी समाजाच्या न्याय व हक्कासाठी धनगर समाजाच्या आरक्षण लढ्यात सहभागी व्हावे. जोपर्यंत धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी होतं नाही तोपर्यंत धनगर समाजाचा काहीच उद्धार होणार नाही. जर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजीवणी झाली तरच उद्याची पीढी सुज्ञान आणि सुशिक्षीत असेल. अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली तर हजारो IAS/IPS, Advocates, Doctors, Engineers या समाजातूनच उदयाला येतील आणि भारताचं प्रशासन चालवतील, अखंड भारताचा राज्यकारभार धनगर समाजातील पोरं चालवतील तेव्हा राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे स्वप्न साकार होईल अन्यथा उद्याच्या पिढीवरही आजच्यासारखे अन्याय व अत्याचार सहन करायची वेळ आली तर उद्याची पिढी तुमच्या-आमच्या तोंडात शेण घातल्याशिवाय राहणार नाही. "र" चा "ड" झाला म्हणून धनगर समाज रडत बसलाय ही भाषा बोलणाऱ्यांनो पुन्हा बोलताना थोबाड सांभाळून बोला नायतर ही धनगराची औलाद तुम्हाला बोलायला तुमचे थोबाडच जाग्यावर ठेवणार नाही हे लक्षात ठेवा. आम्ही इतरांसारखे राज्यघटनेत नसताना भिक मागत बसत नाही तर डाॅ.बाबासाहेबांनी राज्यघटनेत दिलेले आमचे हक्काचे मागतोय पण आमचा जर संयम सुटला तर लाथा घालून हिसकावून घ्यायला आम्हाला वेळ लागणार नाही कारण आमच्या नसानसात महाराजा यशवंतराव होळकरांचं रक्त सळसळतंय.... राज्यघटनेत आरक्षण दिले नसताना देखील इतर समाजातील समाजबांधव आणि त्या त्या समाजातील नेते पक्ष, संघटना, गट-तट बाजूला ठेवून आरक्षणासाठी एकत्रित येतात, चर्चा करतात आणि आंदोलन मोर्चे रास्तारोखो करतात पण धनगर समाजातील नेते मात्र मी मोठा होतोय की तू मोठा होतोय म्हणून भांडत बसलेत अन् एकमेकांची जिरवाजिरवी करत बसलेत त्यामुळे धनगर समाजाचे वाटोळं होतंय. धनगर समाजाचे एखादं संघटन मजबूत असावं म्हणून एखाद्याला उठवून उभा करून घोड्यावर बसवला तर तो धनगर समाजाला फाट्यावर मारून समाजातील नेत्यांनाच विरोध करत स्वार्थासाठी स्वताचंच घोडं दामटत बसतोय मग या सर्व प्रकाराला नक्की काय म्हणायचे?? तरी एक म्हण सर्वज्ञात आहेच "धनगरी जत्रा अन कारभारी सतरा" असे नाइलाजाने मला म्हणावेसे वाटतेंय.
बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असतं,
पळसाच्या पानाला ढाल बनवलं असतं,
माझ्याच धनगर समाजात आज एकी नाहीये,
नाहीतर.....महाराष्ट्रावर नव्हे तर
अख्ख्या भारतावर फक्त आमचंच राज्य असतं.
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:
Post a Comment