Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Tuesday, 4 August 2015

चेष्टा लावलीय का धनगर जमातीची?


मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस काय चेष्टा लावलीय का तुम्ही धनगर समाजाची?? आपण कायदेपंडित आहात, आपणास कायद्याचं उत्तम ज्ञान आहे त्यामुळे आपणास असं करणं शोभत नाही. या राज्यातील जनतेला परिणामी ज्या धनगर समाजानं तुम्हाला सत्तेत आणून बसवलं त्या धनगर समाजाला आपल्याकडून खूप अपेक्षा असताना तुम्ही वेडेपणाचे भोळेपणाचे सोंग घेऊन आम्हाला फसवायचे धोरण आखताय ते कशासाठी?? आणि कोणाच्या सांगण्यावरुन?? शरद पवारांचे जातियत्व  स्विकारुन तुम्ही धनगर समाजावरती अन्याय करत आहात याचं भान राहुद्या. एखाद्या जमातीवरती गेल्या ६५ वर्षापासून विनाकारण अन्याय होत असेल आणि त्या जमातीला जर त्यांच्या हक्कापासून दूर ठेवलं जात असेल तर तुमच्यावरती देशद्रोहाचा खटला भरायला पाहिजे का??
धनगर समाजाची स्पष्ट मागणी अशी आहे की, भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या कलम क्र ३४२ वरती महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टामध्ये अ.क्र. ३६ वरती ओरॉन, धनगड (धनगर) असा स्पष्ट उल्लेख आहे. दरवर्षी एप्रिल महिन्यात प्रकाशित होणार्या २००७-०८ व २००९-१० या वार्षिक अहवालात ३६ क्रमांकावर ओरॉन, धनगर असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याशिवाय राज्यघटनेत धनगड असे टायप आहे त्यासाठी हिंदी शब्दकोश चाळा हिंदीमधील "ड" चा उच्चार मराठीत "र" असाच होतो आहे. म्हणून धनगड आणि धनगर या वेगळ्या जमाती नसून एकच "धनगर" नावाची जमात आहे. राज्यघटना अमलात आल्यापासून म्हणजे १९५० पासून धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून दूर ठेवले आहे त्या सवलती धनगर समाजाला त्वरित लागू कराव्यात त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून केंद्र सरकारला फक्त अशी शिफारस पाठवायची आहे की "राज्यघटनेतील कलम ३४२ वरील अनुसुचित जमातीच्या महाराष्ट्र राज्याच्या ९ व्या परिशिष्टातील अ.क्र.३६ वरील ओरॉन, धनगड मधील "धनगड" ही जमात महाराष्ट्र राज्यात कोठेही वास्तव्यास नसून ती  "धनगर" हीच जमात आहे आणि गेल्या ६५ वर्षापासून या धनगर जमातीला "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सवलती देण्यात आल्या नाहीत त्या सवलती त्वरित लागू कराव्यात".
धनगर जमातीची मागणी साधी आणि सरळ असताना देवेंद्रजी फडणवीस तुमचे विधानभवनातील (पावसाळी अधिवेशनातील) विधान म्हणजे शरद पवारांचे जातियत्व स्विकारल्याचे समजून येते.  मुळात धनगर आणि धनगड या जमाती वेगवेगळ्या नसून धनगर ही नावाची एकच जमात आहे. (त्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संपूर्ण  वाङमय खंड-१ दि ९ मे १९१६ हा संदर्भ तपासावा).  "भारत में जातिप्रथा संरचना, उत्पत्ति और विकास" या खंडामध्ये  डॉ बाबासाहेबांनी जातींच्या व जमातींच्या लोकसंख्येचा अहवाल सादर केला होता त्या अहवालामध्ये  पान क्र २३५ वरती "धनगर"  या जमातीचा स्पष्ट उल्लेख आहे याशिवाय धनगड या जमातीचा कोठेही उल्लेख नाही. महाराष्ट्र राज्यात परिणामी भारतात धनगड जमात आहे तरी कोठे?? काल-परवा बिहार सरकारने धनगड व धनगर वेगळे नसून एकच असल्याची घोषणा केली व बिहार मधील धनगर जमातीला अनुसुचित जमातीच्या सवलती लागू केल्या.
महाराष्ट्र राज्यातील धनगर जमातीला अनुसूचित जमातीच्या सवलती न मिळाल्यामुळे धनगर जमातीची राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात पीछेहाट झाल्याने या जमातीचे पुढच्या ५०-६०  वर्षात सुद्धा न भरून येणारे नुकसान झाले आहे. आणि या सर्व नुकसानीस महाराष्ट्र राज्यातील प्रस्थापित व्यवस्था जबाबदार आहे आणि तुम्ही सुद्धा यास जबाबदार रहाल.
देवेंद्र फसणवीस तुम्ही विधानभवनात विधान केले की, "धनगर" आणि "धनगड' या जमाती एक आहेत की वेगवेगळ्या याची पडताळणी करण्यासाठी  टाटा रिसर्च इंन्स्टिट्यूट अॉफ सोशल सायन्स मुंबई आणि अदिवाशी विकास व प्रशिक्षण संस्था पुणे या दोन्ही संस्थांना अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्या त्या संस्थांनी अहवाल सादर केल्यानंतर अहवाल जर सकारात्मक आले तर धनगर जमातीला अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट करण्यात येईल.  पण राज्यघटनेनुसार जर एखाद्या जमातीला अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट करायचे असेल तर वरील संस्था अहवाल सादर करून ती संबंधित जमात त्या त्या प्रवर्गाचे निकष पुर्ण करते की नाही हे कळवतात तद्नंतर त्या जमातींना सामाविष्ट करायचे का नाही हा प्रश्न उपस्थित होतो.
पण एखादी जमात जर संविधानानुसार भारतीय राज्यघटनेत अगोदरच सामाविष्ट केली गेलेली असेल तर राज्य सरकारने केंद्र सरकारला फक्त शिफारस करायची आहे की ज्या जमाती अनुसुचित जमातीच्या यादीत सामाविष्ट आहेत त्या त्या जमातींना त्यांच्या सवलती व लाभ द्यायला पाहिजेत म्हणून धनगर ही जमात अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहे त्याचे भक्कम आणि सबळ पुरावे उपलब्ध असताना मुख्यमंत्र्यांनी धनगर जमातीची घोर फसवणूक करू नये अन्यथा आम्हाला आमच्या औकातीवर यायला वेळ लागणार नाही.
आमची मागणी धनगर जमातीला आरक्षण द्या किंवा अनुसूचित जमातीमध्ये सामाविष्ट करा अशी नसून अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये असलेल्या आमच्या धनगर जमातीला आमच्या हक्काच्या सवलती लागू कराव्यात आणि केंद्र सरकारकडे तशी शिफारस पाठवावी एवढीच आमची मागणी आहे. यासाठी
१) कोणत्याही संस्थेकडून अहवाल मागवण्याची गरज नाही.
२) यासाठी कोणतीही समिति नेमण्याची गरज नाही.
 मुख्यमंत्री महोदय तुम्ही वेळकाढूपणा करून धनगर समाजाला बोहल्यावर चढवण्याचा प्रकार करू नका आणि ते आता सहनसुद्धा केले जाणार नाही. आम्ही अगोदरच अनुसुचित जमातीमध्ये आहोत त्या अनुषंगाने त्वरित शिफारस करून आम्हाला आमच्या सवलती त्वरित लागू कराव्यात नाहीतर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला क्षणमात्रही वेळ लागणार नाही. आतापर्यंत आम्ही शांत होतो पण तुम्ही आमचा अंत पाहू लागलात. आता आर या पार नाहीतर करो या मरो उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेवून उद्या महाराष्ट्र पेटवायला आम्हाला वेळ लागणार नाही.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
  अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

Friday, 31 July 2015

"आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय"

आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय..
एकेकाळी राजा समाज असणारी आमची जमात आज डोळ्यावरती अज्ञानाचं घोंगडं पाघरूण गाढ झोपी गेली आहे. माझा-भोळा-भाबडा धनगर समाज निद्रावस्थेत असताना धनगर जमातीमधील नेत्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे की खरंच ते आंधळे झाले आहेत तेच समजेना. ज्या समाजाचं नेतृत्व निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज आहे तो समाज कधीच प्रगतीपथावर पोहचत नाही हे तितकेच सत्य आहे. ज्या दिवसी धनगर समाजाचे नेते प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस यांची चमचेगीरी करायचे सोडून देतील त्याचवेळी धनगर समाज खर्या अर्थाने विकासाच्या दिशेने पाऊल टाकेल. समाजाचं बाजारीकरण जोपर्यंत थांबणार नाही तोपर्यंत धनगर समाजाला न्याय मिळणार नाही. नाहीतर अन्याय आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे.
धनगर समाजातील नेत्यांची अवस्था आंधळ्यासारखी झालेली आहे. प्रस्तापितांचे बुट उचलायची आणि चाटायची घाणेरडी सवय समाजातील काही नेत्यांना आहे. स्वार्थासाठी समाजातील नेते त्या प्रस्तापितांची चमचेगीरी अन् हुजरेगीरी करताहेत आणि भोळ्या भाबड्या धनगर समाजाला प्रस्तापितांच्या अर्थातच लांडग्यांच्या दावणीला बांधायचे काम करताहेत पण या सर्वांचा फायदा होतोय त्या प्रस्तापितांना. प्रस्तापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस सारखे लांडगे धनगर समाजातील काही नेत्यांना जवळ करून त्यांना फूस लावताहेत मग धनगर समाजातील विकले गेलेले नेते धनगर समाजाला फसवून त्या लांडग्यांच्या दावणीला घेऊन जातात. त्या प्रस्तापितांनी आजपर्यंत धनगर समाजाच्या एकाही व्यक्तीला खासदार म्हणून लोकसभेत पाठवले नाही एवढेच नव्हे तर महाराष्ट्र राज्यात आणि परिणामी भारतात क्रमांक एक वरती लोकसंख्या असलेल्या धनगर समाजाचे विधानसभा सदस्य म्हणजेच आमदार मात्र बोटावर  मोजण्याएवढेच कसे काय?
धनगर समाजाचे नेते त्या प्रस्तापितांच्या मागे जातात खरे पण त्यांना माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा विकास कधीही करता आला नाही. माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाबांधवांच्या भावना त्यांना कधी समजल्याच नाहीत. मग धनगर समाजाच्या त्या नेत्यांना नेते म्हणायचे की दलाल?? भूंक म्हणलं भुंकायचं छौ म्हणलं की पळायचं अन त्या प्रसतापितांच्या दावणीला जाऊन शेपूट हालवत बसायचं आणि प्रस्थापित पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीसांनी टाकलेल्या तुकड्यावर जीभाळ्या चाटायच्या आणि पुन्हा धनगर समाजाला फसवायच्या तयारीला लागायचं अशी अवस्था धनगर समाजातील काही अज्ञानी आणि स्वार्थी नेत्यांची आहे. अरे माणुसकी कुठेतरी शिल्लक असायला पाहिजे ना??
जर त्या संबंधित नेत्यांना इतिहासाची जाण असती तर अटकेपार झेंडे फडकवणार्या राजे मल्हारराव होळकर यांच्या शब्दाला थोरला बाजीराव पेशवा मान द्यायचा हा इतिहास त्या नेत्यांना कुणीतरी समजावून सांगा. सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना विचारल्यानंतरच बाजीराव पेशवा निर्णय घ्यायचा पण आज त्यांच्याच जातीत जन्माला आलेले अन् स्वतःला मल्हाररावांचे वारसदार समजणारे नेते (धनगर समाजातील दलाल)  समाजासाठी एखादं काम करायचं ठरवलं तर प्रस्तापित आणि माजोरड्या नेत्यांचे सल्ले घेतात आणि प्रस्तापितांनाच पुढे करतात. अरे कुठे ती राजेशाही अन् कुठे आजच्या नेत्यांची ही गुलामगीरी?? खरंतर महाराष्ट्र राज्यातील जनतेला धनगर समाजातील नेते दिसत नाहीत तर दिसतात ते फक्त समाजाच्या नावावरती मलीदा खाणारे चोर अन् गोरगरीब शेतकर्यांच्या नर्डीवरून नांगर फिरवून टाळूवरचं लोणी खाणार्या त्या औलादी त्यांना स्वतःची घरं भरण्यापलिकडं व सत्ता संपत्ति मिळवण्यापलिकडं काहीच जमत नाही. म्हणून त्या प्रस्तापितांच्या आजूबाजूला फिरणारे धनगर समाजातील नेते आणि प्रस्थापित नेते यांच्यातील नातं म्हणजे "आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं" असंच आहे आणि अक्षरशा ही म्हण खरी ठरतीय असं म्हणायला मला काही वावगं वाटणार नाही.
म्हणून जे स्वतःला धनगर समाजाचे नेते म्हणवून घेताहेत त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो तुम्ही खरंच धनगराच्या औलादी असाल तर आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करणार्या अन् आपल्याला हक्कापासून वंचित ठेवणार्या नेत्यांना बुटाखाली घ्यायला शिका, नाहीतर पुन्हा माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाकडे मताचा जोगवा अन् भिक मागायला आला तर पायातलं पायथान हातात घेऊन तुमच्या थोबाडात मारल्याशिवाय या धनगरांच्या औलादी कदापि शांत बसणार नाहीत.
जय मल्हार!! जय अहिल्या!!

          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Sunday, 19 July 2015

धनगर असाल तर पेटून उठा...

👉धनगर असाल तर पेटून⚡उठा..💪👊
देशाला स्वातंत्र्य मिळून ६८ वर्ष होत आली पण देशातील जनता अजूनही पारतंत्र्यातच आहे. १५० वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं आणि देश सोडून गेले पण याच देशातले काळे इंग्रज (पवार पाटील देशमुख ठाकरे फडणवीस) सत्ताधारी सत्तापिपासू मस्तवाल माणसं अजूनही आमच्या गोरगरीब जनतेच्या आणि शेतकर्यांच्या उरावर बसून राज्य करताहेत. गेल्या ६७ वर्षापासून या जनतेवर अन्याय होत आला आहे. विशेषता ज्या धनगर समाजाला राज्यघटनेतील अनुसुचित जमातीच्या यादीमध्ये कलम ३४२ वरती महाराष्ट्र राज्यासाठी असलेल्या नवव्या परिशिष्ठामध्ये ३६ व्या क्रमांकावरती ओरॉन, धनगड असा उल्लेख करून धनगर समाजाला त्याचवेळी डॉ बाबासाहेबांनी अनुसुचित जमातीचे हक्क दिलेले आहेत. राज्यघटनेत टायपिंग करताना "र" ऐवजी "ड" झाल्यामुळे सर्व राडा झाला आणि आमच्या धनगर समाजावर अन्याय होत आला आहे. आमच्या अज्ञानपणामुळे आणि अशिक्षितपणामुळे आम्हाला त्याची जाणीव झाली नव्हती पण हळूहळू आमच्या समाजातील समाजबांधव शिक्षित झाले तेव्हा ही चूक आमच्या लक्षात आली. महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची कोणतीही जमात नाही अन् कोणी व्यक्तिही नाही मग धनगड या जमातीसाठी येणारा वार्षिक निधी, सामाजिक एवं शैक्षणिक निधी तसेच सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अधिकार आणि आरक्षण याचा उपयोग नक्की कोण करतंय?? आणि या समाजाचा निधी नक्की कोण खातंय?? याचा विचार कधी तुम्ही आम्ही केलात का?? कधी कधी तर या समाजाचा निधी वापरला न गेल्याने तसाच सरकार दरबारी परत गेलेला आहे. मग धनगड समाज महाराष्ट्र राज्यात नसताना त्याचा उल्लेख राज्यघटनेत कसा काय?? धनगड समाजाची एखादी व्यक्ति महाराष्ट्र राज्यात असती तर धनगर समाजाच्या मागणी दरम्याण कोणीच कसे पुढे आले नाही.?? किंवा त्या धनगड जमातीच्या व्यक्तिंनी कोणीच कसा विरोध केला नाही.??
खरंतर "धनगड" आणि "धनगर" या जमाती वेगवेगळ्या असतील तर मग ३६ व्या क्रमांकावर ओरॉन आणि धनगड असा उल्लेख असताना "ओरॉन" या शब्दाचा समानार्थी शब्द "धनगर" असल्याचे पुरावे सुद्धा माझ्याकडे आहेत. (वन्यजनजाती अहवाल २००९-२०१० मध्ये ओरॉन, धनगर असाही उल्लेख आहे) तरीही ओरॉन, धनगड आणि धनगर या वेगवेगळ्या जमाती कशा काय?? याशिवाय हिंदी मधील र आणि ड शब्दांचा उच्चार इंग्रजीमध्ये R असाच केला जातो. त्यासंदर्भातील पुरावे सुद्धा आहेत.
मराठी व इंग्रजी शब्दांचा हिंदीमध्ये उच्चार करताना खालीलप्रमाणे करतात.
एकर(Acre) हिंदीमध्ये एकड
गुरगाव(Gurgaon)हिंदीमध्ये गुडगाव
छत्तीसगड (Chattisgarh): हिंदीमध्ये छत्तीसगढ़
त्याचपद्धतीने
धनगर(Dhangar): हिंदीमध्ये धनगड
याशिवाय श्री लक्ष्मणराव अघडते गुरूजी यांनी आदिवासी संशोधन केंद्रास पाठवलेल्या पत्रास प्रतिक्रिया देताना आयुक्तांनी धनगर आणि धनगड वेगळे आहेत असे नमूद केले पण धनगड ही जमात नांदेड व बीड या भागात वास्तव्यास असल्याचे कळवले पण तिथे त्यांनी नांदेड व बीड ऐवजी Nander व Bir असा उल्लेख केला आहे. माझा त्यां आयुक्तांना प्रतिसवाल आहे की महाराष्ट्र राज्यात नांदेर आणि बीर ही ठिकाणं नक्की कोठे आहेत?? ती ठिकाणे आम्हाला दाखवून द्याल का?? जर नांदेर आणि नांदेड व बीर आणि बीड हे वेगवेगळे आहेत असे दाखवून द्याल तर आम्ही आमची अनुसुचित जमातीच्या सवलती लागू करण्याबाबतची मागणी इथेच थांबवतो. पण जर महाराष्ट्रातील "नांदेर आणि नांदेड" व "बीर आणि बीड" ही ठिकाणे एकच असतील तर मग धनगर आणि धनगड ही जमातसुद्धा वेगवेगळी नसून एकच आहे हे मान्य करून आणि त्या अनुषंगाने त्वरित आम्हाला आमच्या अनुसुचित जमातीच्या सवलती लागू कराव्यात ज्या गेल्या ६५ वर्षापासून प्रलंबित आहेत.
राहीला प्रश्न धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो की नाही??
तर उत्तर आहे होय, धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो.
प्राचीन अर्थातच आदिम काळापासून धनगर जमात वास्तव्यास आहे. आणि धनगर जमातीचा प्राचीन काळापासूनचा इतिहास सुद्धा आहे.
भौगोलिक स्थितीचा अभ्यास केल्यास धनगर जमात ही डोंगरदरी-रानावनात लोकवस्ती करून वास्तव्यास राहणारी जमात आहे.
वन्यजनजाती अहवालामध्ये गायी, म्हैसी, बकरी, शेळ्या, मेंढ्या, बैल, कु्त्रा, गाढव, घोडा खेचर आदी वन्य प्राणी पाळणारी जमात म्हणजे वन्यजनजाती अर्थातच आदिवासी तर मग धनगर समाज प्राचीन काळापासून शेळ्या-मेंढ्या, गायी, म्हैसी, बैल कुत्रा घोडा यांचे पालन करतो. त्याचप्रमाणे धनगर समाज बांधवांकडे शेती नसल्याने व शेती असली तर थोडकीच असते त्यासाठी शेळ्या-मेंढ्याचे पालन-पोषण करण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्यासाठी धनगर समाजाला वणवण करावी लागते. अर्थातच आदिवासी समाजापेक्षा अत्यंत हालाखीचे जीवन धनगर जमातीचे आहे.
लाजरे-बुजरेपणा: धनगर समाज मुळातच डोंगर-दरी खोर्यात व रानावनात राहत असल्याने लाजरे-बुजरेपणा त्यांच्या अंगी आहे. शिवाय धनगर समाज हा एकोप्याने राहणारा वाडी वस्तीवरती लोकवस्ती करून शहरापासून दूर आढळतो.
मागासलेपण: मुळातच धनगर जमात ही सतत भटकंती करणारी जमात असल्याने स्वतःची व शेळ्या-मेंढ्यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एका गावावरून दुसर्या गावी भटकंती करण्याची परिस्थिति उद्भवली ती आर्थिक मागासलेपण असल्यानेच. जर धनगर ही जमात धन-दौलतीने समृद्ध असती तर भटकंती करण्याची वेळ आलीच नसती. भटकंती आमच्या पाचवीलाच पुजली असल्याने धनगर समाजबांधवांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवरती आला. एखाद्या गावात शिक्षणासाठी मुलामुलींना ठेवायचं म्हणलं तर खर्च परवडत नसल्याने पोरांचं  आणि कोकरा-करडांचं लचांड सोबत घेऊन धनगर समाजबांधवांना वणवण करावी लागते. त्याशिवाय हा समाज भटका असल्याने राजकीय क्षेत्रात कधी पुढे आलाच नाही. अर्थातच आमचं नेतृत्व नव्हतं. राजकीय मागासलेपणा येथे दिसून येतो.
अशा पद्धतीने प्राचीन जीवनमान, भौगोलिक स्थिती व राहणीमान, पशूपालन, लाजरे-बुजरेपणा, मागासलेपणा यावरतून व सध्यस्थितीवरतून धनगर समाज आदिवासी असल्याचे निकष पुर्ण करतो. आदिवासी समाजापेक्षा अत्यंत बिकट आणि हालाखीची परिस्थिति धनगर जमातीच्या वाट्याला आली असताना धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यास मागील सरकार ना नू करत होते त्यावेळी धनगर समाजाने त्यांना २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत हिसका दाखवला. सदरचे राज्यातील सरकार सुद्धा आश्वासने विसरून धनगर समाजास अनुसुचित जमातीच्या सवलती देण्यासंदर्भात वेळकाढूपणा करत असलेने धनगर समाजात तीव्र संतापाची लाट आहे. सदरच्या पावसाळी अधिवेशनात जर सरकारने आरक्षणाचा मुद्धा मार्गी लावला नाही तर धनगर समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र पेटवून टाकायला मागे पुढे पाहणार नाही. रस्त्यावर कोणत्याही आमदार/खासदार अथवा मंत्र्यांची गाडी फिरकू देणार नाही अन् फिरकलीच तर चक्काचूर केल्याशिवाय धनगर समाज शांत बसणार नाही मग आमच्यावर गोळ्या झेलायची वेळ आली तरी बेहतर पण आमचे हक्क हिसकावून घेतल्याशिवाय कोणालाही सुखात जगू देणार नाही. कारण गेल्या ६५ वर्षापासून आम्ही अन्याय आणि दुख सहन करत आलोय आता आमचा संयम सुटलेला आहे.
सर्व समाजबांधवांनी २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे. प्रस्थापित नेते आणि प्रस्थापितांचे तळवे चाटणारे धनगर समाजातील निष्क्रिय नालायक आणि निर्लज्ज नेते धनगर समाजामध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र रचून त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करून धनगर समाजाची दिशाभुल करताहेत. त्यासाठीच सुज्ञ शिक्षित आणि होतकरू युवकांनी  २१ जुलै रोजी जातीवंत धनगर समाज बांधवांना बारामतीमध्येच उपस्थित राहण्यास आवाहन करावे. ज्यांच्या अंगात फक्त धनगर समाजाचं रक्त सळसळतंय त्यांनीच २१ जुलै रोजी बारामती येथे उपस्थित रहावे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

अखिर हद कर दी आपने...

अखिर हद कर दी आपने...
धनगर समाजाच्या एकीमध्ये बेकी आणायचे काम धनगर समाजातीलच काही हुजरे नेते करताहेत. खरंतर गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजाचं वाटोळं कोणी केलं असेल तर धनगर समाजातील काही नालायक नेत्यांची नावं पुढे येताहेत मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. आजपर्यंत आम्ही विनाकारण प्रस्थापितांना दोष देत होतो आणि आजही देत आहे पण माझ्याच समाजाचं नेतृत्व नालायक, निर्लज्ज आणि निष्क्रिय असेल तर प्रस्थापितांना दोष देण्यात काय अर्थ?
स्वतःची बुद्धि आणि स्वतःचे विचार यांनी कधीच समाजाच्या हक्कासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले नाहीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धनगर समाजाचे सर्वच नव्हे  एक दोन नेते सोडले तर बाकीचे नेते इथपर्यंतचा विचार करण्याच्या लायकीचे वा पात्रतेचे नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  स्वतःचा स्वाभिमान प्रस्तापितांच्या बुटाखाली गहाण टाकणार्या या औलादी धनगर समाजात जन्मालाच कशा येतात?? मग त्या औलादी खरंच धनगर समाजाच्या आहेत की आणखीन कोणाच्या?? असा प्रश्न उपस्थित राहतो.
आजपर्यंत रानोमाळी आणि डोंगरदरी-खोर्यातून पायांच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणार्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राजकारण काय असतं हेच माहित नव्हतं. धनगर समाजातील नेते कुठल्यातरी प्रस्तापितांची चमचेगीरी आणि हुजरेगीरी करताहेत याचं भानही नव्हतं. माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत या मस्तावलेल्या नेत्यांनी समाजाचं बाजारीकरण करून स्वताची घरं भरली, सात पिढ्या ऐशोआरामात बसून खातील एवढी संपत्ति त्यांनी गोळा केली. पण माझ्या गोरगरीब आणि भोळ्याभाबड्या धनगर समाजाच्या वाट्याला आली ती फक्त पाचवीला पुजलेली भटकंती आणि डोईवरती अन्यायची टांगती तलवार.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू व्हाव्यात यासाठी समाजबांधव संघर्ष करताहेत, पण राजकीय नेत्यांना त्याचं काही भानच नाही. दि ९ जुलै ते १२ जुलै पर्यंत राज्यातील सर्व आमदारांना आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात निवेदने दिली होती. तद्नंतर दि १५ जुलै रोजी राज्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आणि हा उपक्रम सर्व समाजबांधवांनी यशस्वीरीत्या राबविला आणि पार पाडला होता. या उपक्रमातून कोणाला नेतेगीरी अथवा पुढारपण करायचं नव्हतं, कोणीही स्वार्थासाठी झटत आणि झगडत नव्हतं तर समाजावरती होत असलेल्या अन्यायाचं भान ठेवून निस्वार्थीपणे लढा उभा करत व प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून एकमेकांच्या हातात हात देवून आमदारांना, मंत्र्यांना व प्रशासनालादेखिल हातघाईला आणले आहे. या लढ्यानंतर जरी सरकारने आरक्षणासंदर्भात तोडगा काढला नाही तर दि २१ जुलै रोजी बारामती येथे धनगर आरक्षण कृति समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. लाखोच्या संख्येने धनगर समाज बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे.
समाजातील तमाम बुद्धिजीवी वर्ग आणि तळागळातील सर्व समाजबांधव बारामतीला एकत्रित झाला तर प्रस्तापितांच्या ह्रदयात धडकी भरेल त्यांना कापरं भरतील म्हणून प्रस्तापितांच्या सांगण्यावरूनच म्हणा अथवा धनगर समाजात फाटाफूट करायची आणि धनगर समाजाला कधी एकत्रित येवू द्यायचं नाही म्हणून काही बाजारबुनग्यांनी त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजीच मुंबई येथील आझाद मैदानात मोर्चा आयोजित करुन विधानभवनावर आंदोलन करण्याच्या वल्गना करुन धनगर समाजाला संपवायचं षडयंत्रच रचलेलं आहे.
काहीही झालं तरी २१ जुलै रोजी धनगर समाज फक्त बारामतीमध्येच लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आणि आम्हीसुद्धा जातीनं तिथं पोहचणार. २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करण्यापाठीमागं काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे ते नाकारता येत नाही. २१ जुलै व्यतिरिक्त कोणत्याही दिवसी मुंबई मध्ये मोर्चा असो अथवा रास्तारोखो किंवा चक्काजाम आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देवून लढू पण २१ जुलै रोजी फक्त आणि फक्त बारामतीमध्येच प्रेरणा दिवस या निमीत्ताने लाखोच्या संख्येने उपस्थित राहू.
धनगर समाजाच्या संबंधित नेत्यांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्ही आजपर्यंत आमच्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवत आला आहात. माझ्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाला प्रस्थापित लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केले आहे आणि आजही करताय. तुम्हाला जर विधानभवनावर मोर्चा काढायचा असेल तर बिनदास्तपणे काढा पण २१ जुलै सोडून कधीही काढा आम्ही त्यावेळी तुमच्या सोबत राहू. पण जर २१ जुलै रोजी  मुद्दामहून तुम्ही मोर्चा आयोजित करत असाल तर मग २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करून ठेवेन. मग अब्रुचे खोबरे निघेल आणि तुम्हास कायमचाच राजकीय सन्यास घ्यावा लागेल. म्हणून आरक्षण लढ्यासाठी २१ जुलै रोजी बारामतीला उपस्थित रहा ते फक्त सर्वसामान्य समाजबांधव म्हणूनच...
माझा भोळाभाबडा धनगर समाज पेटून उठला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही मग तिथे प्रस्तापित असोत अथवा प्रस्तापितांचे तळवे चाटणारे समाजातील दलाल असोत. सर्वसामान्य धनगर समाजबांधवांमध्ये फुट पाडायचा प्रयत्न केला तर मग आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागतील हे विसरु नका. आता धनगर समाजातील पोरं शिकली व सवरली आणि लिहायला व बोलायला लागली त्यामुळे समाजात जागृति होते आहे. तुमच्याकडे प्रिंट मिडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल पैसे देवून तुम्ही त्यांना विकत घेऊ शकता पण आमच्याकडे सोशल मिडिया & माऊथ पब्लिसिटी आहे त्यामुळे समाजात जागृति जास्त प्रमाणात होते. याचा अंदाज तुम्हाला २३ मार्चच्या मोर्चावेळी आलाच असेल त्यामुळे समाजाचा इतका पुळका असेल तर व्यवस्थित विचार विनीमय करून निर्णय घ्या आणि समाजहितासाठी संघर्ष करा.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday, 2 July 2015

आता नाही माघार "आर नाहीतर पार"...


कोणावर कीती विश्वास ठेवायचा याला सुद्धा मर्यादा असतात. पण जर कोणी मर्यादाच ओलांडत असेल तर मग आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. मुळातच राजा समाज असणारे आणि या देशावर ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करणार्या महापुरुषांचे आम्ही वारसदार आहोत. बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर लढून आम्ही आमचे हक्क मिळवायला आज रणांगणात उतरणार अन् कारण हक्कासाठी लढाई करणं हे आमच्या रक्तातच आहे.
आजपर्यंत कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आमच्यावरती अन्याय केला. त्या त्या वेळी आम्ही आंदोलन मोर्चा काढून रास्तारोखो करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आम्हाला आमचे हक्क दिले नाहीत कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी झाली तर या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राखीव/खुले होतील आणि पवार पाटील देशमुख ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्र राज्यात राजकारण करता येणार नाही. हा विचार डोक्यात ठेवून त्या आघाडी सरकारने आम्हास आमच्या हक्कापासून वंचित ठेवले होते.
गेल्या वर्षी म्हणजेच १५ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली होती आणि २१ जुलै २०१४ रोजी पंढरपूरहून निघालेल्या दिंडीत ४-५ लाख समाजबांधव सामील होऊन बारामती मध्ये दाखल झाले होते. तेथेच चार-पाच लाख धनगर समाजबांधवांनी ठिय्या मांडला होता आणि तेव्हा धनगर समाजातील १६ वाघ आमरण उपोषणासाठी बसले होते ९ दिवस उपाशी-तापाशी राहून समाजाला न्याय मिळावा म्हणून झगडत होते. सदरच्या भाजप सरकारने सत्तेत आल्यास १० दिवसात आरक्षणाची आमलबजावणी करतो असे आश्वासन दिले आणि उपोषण माघारी घ्यायला लावले. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर येथिल मेळाव्यात मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसात निर्णय घेतो असेही सांगितले होते. त्यानंतर सरकारकडे वेळोवेळी आरक्षणाच्या आमलबजावणीची मागणी केली तर त्या त्या वेळी आम्ही धनगर समाजावर आणि या विषयावर अभ्यास करतोय अशीच उत्तरं मिळाली. मग आम्ही हीच उत्तरं ऐकण्यासाठी भाजपला पाठींबा दिला आहे का???
येथे मला छोटसं उदाहरण द्यावसं वाटतंय, "जर लहान बाळ रडायला लागलं तरच आई त्याला दुध पाजते पण जर बाळ रडतच नसेल तर आई दुसरं काही तरी काम हाती घेते, जोपर्यंत बाळ शांत आहे तोपर्यंतच." धनगर समाजाच्या बाबतीत असंच झालंय धनगर समाज शांत बसलाय म्हणून त्यांच्याकडे लक्ष्य दिले जात नाही. मग तमाम धनगर बांधवांना माझा एकच प्रश्न आहे की, अजून कुठपर्यंत आणि कधीपर्यंत शांत बसायचं??
पण आता आम्ही शांत बसणार नाही आणि माघारही घेणार नाही आर नाहीतर पार हीच आमची भुमिका असेल. एकेकाळी राजा समाज असणारी राजेशाही थाटात वावरणारी आपली जमात आज आपल्याच हक्काची भीख मागू लागली आहे याचा जराही विचार तुमच्या-आमच्या मनात का येत नाही?? राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे कलम ३४२ वरती क्र ३६ वर धनगर [राज्यघटनेत धनगड असा उल्लेख] समाजाला स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट केले आहे. पण धनगर चा धनगड झाल्याने गेली ६५ वर्ष आमच्यावर अन्याय होत आला आहे. खरंतर धनगड नावाची जात आणि कोणी धनगड जातीचा व्यक्ति या महाराष्ट्र राज्यात कोठेही नाही.
मग राज्यघटनेमधील "धनगड" या जातीचं आरक्षण नक्की गेलं कुठे?? जर धनगड ही जात आहेच नाही तर मग बाबासाहेबांनी त्या जातीचा उल्लेख केला तरी कसा?? बुद्धिमान आणि थोर विचारवंत असणारे बाबासाहेब चूक करतीलच कसे?? १९५० पासून आजपर्यंत "धनगड" या जातीचे विवीध क्षेत्रातील आरक्षण आणि दरवर्षीचा समाजिक विकास नीधी यांचा वापर नक्की करतंय कोण?? कधी कधी हा निधी वापरला न गेल्याने तो सरकार दरबारी तसाच परत गेला. मग सरकारने त्यावेळीच योग्य निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायला हवा होता पण स्वार्थी भावनेपोटी आणि स्वतःच्या खुर्चीसाठी धनगर समाजाला न्याय न देता सतत आमच्यावर अन्यायच केला गेला.
म्हणून आता गप्प बसून चालणार नाही वेळ आली तर आमच्या हक्काचं हिसकावून घ्यायला आम्ही मागे राहणार नाही. हवं तर रस्त्यावर उतरून आम्ही हिसकावून घेवू त्यासाठीच दि ९ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ आमदारांना व विधानपरिषदेच्या ७८ आमदारांना जे निवेदन द्यायचे आहे त्याचा मसूदा तयार करण्यात आला असून त्यादिवसी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समाजबांधवांनी त्या त्या आमदारांना निवेदन द्यावे.
त्याचप्रमाणे दि १३ जुलै पासून पावसाळी अधिवेशन चालू होणार असून त्यामध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळण्याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा यासाठी दि १५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या त्या भागातील सर्व धनगर समाजबांधवांनी प्रत्येक कार्यालयात जावून १५ जुलैला एकाच दिवसी एकच निवेदन द्यायचे आहे असे ठरले आहे.
प्रत्येक मतदारसंघातील तसेच त्या त्या तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधवांनी वैयक्तिक जबाबदारी घेवून सरकारला आवाहन करावे. त्याच दिवसी म्हणजे १५ जुलै २०१५ रोजी धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ शशिकांत तरंगे साहेब नागपुर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. जर धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर ९ अॉगस्ट २०१५ रोजी क्रांतीदीनाचे औचित्य साधून राज्यातील तमाम धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरवून क्रांतीची मशाल पेटवणार आहेत. सरकार जर शहाणं असेल तर सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अन्यथा ९ अॉगस्ट २०१५ रोजी होणार्या जिवीत व वित्त हाणीस सरकार जबाबदार राहील. यासाठी दि ९ जुलै रोजी सर्व विधानसभा/विधानपरिषदेच्या आमदारांना तसेच दि १५ जुलै रोजी सर्व तहसीलदार/प्रांताधिकारी/जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत.  त्या त्या भागातील समाजबांधवांनी जबाबदारी घेवून प्रा.दत्ताजीराव डांगे सर (+919975924621), मा निवांत कोळेकर सर (+91 75887 97729), मा एम जी बोरकर सर (+919922581976) मा.हरिष कडू सर (+919921400567) अथवा माझे व्हाटसप अकौंट नितीनराजे अनुसे (+917666994123) वरती कळवावे ही नम्र विनंती.
निवेदनासाठी तयार करण्यात आलेला मसुदा वरती उल्लेख केलेल्या सर्व मान्यवरांकडे आहे तसेच सर्व व्हाटसप ग्रुप वरती पाठवण्यात आला आहे याची नोंद घ्यावी आणि हा ST आरक्षण आमलबजावणी बाबतचा लढा तीव्र करावा ही नम्रतेची विनंती.

जय मल्हार!!! जय अहिल्या!!!

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Saturday, 27 June 2015

पुन्हा एकदा "मिशन आरक्षण" १५ जुलै २०१५.....



एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday, 12 June 2015

आम्ही नेमकं चुकतोय कुठे??

आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................