Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Thursday, 28 July 2016

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

मी समाजकार्य का करतोय? भाग-१

बांधवांनो गेल्या चार-पाच वर्षापासून सोशल मिडीयाच्या माद्यमातून तसेच सामाजिक कार्यक्रमातून, उपक्रमातून समाजप्रबोधन करून समाजबांधवांची डोकी नांगरून त्यामद्ये प्रबोधनाचे बियाणे पेरायचे काम आजपर्यंत  प्रामाणिकपणे करत आलोय. ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागं केलं त्या स्व.बी.के.कोकरे साहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजाला जागृत करण्याचे काम चोखपणे बजावतोय. आज स्व.बी.के.कोकरे साहेबांचे नाव घेऊन समाजकारण आणि राजकारण करणारे भरपूर आहेत पण स्व.बी.के.कोकरे साहेबांचा इतिहास समाजासमोर मांडण्यासाठी मी स्वता व मा.रामभाऊ लांडे साहेब यांनी वारंवार लेख लिहून त्याचप्रमाणे भाषणातून व्याख्यानातून स्व.बी.के.कोकरे साहेब यांची ओळख अख्ख्या महाराष्ट्राला करून दिली विशेषता युवा वर्ग त्यांच्या इतिहासापासून वंचित होता म्हणून मी त्यांचे जीवनचरित्र लिहतोय आणि मा.रामभाऊ लांडे साहेब हे सुद्धा लवकरच क्रांतीवीर स्व.बी.के.कोकरे यांच्या जीवनावरील पुस्तक प्रकाशित करत आहेत. यांव्यतिरिक्त आजकाल झोपेतून उठून स्व.बी.के.कोकरे साहेबांच्या नावाने स्वार्थासाठी संघटना चालवणाऱ्यांना त्या रणझुंजार नेत्याचे, वाघासारखी डरकाळी फोडून प्रस्थापितांना घाम फोडणाऱ्या रणमर्दाचे आजचे आधारहीन आई-वडील दिसत नाहीत ही खरंतर शोकांतिकाच म्हणावी लागेल. बांधवांनो मी काही फार मोठा विचारवंत नाही, फार मोठा वक्ता अथवा व्याख्याता नाही पण सर्वसामान्य मेंढपाळ कुटूंबातील पोरगा(आजही वडील मेंढ्या राखतात गरज म्हणून नव्हे तर पारंपरिक व्यवसाय म्हणून) आजपर्यंत इजिप्त, स्पेन, फ्रांस, इस्राइल, जिबूती अशा आशिया व्यतिरिक्त आफ्रिका व युरोप खंडांतील विविध देशांचे मी दौरे केले, माझ्याकडे आज घरदार नोकरी सर्व काही व्यवस्थित असताना देखील इतरांसारखे स्वतापुरते न जगता दिशाहीन समाजाला दिशा देण्यासाठी, समाजाला न्याय मिळावा म्हणून वेळात वेळ काढून समाजकार्य करतो, समाज जागृती करतो हा काही मी माझा मोठेपणा सांगत नाही. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यापासून समाजप्रबोधन करत, समाजाचा इतिहास समाजासमोर मांडत असताना समाजाच्या विरोधात काम करणाऱ्यांचा समाचार मी लेखणीच्या माध्यमातून सडेतोडपणे घेतला होता. खरंतर त्यांनी माझा बांध रेटला होता म्हणून मी त्यांच्याविरोधात लिहीत नव्हतो तर त्यांची समाजाबद्दलची भावना बदलावी व समाजाचे प्रश्न सोडवावेत या अपेक्षेने लिहीत होतो. त्याचप्रमाणे समाजाचा वापर करून घेणाऱ्यांचा (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडल्याने काहीजणांच्या पायाखालची वाळू सरकली जाते मग काय करावे हे त्या गड्यांना सुचत नव्हते पार भांबावून गेल्यानंतर मग कुठल्यातरी हिजड्या प्रवृत्तीच्या कार्ट्यांना ज्यांना साधी चड्डीची नाडी बांधता येत नाही अशा शेंबड्या पोरांना पुढे करून माझी बदनामी करणे माझ्यावर टीका करणे आणि तरीही नाहीच जमलं तर माझ्या चारित्र्यावर शिंताड्या उडवणे असले खालच्या पातळीवरचे धंदे त्यांनी केले त्याबद्दल त्यांच्यावर टीका म्हणून नव्हे तर (मला समाजकार्यापासून परावृत्त करण्यासाठी) त्यांच्या चाललेल्या त्या खटाटोपीला हे माझे प्रत्यूत्तर आहे.
1.  स्वार्थासाठी आणि मोठेपणासाठी हे सर्व उद्योग करणाऱ्या औलादी अशी माझ्यावर टीका केली जाते.
बांधवांनो जेव्हापासून धनगर आरक्षणाचा मुद्दा तापू लागला तेव्हापासून ठराविक जणांच्या प्रतिक्रिया ऐकल्या/वाचल्या. राज्यघटनेत जे आरक्षण दिले आहे ते आमच्या हक्काचे आहे आणि हे हक्काचे हिसकावून घ्यायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येऊन चर्चा करा विचारविनीमय करा अशी विनंती, आवाहन करत होतो. आरक्षणाबद्दलचे महत्व पटवून देत माझ्या अभ्यासातील पुरावे देत होतो. वेगवेगळे मोर्चे काढत बसण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन एकच विराट मोर्चा काढा असेही सांगत होतो. यांत नेमका स्वार्थ कोणता?? आणि जर मला स्वार्थासाठी करायचं असतं, मोठेपणासाठी करायचं असतं तर इतरांनी जसं मोर्चाचं नेतृत्व करून आमदारक्या/खासदारक्या मिळवल्या, तसे मी पण काहीतरी मिळतंय का ते बघू शकलो असतो आणि काहीतरी पदरात पाडून घेतले असते. तसे महाराष्ट्र राज्यभर सर्व जिल्ह्यात/तालुक्यात माझा भरपूर संपर्क आहे. पण नाही तसे मला काही करायचे नाही कारण मला समाजाला जागृत करायचं होतं आणि समुद्रात भरकटलेल्या नौकेप्रमाणे दिशाहीन समाजाला खारीचा वाटा म्हणून का होईना पण योग्य दिशा देण्यासाठी चाललेली धडपड हाच एकमेव माझा "स्वार्थ" आहे यांत कोणताही मोठेपणा नाही. कोणी म्हंटलं सामाजिक संघटनेत पद हवे होते पण दिले नाही म्हणून (निस्वार्थीपणाचा) बुरखा फाडला त्यांना समजावून सांगा मला पदाची आवश्यकता नव्हती आणि मी कोणतेही पद घेऊ शकत नव्हतो उलट जिथे होतो तिथे पदे वाटायचं काम मी स्वता करत होतो त्या संघटनेतील कीतीतरी पदे माझ्या सांगण्यावरुन दिलेली आहेत आणि आजही समाजासाठी झटणाऱ्या झगडणाऱ्या संघटनेची पदं वाटायची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझे कार्य हे कोणत्याही एका संघटनेसाठी नसून सर्व समाजासाठी आहे, सामाजिक संघटनांसाठी आहे ज्या संघटना खरेखरंच समाजासाठी काम करतात. जर कोणाला पद पाहिजे असेल तर सांगा पण ज्यांना पद द्यायचे आहे ती व्यक्ती निष्कलंकित असावी, निष्क्रिय नसावी, निस्वार्थी असावी तसेच जातीसाठी माती खाणारी असावी समाजावर ज्या ज्या वेळी अन्याय होईल त्या त्या वेळी अन्याय करणाऱ्यांचं हात वरचेवर कलम करण्याची धमक असावी त्याला समाजातून पुढे नेता करायची जबाबदारी माझी राहिल.
पुढील झालेल्या माझ्यावरील टीका आणि प्रत्यूत्तर भाग-२ मद्ये..
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment