सहज मनाशीच विचार करत बसलो असताना नसानसात सळसळ करणाऱ्या माझ्या सळसळत्या रक्तानंच एकेदिवशी मला प्रश्न विचारला की "धनगर समाज एवढा षंढ कसा काय झालाय??" डोक्याला शाॅकच बसला राव, अचानक या विचारलेल्या प्रश्नामुळे आसपासचे वातावरणही गंभीर झाल्याचे जाणवले, सगळीकडे निरव शांतता पसरलेली होती, डोक्यात विचाराची चक्रं सुरू झाली, रक्तवाहिण्या पहिल्यापेक्षाही जलद गतीने रक्ताचा पुरवठा करण्यासाठी धावू लागल्या, या एकाच प्रश्नामुळे लाखो विचारांचा अक्षरशा आगडोंब उसळला, एकामागून एक अशा विचारांनी थैमान घातले मग पाठीमागे इतिहासांत डोकावून पाहिलं तेव्हा "एवढं आम्ही षंढ कसे काय झालोय?" याची मला स्वतःलाच लाज वाटायला लागली.
अरे एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी आज नक्की कोणतं गुलामगीरीतलं जगणं जगतोय तेच आम्हाला कळत नाही आणि कळलं तर वळत नाही ही सर्वात मोठी शोकांतिका. धनगर पुत्र आद्यसम्राट चंद्रगुप्त मौर्य चे आम्ही वारसदार, आशिया खंडावर प्रभुत्व गाजवणाऱ्या राजा सम्राट अशोकाच्या तलवारीची आम्ही तळपती धार, अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांचे मावळे, महान आणि उत्तम प्रशासक म्हणून अख्ख्या जगाने जिचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला त्या रणरागीणी राष्ट्रमाता अहिल्यामाईंचे आम्ही भक्त, अजिंक्य मानल्या जाणाऱ्या शिस्तबद्ध ब्रिटिश फौजांना सलग अठरा वेळा कापून काढून त्यांची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगणाऱ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या सळसळत्या रक्ताचे आम्ही वारसदार आज स्वताला या सर्व महापुरूषांचे मर्दमावळे म्हणवून घेण्यातच धन्यता मानतो. पण वास्तवात मात्र प्रस्तापितांची चाकरी/चमचेगीरी/दलाली करण्यातच आमच्या समाजाचे आणि नेत्यांचे आयुष्य संपून जाते मग आउटपुट येते ते फक्त शून्य आणि शून्यच.... आज भारतातीलच काही नालायक इतिहासकार छाती फूगवून सांगतात की ब्रिटिशांनी १५० वर्ष भारतावर राज्य करून भारतीयांना गुलाम बनवलं पण त्यांना जावून सांगा अरे या जगाच्या पाठीवर हजारो वर्षापेक्षाही जास्त काळ राज्यकारभार केला आहे तो फक्त माझ्या धनगर समाजाने मग आम्ही कोणाकोणाला गुलामगीरीत वागवलं याचा इतिहास काढून बघा तुम्हाला तो सुवर्णाक्षरात कोरून ठेवलेला इतिहास वाचायला तुमचं आयुष्य पुरणार नाही.
ज्या माणसाने स्वताच्या आयुष्याची राखरांगोळी करून अखंड महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला जागे करून माझ्या सारख्या युवकांच्या हातात क्रांतीची मशाल दिली त्या स्व बी के कोकरे साहेबांची विचारधारा आज धनगर समाजाला प्रगतीपथावर घेवून जावू शकते पण त्या स्व बी के कोकरे साहेबांना खरंतर प्रस्तापितांनी संपवले पण ती बंदूक धनगर समाजातील नेत्यांच्याच खांद्यावर ठेवून मस्तावलेल्या आणि माजग्या प्रस्तापितांनी स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या केली. याचा अर्थ आमच्याच माणसांना आम्हीच संपवले, संपवण्यासाठी मदत केली कीती लाजिरवाणी गोष्ट म्हणावी ही. पाठीमागे एक पोस्ट सोशल मिडीयाच्या माद्यमातून व्हायरल होत असताना पाहिले त्यामद्ये कुत्र्याच्या आणि गाढवाच्या शर्यतीचे वर्णन केले आहे. गाढवापेक्षा कुत्रा हा धावण्यामद्ये चपळ असतो तेज असतो पण दुर्दैव त्याचे असे की प्रत्येक गल्लीगल्लीत, चौकाचौकात रस्त्यारस्त्यावर त्यांच्याच जातबांधवांनी भूंकून त्याला हुसकावून लावले विरोध केला कारण की "हर कुत्ता अपने इलाखें का शेर होता है।" तसेच झाले पण गाढवाला मात्र कोणीच विरोध केला नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे धावण्यामद्ये चपळ असलेल्या कुत्र्याच्या अगोदर गाढव त्या सिंहासनावर जाऊन बसतो. त्यावेळी कुत्रा स्वतालाच म्हणतो की माझ्याच जातबांधवांनी मला विरोध केला नसता तर आज त्या उकिरंड्यात लोळणाऱ्या गाढवाऐवजी मी सिंहासनावर बसलो असतो.
माझ्याही धनगर समाजाचे अगदी त्या कुत्र्याच्या आणि गाढवांच्या गोष्टीप्रमाणेच झाले आहे. एकेकाळी राजा समाजात जन्माला आलेल्या आम्ही औलादी, दैदिप्यमान आणि जाज्वल्य इतिहासाचे वारसदार आणि शुरवीरांच्या आणि थोर महापुरूषांचा वारसा लाभलेल्या माझ्या धनगर समाजातील आपलीच माणसं आपल्याच माणसाच्या पायात पाय अडकवताहेत आणि पुढे जाणाऱ्याला पाडताहेत म्हणूनच आपण सिंहासनावर बसू शकत नाही. अरे एखादा पुढे जात असेल तर त्याला प्रेरणा द्या, प्रोत्साहन द्या, मदत करा तरच धनगर समाज इतिहास घडवू शकतो. त्यासाठी ज्या दिवशी धनगर समाजातील एकमेकांचे पाय ओढायचे आणि पायात पाय अडकवायची ही खेकडा प्रवृत्ती नाहीशी होईल तेव्हा मात्र धनगर समाज सिंहासनावर बसून भारतावर राज्यकारभार करेल हे त्रिकालबाधित सत्य आहे. आज धनगर समाज विकासपासून कोसो मैल दूर असून दुसऱ्यांची गुलामगीरी करण्यात अन एकमेकांना शिव्या घालण्यात आमची उर्जा खर्च करत बसतो. खरंतर सळसळत्या रक्ताला मात्र इतिहासाची जाण आहे पण सनातनी विचारांचा पगडा पडल्यामुळे आम्ही आमच्या इतिहासाकडे दुर्लक्ष करतो आणि आमच्या इतिहासापासून आम्हाला दूर ठेवणे यापाठीमागे ब्राह्मणांचे खूप मोठे षड्यंत्र काम करत आहे याची जाणीव सर्वांना असायला हवी. अवर्जून सांगावेसे वाटते की झाडूमधील काड्या ज्यावेळी एकत्रित असतात त्यावेळी कचरा साफ करतात पण त्या काड्या ज्यावेळी बाजूला पडून विस्कटल्या जातात तेव्हा मात्र कचरा बनून जातात म्हणून वेगळे होऊन कचरा बनू नका तर एकत्रित येऊन समाजाचा विकास करा. म्हणूनच म्हणतो उठ धनगरा उगार मूठ, तूच थांबव आता तुझी लूट. महाराजा यशवंतराव होळकरांचे तुम्ही आम्ही वारसदार मग एवढा अन्याय होत असताना "षंढ होऊन थंड राहण्यापेक्षा अन्यायाच्या विरोधात बंड करून गुंड झालेले अधिक बरे."
(सुचना:- कृपया वरील कुत्र्याच्या आणि गाढवांच्या शर्यतींमधील जी प्रवृत्ती सांगितलेली आहे ती आपल्या धनगर समाजातील असलेली घाणेरडी प्रवृत्ती दर्शविली आहे. ती प्रवृत्ती कोणा एखाद्या व्यक्तिसाठी प्रत्यक्षरित्या अथवा अप्रत्यक्षरित्या उद्देशून नाही लिहली. चूकून कोणीही ती स्वतावरती ओढवून घेऊ नये. कारण गैरसमज करून घेण्याचे प्रमाण आजकाल जास्तच वाढले आहे पण धनगर समाजाच्या विकासासाठी ही खेकडा प्रवृत्ती समाजातून मुळासह उखडून टाकायला हवी त्यासाठी तुम्ही-आम्ही सर्वांनी एकत्रित यायला हवे. त्यानिमीत्ताने केलेला हा लेखप्रपंच..)
जय मल्हार! जय अहिल्या!! जय यशवंत!!!
✍️नितीनराजे अनुसे✍️
अनुसेवाडी ता.आटपाडी जि.सांगली
+९१७६६६९९४१२३
https://nitinrajeanuse123.blogspot.in

No comments:
Post a Comment