Featured post

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब... ✍️ लेखन- नितीनराजे अनुसे

कर्तृत्वातून सिद्ध झालेलं नेतृत्व म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर साहेब ✍️ लेखन - नितीनराजे अनुसे नेता कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या समाज...

Monday, 18 July 2016

शाब्बास रं पट्ट्या शाब्बास ....



नसानसात सळसळतं ते रक्तच असतं धनगराचं,
अन्यायाच्या विरोधात पेटून उठतं ते रक्तच असतं धनगराचं,
कीतीही आली संकटे तरी कधीच मागे हटत नसतं
कारण,
जिंकण्याचं सामर्थ्य ज्यामद्ये असतं ते रक्तच असतं धनगराचं.
            मनगटाच्या आणि बुद्धीच्या जोरावर सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली दुश्मनांच्या चिंद्या उडवणारी आमची औलाद. शत्रुंच्या चारी मुंड्या चित करून त्यांना आस्मान दाखविण्याचा आमचा वारसा आम्ही कधीच विसरत नाही कारण "मल्ल"राक्षसाला हरवणाऱ्या "मल्हार"चे आम्ही भक्त, शत्रुंना धूळ चारून अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे आम्ही वारसदार आमचा धनगरी बाणा आणि कणा जसाच्या तसाच आजही आहे. पाठीमागे पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या "स्व.खाशाबा जाधव दुसऱ्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धे"त धनगराच्या वाघाने, धनगराच्या पट्ट्याने म्हणजेच सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्याच्या पै.वैभव रास्कर याने ९६ किलो वजनी गटातून सुवर्णपदक पटकावले. त्याबद्दल या धनगराच्या वाघाचं हर्दिक हर्दिक अभिनंदन.
पै वैभव रास्कर हा माजी सैनिक पै.कृष्णा रास्कर (सर्वांचे लाडके "रास्कर आप्पा") यांचा मुलगा असून भारतीय नौदलात कार्यरत असताना भारताचं नेतृत्व  करावे असे रास्कर आप्पांना वाटत होते पण त्यांचे स्वप्न अधुरेच राहिले ही खंत त्यांचा मुलगा पै.वैभव रास्कर याने पुर्ण करावी आणि भारताचा तिरंगा जगात फडकवावा ही त्यांची इच्छा आहे. ही त्यांची इच्छा पुर्ण होवो ही मल्हारचरणी प्रार्थना
पै. वैभव रास्कर चे चुलते पै.धनाजी रास्कर हे सुद्धा भारतीय नौदलात पैलवानच आहेत खरंतर धनगर समाजालाच पैलवानकीचा वारसा लाभलेला आहे. सांगली जिल्ह्यातील बोरगावचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांना ओळखले जाते ते बापू बिरू वाटेगावकर (आप्पा) हे सुद्धा पैलवानच आहेत आज कुठेही कुस्तीचा फड असला तरी आप्पा अवर्जून उपस्थित राहून पैलवानांना कुस्तीपटूंना प्रोत्साहन देतात चांगल्या पैलवानास विजेत्यास स्वता बक्षिसही देतात. धनगर समाजातला पै.वैभव रास्कर सुद्धा असाच पोरगा आज महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आपल्या आई-वडिलांचे समाजाचे नाव रोषण करत भारताचं नेतृत्व करण्यासाठी पुढे येतोय त्याबद्दल सुवर्णपदक विजेता पै.वैभव रास्कर याने घवघवीत यश मिळवल्याबद्दल त्याचे पुनःश्च एकदा त्रिवार अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हर्दिक हर्दिक शुभेच्छा!!!
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
             नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
          +९१७६६६९९४१२३
nitinrajeanuse.blogspot.com

No comments:

Post a Comment