जय मल्हार.....
आज तुझी जयंती माउली ,
दाही दिशा साजरी होणार ;
बेंबीच्या देठापासून ,
" जय अहिल्या" नारे देणार !
चौका-चौकात अभिवादनाचे ,
मोठं मोठाले बॅनर लागतील ;
वर्षभर "झोपलेले " ,
आज " जातीसाठी ?" जागतील !
समाज "माझा"च ,
अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
मीच "मालक" यांचा ,
काही "मंडळी" अशी वागतेय आता !
जयंतीच "व्यासपीठ "माउली आता,
"अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
समाज तुझा काही "व्यापारियांचे"
ठरलेले "दुकान " झालंय !
या दुकानातूनच आम्हांला,
कोणालाही विकलं जातंय ;
वापरून झालं कि ,
पुन्हा कुठेही टाकलं जातंय !
राज्यकर्ती जमात माउली ,
आज लाचारीच जिणं जगतेय ;
देण्याची दानत ठेवणारी ,
आज लाचार होऊन मागतेय !
साधा भोळा समाज भरडला जातोय
काही नसतानाहि गुन्हा ;
प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
मोडून ठेवलाय कणा ;
शासनाचा चालू आहे इथे ,
हुकूमशाही बाणा ;
हे माऊली ... प्रशासन कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
जन्म घे पुन्हा....जन्म घे पुन्हा !
देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कवी. राजु दादासाहेब झंजे
९५९४८१५५८५
आज तुझी जयंती माउली ,
दाही दिशा साजरी होणार ;
बेंबीच्या देठापासून ,
" जय अहिल्या" नारे देणार !
चौका-चौकात अभिवादनाचे ,
मोठं मोठाले बॅनर लागतील ;
वर्षभर "झोपलेले " ,
आज " जातीसाठी ?" जागतील !
समाज "माझा"च ,
अशी स्पर्धा देखील लागतेय आता ;
मीच "मालक" यांचा ,
काही "मंडळी" अशी वागतेय आता !
जयंतीच "व्यासपीठ "माउली आता,
"अस्तित्व" दाखवण्याचं ठिकाण झालंय;
समाज तुझा काही "व्यापारियांचे"
ठरलेले "दुकान " झालंय !
या दुकानातूनच आम्हांला,
कोणालाही विकलं जातंय ;
वापरून झालं कि ,
पुन्हा कुठेही टाकलं जातंय !
राज्यकर्ती जमात माउली ,
आज लाचारीच जिणं जगतेय ;
देण्याची दानत ठेवणारी ,
आज लाचार होऊन मागतेय !
साधा भोळा समाज भरडला जातोय
काही नसतानाहि गुन्हा ;
प्रस्थापितांनीहि आरक्षणाचा ,
मोडून ठेवलाय कणा ;
शासनाचा चालू आहे इथे ,
हुकूमशाही बाणा ;
हे माऊली ... प्रशासन कसे असावे हे दाखवण्यासाठी तरी ,
जन्म घे पुन्हा....जन्म घे पुन्हा !
देवी अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
कवी. राजु दादासाहेब झंजे
९५९४८१५५८५
No comments:
Post a Comment