Featured post

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे

आपले आदर्श हे क्रांतीसुर्य स्व. बी.के. कोकरे साहेब असावेत ✍️नितीनराजे अनुसे खरंतर ‘क्रांती’ या शब्दाचा प्रचलित असलेला अर्थ मौलिक...

Sunday, 19 July 2015

अखिर हद कर दी आपने...

अखिर हद कर दी आपने...
धनगर समाजाच्या एकीमध्ये बेकी आणायचे काम धनगर समाजातीलच काही हुजरे नेते करताहेत. खरंतर गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजाचं वाटोळं कोणी केलं असेल तर धनगर समाजातील काही नालायक नेत्यांची नावं पुढे येताहेत मला त्यांची नावे घ्यायची नाहीत. आजपर्यंत आम्ही विनाकारण प्रस्थापितांना दोष देत होतो आणि आजही देत आहे पण माझ्याच समाजाचं नेतृत्व नालायक, निर्लज्ज आणि निष्क्रिय असेल तर प्रस्थापितांना दोष देण्यात काय अर्थ?
स्वतःची बुद्धि आणि स्वतःचे विचार यांनी कधीच समाजाच्या हक्कासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वापरले नाहीत थोडक्यात सांगायचं म्हणलं तर धनगर समाजाचे सर्वच नव्हे  एक दोन नेते सोडले तर बाकीचे नेते इथपर्यंतचा विचार करण्याच्या लायकीचे वा पात्रतेचे नाहीत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.  स्वतःचा स्वाभिमान प्रस्तापितांच्या बुटाखाली गहाण टाकणार्या या औलादी धनगर समाजात जन्मालाच कशा येतात?? मग त्या औलादी खरंच धनगर समाजाच्या आहेत की आणखीन कोणाच्या?? असा प्रश्न उपस्थित राहतो.
आजपर्यंत रानोमाळी आणि डोंगरदरी-खोर्यातून पायांच्या नडग्या वाळवत शेळ्या-मेंढ्यांची राखण करणार्या माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाला राजकारण काय असतं हेच माहित नव्हतं. धनगर समाजातील नेते कुठल्यातरी प्रस्तापितांची चमचेगीरी आणि हुजरेगीरी करताहेत याचं भानही नव्हतं. माझ्या भोळ्या-भाबड्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेत या मस्तावलेल्या नेत्यांनी समाजाचं बाजारीकरण करून स्वताची घरं भरली, सात पिढ्या ऐशोआरामात बसून खातील एवढी संपत्ति त्यांनी गोळा केली. पण माझ्या गोरगरीब आणि भोळ्याभाबड्या धनगर समाजाच्या वाट्याला आली ती फक्त पाचवीला पुजलेली भटकंती आणि डोईवरती अन्यायची टांगती तलवार.
गेल्या ६५ वर्षापासून धनगर समाजावरती अन्याय होत आला आहे धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती लवकरात लवकर लागू व्हाव्यात यासाठी समाजबांधव संघर्ष करताहेत, पण राजकीय नेत्यांना त्याचं काही भानच नाही. दि ९ जुलै ते १२ जुलै पर्यंत राज्यातील सर्व आमदारांना आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासंदर्भात निवेदने दिली होती. तद्नंतर दि १५ जुलै रोजी राज्यातील सर्व तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदने दिली आणि हा उपक्रम सर्व समाजबांधवांनी यशस्वीरीत्या राबविला आणि पार पाडला होता. या उपक्रमातून कोणाला नेतेगीरी अथवा पुढारपण करायचं नव्हतं, कोणीही स्वार्थासाठी झटत आणि झगडत नव्हतं तर समाजावरती होत असलेल्या अन्यायाचं भान ठेवून निस्वार्थीपणे लढा उभा करत व प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी लक्षात ठेवून एकमेकांच्या हातात हात देवून आमदारांना, मंत्र्यांना व प्रशासनालादेखिल हातघाईला आणले आहे. या लढ्यानंतर जरी सरकारने आरक्षणासंदर्भात तोडगा काढला नाही तर दि २१ जुलै रोजी बारामती येथे धनगर आरक्षण कृति समितीच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. लाखोच्या संख्येने धनगर समाज बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहे.
समाजातील तमाम बुद्धिजीवी वर्ग आणि तळागळातील सर्व समाजबांधव बारामतीला एकत्रित झाला तर प्रस्तापितांच्या ह्रदयात धडकी भरेल त्यांना कापरं भरतील म्हणून प्रस्तापितांच्या सांगण्यावरूनच म्हणा अथवा धनगर समाजात फाटाफूट करायची आणि धनगर समाजाला कधी एकत्रित येवू द्यायचं नाही म्हणून काही बाजारबुनग्यांनी त्याचदिवसी म्हणजे २१ जुलै रोजीच मुंबई येथील आझाद मैदानात मोर्चा आयोजित करुन विधानभवनावर आंदोलन करण्याच्या वल्गना करुन धनगर समाजाला संपवायचं षडयंत्रच रचलेलं आहे.
काहीही झालं तरी २१ जुलै रोजी धनगर समाज फक्त बारामतीमध्येच लाखोच्या संख्येने उपस्थित राहणार आणि आम्हीसुद्धा जातीनं तिथं पोहचणार. २१ जुलै रोजी मुंबई मध्ये मोर्चा आयोजित करण्यापाठीमागं काहीतरी गौडबंगाल नक्कीच आहे ते नाकारता येत नाही. २१ जुलै व्यतिरिक्त कोणत्याही दिवसी मुंबई मध्ये मोर्चा असो अथवा रास्तारोखो किंवा चक्काजाम आम्ही तुमच्या खांद्याला खांदा देवून लढू पण २१ जुलै रोजी फक्त आणि फक्त बारामतीमध्येच प्रेरणा दिवस या निमीत्ताने लाखोच्या संख्येने उपस्थित राहू.
धनगर समाजाच्या संबंधित नेत्यांना माझी विनंती आहे की बाबांनो तुम्ही आजपर्यंत आमच्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाला फसवत आला आहात. माझ्या धनगर समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाला प्रस्थापित लांडग्यांच्या दावणीला बांधायचं पाप तुम्ही केले आहे आणि आजही करताय. तुम्हाला जर विधानभवनावर मोर्चा काढायचा असेल तर बिनदास्तपणे काढा पण २१ जुलै सोडून कधीही काढा आम्ही त्यावेळी तुमच्या सोबत राहू. पण जर २१ जुलै रोजी  मुद्दामहून तुम्ही मोर्चा आयोजित करत असाल तर मग २३ मार्चच्या मोर्चासारखी अवस्था करून ठेवेन. मग अब्रुचे खोबरे निघेल आणि तुम्हास कायमचाच राजकीय सन्यास घ्यावा लागेल. म्हणून आरक्षण लढ्यासाठी २१ जुलै रोजी बारामतीला उपस्थित रहा ते फक्त सर्वसामान्य समाजबांधव म्हणूनच...
माझा भोळाभाबडा धनगर समाज पेटून उठला तर एकेकाला पेटवल्याशिवाय शांत बसणार नाही मग तिथे प्रस्तापित असोत अथवा प्रस्तापितांचे तळवे चाटणारे समाजातील दलाल असोत. सर्वसामान्य धनगर समाजबांधवांमध्ये फुट पाडायचा प्रयत्न केला तर मग आम्हाला तलवारी हातात घ्याव्या लागतील हे विसरु नका. आता धनगर समाजातील पोरं शिकली व सवरली आणि लिहायला व बोलायला लागली त्यामुळे समाजात जागृति होते आहे. तुमच्याकडे प्रिंट मिडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मिडिया असेल पैसे देवून तुम्ही त्यांना विकत घेऊ शकता पण आमच्याकडे सोशल मिडिया & माऊथ पब्लिसिटी आहे त्यामुळे समाजात जागृति जास्त प्रमाणात होते. याचा अंदाज तुम्हाला २३ मार्चच्या मोर्चावेळी आलाच असेल त्यामुळे समाजाचा इतका पुळका असेल तर व्यवस्थित विचार विनीमय करून निर्णय घ्या आणि समाजहितासाठी संघर्ष करा.

जय मल्हार!! जय अहिल्या!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Thursday, 2 July 2015

आता नाही माघार "आर नाहीतर पार"...


कोणावर कीती विश्वास ठेवायचा याला सुद्धा मर्यादा असतात. पण जर कोणी मर्यादाच ओलांडत असेल तर मग आमच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही. मुळातच राजा समाज असणारे आणि या देशावर ३५० वर्षापेक्षा अधिक राज्यकारभार करणार्या महापुरुषांचे आम्ही वारसदार आहोत. बुद्धीच्या आणि मनगटाच्या जोरावर लढून आम्ही आमचे हक्क मिळवायला आज रणांगणात उतरणार अन् कारण हक्कासाठी लढाई करणं हे आमच्या रक्तातच आहे.
आजपर्यंत कोंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने आमच्यावरती अन्याय केला. त्या त्या वेळी आम्ही आंदोलन मोर्चा काढून रास्तारोखो करून सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांनी आम्हाला आमचे हक्क दिले नाहीत कारण जर धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी झाली तर या महाराष्ट्र राज्यात धनगर समाजासाठी लोकसभा व विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी राखीव/खुले होतील आणि पवार पाटील देशमुख ठाकरे यांना पुन्हा महाराष्ट्र राज्यात राजकारण करता येणार नाही. हा विचार डोक्यात ठेवून त्या आघाडी सरकारने आम्हास आमच्या हक्कापासून वंचित ठेवले होते.
गेल्या वर्षी म्हणजेच १५ जुलै २०१४ रोजी धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या आरक्षणाची अमलबजावणी व्हावी म्हणून पंढरपूर-बारामती आरक्षण दिंडी निघाली होती आणि २१ जुलै २०१४ रोजी पंढरपूरहून निघालेल्या दिंडीत ४-५ लाख समाजबांधव सामील होऊन बारामती मध्ये दाखल झाले होते. तेथेच चार-पाच लाख धनगर समाजबांधवांनी ठिय्या मांडला होता आणि तेव्हा धनगर समाजातील १६ वाघ आमरण उपोषणासाठी बसले होते ९ दिवस उपाशी-तापाशी राहून समाजाला न्याय मिळावा म्हणून झगडत होते. सदरच्या भाजप सरकारने सत्तेत आल्यास १० दिवसात आरक्षणाची आमलबजावणी करतो असे आश्वासन दिले आणि उपोषण माघारी घ्यायला लावले. त्यानंतर ४ जानेवारी २०१५ रोजी नागपुर येथिल मेळाव्यात मुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसात निर्णय घेतो असेही सांगितले होते. त्यानंतर सरकारकडे वेळोवेळी आरक्षणाच्या आमलबजावणीची मागणी केली तर त्या त्या वेळी आम्ही धनगर समाजावर आणि या विषयावर अभ्यास करतोय अशीच उत्तरं मिळाली. मग आम्ही हीच उत्तरं ऐकण्यासाठी भाजपला पाठींबा दिला आहे का???
येथे मला छोटसं उदाहरण द्यावसं वाटतंय, "जर लहान बाळ रडायला लागलं तरच आई त्याला दुध पाजते पण जर बाळ रडतच नसेल तर आई दुसरं काही तरी काम हाती घेते, जोपर्यंत बाळ शांत आहे तोपर्यंतच." धनगर समाजाच्या बाबतीत असंच झालंय धनगर समाज शांत बसलाय म्हणून त्यांच्याकडे लक्ष्य दिले जात नाही. मग तमाम धनगर बांधवांना माझा एकच प्रश्न आहे की, अजून कुठपर्यंत आणि कधीपर्यंत शांत बसायचं??
पण आता आम्ही शांत बसणार नाही आणि माघारही घेणार नाही आर नाहीतर पार हीच आमची भुमिका असेल. एकेकाळी राजा समाज असणारी राजेशाही थाटात वावरणारी आपली जमात आज आपल्याच हक्काची भीख मागू लागली आहे याचा जराही विचार तुमच्या-आमच्या मनात का येत नाही?? राज्यघटनेत नमूद केल्याप्रमाणे कलम ३४२ वरती क्र ३६ वर धनगर [राज्यघटनेत धनगड असा उल्लेख] समाजाला स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अनुसुचित जमातीमध्ये सामाविष्ट केले आहे. पण धनगर चा धनगड झाल्याने गेली ६५ वर्ष आमच्यावर अन्याय होत आला आहे. खरंतर धनगड नावाची जात आणि कोणी धनगड जातीचा व्यक्ति या महाराष्ट्र राज्यात कोठेही नाही.
मग राज्यघटनेमधील "धनगड" या जातीचं आरक्षण नक्की गेलं कुठे?? जर धनगड ही जात आहेच नाही तर मग बाबासाहेबांनी त्या जातीचा उल्लेख केला तरी कसा?? बुद्धिमान आणि थोर विचारवंत असणारे बाबासाहेब चूक करतीलच कसे?? १९५० पासून आजपर्यंत "धनगड" या जातीचे विवीध क्षेत्रातील आरक्षण आणि दरवर्षीचा समाजिक विकास नीधी यांचा वापर नक्की करतंय कोण?? कधी कधी हा निधी वापरला न गेल्याने तो सरकार दरबारी तसाच परत गेला. मग सरकारने त्यावेळीच योग्य निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायला हवा होता पण स्वार्थी भावनेपोटी आणि स्वतःच्या खुर्चीसाठी धनगर समाजाला न्याय न देता सतत आमच्यावर अन्यायच केला गेला.
म्हणून आता गप्प बसून चालणार नाही वेळ आली तर आमच्या हक्काचं हिसकावून घ्यायला आम्ही मागे राहणार नाही. हवं तर रस्त्यावर उतरून आम्ही हिसकावून घेवू त्यासाठीच दि ९ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या २८८ आमदारांना व विधानपरिषदेच्या ७८ आमदारांना जे निवेदन द्यायचे आहे त्याचा मसूदा तयार करण्यात आला असून त्यादिवसी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील समाजबांधवांनी त्या त्या आमदारांना निवेदन द्यावे.
त्याचप्रमाणे दि १३ जुलै पासून पावसाळी अधिवेशन चालू होणार असून त्यामध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलती मिळण्याबाबतचा योग्य निर्णय घ्यावा यासाठी दि १५ जुलै २०१५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी/प्रांताधिकारी तथा तहसीलदार यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्या त्या भागातील सर्व धनगर समाजबांधवांनी प्रत्येक कार्यालयात जावून १५ जुलैला एकाच दिवसी एकच निवेदन द्यायचे आहे असे ठरले आहे.
प्रत्येक मतदारसंघातील तसेच त्या त्या तालुक्यातील सर्व धनगर समाजबांधवांनी वैयक्तिक जबाबदारी घेवून सरकारला आवाहन करावे. त्याच दिवसी म्हणजे १५ जुलै २०१५ रोजी धनगर आरक्षण कृती समितीचे सदस्य डॉ शशिकांत तरंगे साहेब नागपुर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत. जर धनगर समाजाला न्याय मिळाला नाही तर ९ अॉगस्ट २०१५ रोजी क्रांतीदीनाचे औचित्य साधून राज्यातील तमाम धनगर समाजबांधव रस्त्यावर उतरवून क्रांतीची मशाल पेटवणार आहेत. सरकार जर शहाणं असेल तर सरकारने वेळीच योग्य तो निर्णय घेवून धनगर समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न करावा अन्यथा ९ अॉगस्ट २०१५ रोजी होणार्या जिवीत व वित्त हाणीस सरकार जबाबदार राहील. यासाठी दि ९ जुलै रोजी सर्व विधानसभा/विधानपरिषदेच्या आमदारांना तसेच दि १५ जुलै रोजी सर्व तहसीलदार/प्रांताधिकारी/जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहेत.  त्या त्या भागातील समाजबांधवांनी जबाबदारी घेवून प्रा.दत्ताजीराव डांगे सर (+919975924621), मा निवांत कोळेकर सर (+91 75887 97729), मा एम जी बोरकर सर (+919922581976) मा.हरिष कडू सर (+919921400567) अथवा माझे व्हाटसप अकौंट नितीनराजे अनुसे (+917666994123) वरती कळवावे ही नम्र विनंती.
निवेदनासाठी तयार करण्यात आलेला मसुदा वरती उल्लेख केलेल्या सर्व मान्यवरांकडे आहे तसेच सर्व व्हाटसप ग्रुप वरती पाठवण्यात आला आहे याची नोंद घ्यावी आणि हा ST आरक्षण आमलबजावणी बाबतचा लढा तीव्र करावा ही नम्रतेची विनंती.

जय मल्हार!!! जय अहिल्या!!!

         -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Saturday, 27 June 2015

पुन्हा एकदा "मिशन आरक्षण" १५ जुलै २०१५.....



एकेकाळी या हिदूस्थानावर ३५० वर्षापेक्षा अधिक काळ राज्य करणारी आमची औलाद म्हणजेच राजा समाज असणारी आमची जमात गतकाळी अज्ञानपणामुळे गुलामगीरीत जगतेय. जगजेत्या सिकंदराला भारत जिंकण्यापासून परावर्तित करणार्या भारताचे आद्य सम्राट चंद्रगुप्त मौर्य, अखंड भारत आणि ईशान्येकडील नेपाळ, भूटान आणि अफगानिस्तान आपल्या अधिपत्याखाली आणणर्या राजा सम्राट अशोकाचे आम्ही वारसदार आज आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून लढतोय आणि झगडतोय. धनगरपुत्र राजा सम्राट अशोकाच्या सारनाथ येथील "अशोक स्तंभ" हा आज प्रत्येक भारतीयाच्या खिशात असलेल्या प्रत्येक नाण्यावर अभिमानानं दिसतो कारण हे भारताचं बोधचिन्ह म्हणून गौरवण्यात आलं. तद्नंतर भारतामध्ये तसेच देशोविदेशात जो भारतीय झेंडा डौलाने आणि अभिमानाने फडकतो त्यावरील जे निळसर अशोकचक्र आहे ते सुद्धा धनगरपुत्र राजा सम्राट अशोक यांचा इतिहास आणि त्यांच्या कार्याची आठवण आम्हा भारतीयांना करुन देतं. आणि आज हीच राजा समाज असलेली आमची औलाद आज गुलामगीरीचं जीवन जगतेय याचं दुख मनोमन होतंय. या राजा समाजाला आपले हक्क मागावे लागतात अशी वेळ का आली?? याला नेमकं जबाबदार कोण असेल तर माझ्याच धनगर समाजातील नेते यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. आमचं नेतृत्व जर सक्षम असतं तर आमच्यावर भिक मागायची वेळ आलीच नसती.
गेल्या वर्षी १५ जुलै २०१४ रोजी ता पंढरपूर जि सोलापूर येथून आरक्षण दिंडी पदयात्रा निघाली  अन् २१ जुलै २०१४ रोजी बारामतीला येवून धडकली होती आणि तिथंच अखंड महाराष्ट्रातील ४ लाखांवरती धनगर समाज ठिय्या मांडून आमरण उपोषणासाठी बसला होता. तत्कालीन सरकारने अन्याय तर केलाच होता पण सदरच्या भाजप सरकारने महाराष्ट्रात सरकार आल्यावर १० दिवसात आरक्षणाची अमलबजावणी करू असं आश्वासन दिलं होतं पण आज भाजपचं सरकार आलं १० दिवस दूरची गोष्ट पण १० महिने नव्हे तर ११ महिने उलटून गेलेे पण अजूनही आमच्या वाट्याला तोच अन्याय आणि पोकळ आश्वासनं एवढंच आले आहे. एक म्हण आहे की "आजा मेला अन् नातू झाला घरात माणसं तेवढीच" पाठीमागचं  सरकार त्या लायकीचं होतं आणि आजचं पण त्याच लायकीचं म्हणायची वेळ आली आहे.  "धनगर" आणि "धनगड" या दोन्ही जमाती वेग-वेगळ्या नसून ती एकच "धनगर" जमात आहे असे वैज्ञानिक अहवाल सादर केले. शिवाय धनगड नावाची जमातच या महाराष्ट्रात नाही हे सुद्धा सिद्ध केलं तरीही आमच्यावर अन्याय का??
मुख्यमंत्री महोदय मा देवेंद्र फडणवीस म्हणतात की धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी यावरती अभ्यास चालू आहे. अहो फडणवीस साहेब यावरती पीएचडी केली असती एखाद्यानं अन् तुम्ही अभ्यासच कसे काय करताय अजून? आज दहावी-बारावीचे निकाल झाले त्यांची प्रवेश प्रक्रिया सुद्धा संपत आली मग आमच्या धनगर समाजातील मुला-मुलींना अगोदरच राज्यघटनेत असलेल्या डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या अनुसुचित जमातीच्या सवलती कधी देणार?? आजपर्यंत आमच्यावर अन्याय होत आला आहे आणि अजूनही असंच रहाट गाडगं चालू राहिलं तर आमची पोरं आइ ए एस , आइ पी एस कधी होणार?? जर आम्हाला अनुसुचित जमातीच्या सवलती द्यायला तुम्हाला एवढा अभ्यास करावा लागत असेल तर मग तुम्ही बाबासाहेबांना चुकीचं समजता का?? त्यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातीमध्ये राज्यघटनेच्या कलम ३४२ मध्ये क्र ३६ वर सामाविष्ट केले आहे. फक्त शब्दविवेचन करताना त्याचे टायपिंग करताना र ऐवजी ड झाला आणि या र ड मुळे माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजाचा सगळा राडा च झाला. आज (Chattisgarh)छत्तीसगर ला हिंदीमध्ये छत्तीसगढ़ म्हणतात, (Gurgaon)गुरगाव ला गुढगाव म्हणतात, (Ekar)एकर ला एकर त्याचप्रमाणे (Dhangar)धनगर चा धनगड(Dhangad) झाला आणि आज ६५ वर्षे आमच्यावरती अन्यायच अन्याय झाला मग हा अन्याय आमच्यावरती बाबासाहेबांनीच केला का??
राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करण्याचा अधिकार जर सर्वोच्च न्यायालयाला असेल तर मग न्यायदेवतेनं डोळ्यावरची पट्टी काढून आंधळेपणा बंद करावं, महाराष्ट्र राज्यात एकही धनगड समाजाची व्यक्ति नसताना आमच्या हक्काचं अनुसुचित जमातीचं आरक्षण आम्हास देऊन आम्हाला न्याय द्यावा. त्यासाठी राज्य सरकारने जी शिफारस करावयाची आहे ती शिफारस लवकरात लवकर करावी यासाठी धनगर समाजातील पक्षविरहीत समाजबांधवांनी १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर येथे भव्य आंदोलनाचे आयोजन केले आहे.
धनगर समाजातील लाखो समाजबांधव दि १५ जुलैला आरक्षणाची ज्योत पेटती ठेवण्यासाठी पंढरपूर येथे उपस्थित राहणार आहेत. अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बुद्धिजीवी वर्गाने घेतलेला हा निर्णय आहे आणि सर्व बुद्धिजीवी वर्गाने या आंदोलनाचे आयोजन केले आहे. कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी अथवा राजकीय दृष्टीकोणातून आयोजित केलेले हे आंदोलन नाही. आजपर्यंत निमूटपणे आपण अन्याय सहन करत आलो आहोत हे कुठेतरी थांबायला पाहिजे, आपल्या इतिहासाचा वारसा डोळ्यासमोर ठेवून आपली ओळख काय आहे आणि आपण काय करतोय याचा गांभिर्यानं विचार करुन उद्याच्या पीढीवर अन्याय सहन करायची वेळ येवू देवू नका यासाठी जातीवंत धनगर सभाजबांधवांनी पुनःशा संघटित होऊन आपल्या हक्कासाठी एकत्रित पणे लढाई लढावी. ज्या सरकारला धनगर समाजानं एक गठ्ठा मतदान केलं आणि सत्तेत आणलं ते सरकार आज चांगलंच झोपलंय आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी दि १५ जुलै रोजी अखंड महाराष्ट्र राज्यातील समाज बांधवांनी आवर्जून उपस्थित रहावे ही नम्र विनंती...

ना माझ्यासाठी ना माझ्या स्वार्थासाठी, नाही कोण्या व्यक्तिसाठी...

ही लढाई आहे फक्त आणि फक्त माझ्या धनगर समाजासाठी...

उठ धनगरा हो जागा अन् लढ तुझ्या हक्कासाठी..

उचल तलवार आणि उगार मुठ नाहीतर घे हाती काठी...

कर येळकोट येळकोटचा गजर अन् लाग प्रस्थापितांच्या पाठी...

अन्यायावरती उगार आसूड उद्याच्या भावी पीढीसाठी...

तुम्हावर अन्याय होत असेल तर अखंड समाज असेल तुमच्या पाठी...

हिम्मत हारू नकोस प्रयत्न सोडू नकोस जर
कितीही आणि कोणीही आले तुला आडवण्यासाठी,

फक्त एकदाच "जय मल्हार" बोल अन् लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी. फक्त लढ धनगर समाजाच्या अस्मितेसाठी.

म्हणून आरक्षणाच्या या लढाई साठी दि १५ जुलै २०१५ रोजी पंढरपूर ता पंढरपूर जि सोलापूर येथे सामाजिक बांधीलकी लक्षात घेवून प्रत्येक समाजबांधवांनी सहभागी व्हावं...ही नम्र विनंती

जय मल्हार!! जय अहिल्या!!
             -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
            +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Friday, 12 June 2015

आम्ही नेमकं चुकतोय कुठे??

आज जनावरांची म्हणजेच कुत्र्या-मांजरांची जनगनना होते पण माझ्या धनगर समाजाची जनगनना होत नाही. का होत नाही? कशासाठी होत नाही?? असा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण तितका विचार करण्याइतपच आमची बुद्धि पार भ्रष्ट झाली आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
आज देशामध्ये गाई-म्हैसी, कुत्री-मांजरे एवढंच नव्हे तर जंगली प्राण्याची देखिल जनगनना होते. कुठे आणि कधी मोजायला जातात ते कोणास ठाऊक? म्हणजे भारत सरकारला जनावरांची जनगनना करायला वेळ, पैसा सर्व काही आहे पण माणसांची म्हणजे माझ्या धनगर समाजाची जनगनना करायला त्यांना सवड नाही.
जनगनना न झाल्याचा परिणाम काय? तर
राज्य घटनेत बाबासाहेबांनी कलम ३४२ मध्ये क्र ३६ वरती धनगड(धनगर) समाजाचा अनुसुचित जमातीमध्ये १९५० साली सामावेश केला असून आमच्या अज्ञानपणामुळे आम्हाला ते माहीत नव्हते.  आज धनगर समाजाची जनगनना न झाल्याने धनगर समाजाची खरी लोकसंख्या कीती आहे हे अजूनही अंधारातच आहे. "र" आणि "ड" च्या फरकामुळे धनगर आणि धनगड हे एकच आहेत त्यासाठी अनुसुचित जमातीची अंमलबजावणी व्हावी म्हणून खंबाटकीच्या घाटामध्ये स्व बी के कोकरे साहेबांनी सर्वप्रथम रास्तारोखो केल्यानंतर सांगली मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधीच्या उपस्थिति मध्ये धनगर समाजाला अनुसुचित जमातीची अंमलबजावणी करण्याऐवजी धनगर समाजाला भटक्या जमाती-क मध्ये घातलं. आज धनगर समाज हा राज्य पातळीवरती भटक्या जमाती-क (Nomadic Tribes-C) च्या सवलतींचा लाभ घेतोय तर महाराष्ट्राबाहेर हा धनगर समाज इतर मागास वर्ग  (Other Backward Class) च्या सवलतींचा लाभ घेतोय. त्यावेळी राज्य पातळीवरती धनगर समाजातील लोकसंख्येचा विचार करून (धनगर समाजातील पोटजातींचा विचार न करता) भटक्या जमाती-क मध्ये ३.५% आरक्षण दिले. पण धनगर समाजाच्या अनेक पोटजाती या महाराष्ट्र राज्यात आहेत त्यां सर्वांची जर जनगनना केली तर फक्त महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये धनगर समाज हा सर्वात जास्त आणि लोकसंख्येने १ क्रमांकाचा समुह असणारी जमात आहे. पण निश्चित लोकसंख्या ही सर्व जनगनना झाल्यानंतरच समजेल. मग सरकार जाणूनबुजून धनगर समाजाची जनगनना का करत नाही?? त्याचं उत्तर असं आहे की महाराष्ट्र राज्यातील धनगर समाज हा भटक्या जमाती-क मध्ये आहे आणि पोटजातींचा विचार न करता भ.ज.-क (NT-C) चे ३.५% आरक्षण धनगर समाजाला दिलं गेलं आणि आमच्यातल्या आमच्यातच पोटजातींमध्ये भांडण लावायचं काम प्रस्थापितांनी केलं. याचा अर्थ असा की या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने क्रमांक १ वरती असणार्या धनगर समाजाला फक्त ३.५% मध्ये गुंतवायचं आणि बाकीचा मलिदा इतरमागास वर्गातील व खुल्या वर्गातील समाजाला द्यायचा ही रणनीति आम्ही कधी अभ्यासणार???
एकुण लोकसंख्येच्या टक्केवारीवरुन त्याच्या निमपट आरक्षण द्यायचं अशी तरतूद असताना ३.५% आरक्षण म्हणजे महाराष्ट्र राज्यात धनगर समाज फक्त ७% एवढाच आहे का?? आज जर जनगनना केली तर धनगर समाज १७% नव्हे तर त्याहूनही अधिक आहे मग आमच्या बांधवांनी फक्त ३.५% मध्येच स्पर्धा करायची का??
धनगर, हटकर, व्हटकर, खुटकर, कुचेकर, सनगर, झेंडे धनगर, बंडी धनगर, खांडा धनगर अजूनही अधिक पोटजाती धनगर समाजात आहेत या सर्वांना महाराष्ट्र राज्यात फक्त ३.५% मध्ये अडकवलंय आणि बाकीचा इमाव मध्ये कमी लोकसंख्या असणारा समाज उरलेलेल्या २३.५%चा मलिदा खातोय त्याचाच परिणाम माळोरानी, रानावनातून भटकणार्या धनगर समाजाला याचा लाभच घेता आला नाही. आमचा धनगर समाज डोंगरदरी आणि दूर माळोरानी वास्तव्य करत आहे. काही ठिकाणी धनगर समाजाच्या ज्या वाड्या वस्त्या आहेत तिथे ना विजेची सोय आहे ना पाण्याची सोय  नाही शिक्षणाची व्यवस्था. त्यांच्याजवळ मी भारतीय आहे असे दाखवण्यासाठी आणि सांगण्यासाठी साधं रेशन कार्ड सुद्धा नाही. भारतामध्ये ज्या काही घडामोडी घडतात त्याबद्दल त्यांना काहीच माहीत नाही. विजेची सोय नसल्यामुळे टीवी (दुरदर्शन), वृत्तपत्र  काय असतं तेच त्यांना माहीत नाही.
मग त्या आमच्या धनगर समाजबांधवांची जनगनना झाली का?? आणि झाली तर जनगनना कधी होणार?? तोपर्यंत आमची पुढची पीढी बरबाद करायचं सरकारचं धोरण आहे का?? कधी जाऊन तर बघा त्या ठिकाणी मग कळेल त्या सावरा-पिचड-मोघे-पुरकेला की हा धनगर समाज आदिवासी पेक्षाही अत्यंत हालाखीचं जीवन जगतोय की नाही ते... नुसत्याच शहरातील चार दोन कुटुंबांचा सर्वे करून हे भुंकु लागलेत.
 आज राष्ट्र पातळीवरती आमच्या समाजातील युवकांना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करावी लागतेय हे कीती दुर्दैव म्हणावे लागेल. आज राज्यघटनेत बाबासाहेबांनी तरतूद केल्याप्रमाणे जर अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळाले तर धनगर समाजाची पोरं राखीव आरक्षणातून राज्य आणि राष्ट्र पातळीवर नक्कीच पुढे येतील आणि शैक्षणिक राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात उच्च पदावरती पोहचतील. आज दहावी-बारावीचे निकाल झाले सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या तरी सरकार आल्यावर १० दिवसात आणि तद्नंतर १५ दिवसांत निर्णय घेणार असे म्हणनारे मुख्यमंत्री धनगर आरक्षणावरती कसली पीएचडी करताहेत तेच समजत नाही?? आज धनगर समाजातील हजारो विद्यार्थ्यांना ३.५% स्पर्धा करावी लागणार आणि खुल्या वर्गात तर आमच्या पोरांना संधीच देत नाहीयेत मग कुठल्यातरी खाजगी विद्यालयात लाखो रूपये डोनेशन फी भरून प्रवेश घ्यावा लागणार हे मात्र नक्की पण आर्थिक मागासलेपणा असलेला समाज एवढे पैसे आणणार कुठून??? जर आरक्षण दिले तर महाराष्ट्र राज्यात शरद पवाराच्या पै-पाहुण्यांच्या ज्या शिक्षण संस्था आहेत त्यांना पैसे कोठून भेटणार याचं गणित तुमच्या डोक्यात कसं काय येत नाही??? आम्ही अशा गोष्टींचा विचार करत नसलेमुळे आम्हा स्वतःचे व पर्यायानं धनगर समाजाचे फार मोठं नुकसान झाले आहे. यासाठी आमची जनगनना व्हायला हवी म्हणून सरकारवरती जर दबाव आणला तर आपले हक्क आपल्याला मिळतील व त्याचा लाभ माझ्या धनगर समाजातील गोरगरीब समाजबांधवाला नक्कीच होईल  हे सांगायला मला काही वावगं वाटणार नाही. आम्ही आजपर्यंत चुकत आलोय कारण आम्ही अज्ञानी होतो आणि अज्ञानपणामुळं आमच्या मागण्या काय आहेत हे आम्ही सांगू शकलो नाही. पण आता आम्ही शिकलो-सवरलो एवढंच नव्हे तर लिहायला लागलो आणि बोलायला देखिल लागलो. आता येथून पुढे पोटजाती बाजूला ठेवून अखंड धनगर समाजबांधवांनी फक्त "धनगर" म्हणून एकत्रित यावं अशी मी सर्वांना विनंती करतो. तरच आम्ही सरकारला गुडघ्यावर टेकायला भाग पाडू आता आम्ही नुसतंच मागत बसणार नाही तर आमच्या हक्काचं हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही ही आमची धनगराची औलाद आहे.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Monday, 8 June 2015

जातीवाद नक्की कोण करतंय??

 मी जातीवाद करतोय अशा काही अल्पशा प्रतिक्रिया मला ऐकायला भेटतात. पण खरा जातीवाद कोण करतय याचा विचार तुम्ही आम्ही करायला हवा. या महाराष्ट्र राज्याच्या छाताडातून कष्टकर्यांच्या जातीतून आणि वरिष्ठांच्या  पातीतून जो समाज वेगळा केला गेला तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा आमचा बहुजन समाज वेगळा केला गेला. मग तिथे महार मांग चांभार कुंभार ढोर न्हावी साळी तेली कोष्टी वंजरी हटकर धनगर सनगर रामोशी वडर बेडर मुसलमान लिंगायत असो परीट अथवा लोणारी अन् बेलदार, गोरगरीब असलेला कुणबी मराठा असो या सर्वांवरती अन्याय करण्याचं काम प्रस्थापित आणि महाराष्ट्रातील चिमूटभर असलेल्या सनातनी आणि प्रस्थापित माजलेल्या २००-३०० घराण्यानी केलंय.
पाठीमागे ६ जनपथ, दिल्ली या शरद पवाराच्या निवासस्थानी धनगर समाजातील एक युवक DCC बैंकमधून कर्ज काढण्यासाठी मान्यता मिळावी या हेतूने शरद पवारांकडे जातो व बारामती येथील लोणी भापकर या गावातून आल्याचे मुद्दामहून  सांगतो त्यावेळी लोणी भापकर नाव ऐकल्यानंतर शरद पवारांचा चेहरा उल्हासित होतो पण थोड्याच वेळात शरद पवारांचा द्वारपाल त्या भेटायला आलेल्या युवकाची चिठ्ठी शरद पवारांकडे देतो त्यावेळी चिठ्ठीवरील त्या युवकाचे  'मासाळ' (मासाळवाडी ता बारामती येथील धनगर समाजातील "मासाळ" कुटूंबातील युवक) हे आडनाव वाचल्यानंतर शरद पवार म्हणतो की काम होणार नाही. म्हणजे धनगर समाजातील मासाळ असल्याने त्याचे काम होऊ शकत नाही. त्या धनगर समाजातील युवकानं काय त्याच्या खिशातलं मागीतलं होतं का??
पण सहा महिने उलटल्यानंतर लोणी भापकर येथील मराठा समाजाचं पोरगं शरद पवारच्या ६ जनपथ दिल्ली येथील निवास्थानी जाऊन शैक्षणिक फी माफ व्हावी या उद्देशानं जातं तर तिथे जाग्यावरच एक लाख रू फी लगेच माफ होते पण धनगर समाजातील एखादा युवक शरद पवारांकडे गेला तर त्याचे काम होत नाही.
अरे शरद पवार कुठून आली एवढी मस्ती?? कुठून आला तुला एवढा सत्तेचा माज?? या गोष्टीचा कोणाला  पुरावा हवा असेल तर मी हा पुरावा सादर करतो. मी माझ्या पदरचं लिहतोय किंवा माझ्या खिशातलं लिहतोय असा विषय नाही, कोणाला बदनाम करायचं हा देखिल विषय नाही. पण शाहू फुले आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि पै-पाहुण्या रावळ्यांचे राजकारण करायचे याला घराणेशाही म्हणतात लोकशाही नव्हे, आणि खरी लोकशाही जन्माला घालायची असेल तर पवार पाटील देशमुख ठाकरेंना घरात बसवावं लागेल तरच भारत एक महासत्ता देश बनू शकतो नाहीतर या देशाची सत्ता पवारांच्या हातात गेली तर देशाचं  वाटोळं झालं म्हणून समजा.. बारामती मतदारसंघातील माझा भोळा भाबडा धनगर समाज शरद पवाराला मतदान करतो म्हणून शरद पवाराची चरबी वाढतेय, धनगर समाज पवारांना मतदान करतो म्हणून मासाळवाडी सारख्या खेडेगावाला पाणी देणार नाही अशा धमक्या देण्याचे प्रकार अजित पवार नावाचा टग्या करतो. धनगर समाजाला केंद्राने आरक्षण नाकारले असे नरेंद्र मोदीचे शरद पवारांना पत्र आल्याचा खोटा गौप्यस्पोट सुप्रिया सुळे सारखी शरद पवाराची माजलेली पोरगी करते. खरा धनगर समाजाच्या अनुसुचित जमातीसाठी शरद पवारांचा विरोध आहे कारण धनगर समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर राजकारणात आणि प्रशासनात धनगर समाजाची पोरं चांगल्या पदावरती असतील आणि चमकतील सुद्धा त्यामुळे राज्यात आणि परिणामी भारतामध्ये पवार पाटील देशमुख ठाकरे यांना राजकारण करता येणार नाही हा त्यापाठीमागचा खरा हेतू आहे. ज्यादिवसी धनगर समाज शरद पवाराच्या घराण्यात मतदान करणार नाही त्या दिवसी खरी लोकशाही जन्माला आल्याचे सार्थक होईल.  धनगर समाजाबरोबर लिंगायत समाजाला जर अनुसुचित जमातीच्या सवलती मिळाल्या तर लिंगायत समाजाची पोरं पुढे येतील याची भीती शरद पवारांना आहे. मग प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते यांना याची जाणीव व्हायला हवी होती पण स्वतःच्या लाचारीसाठी अन् स्वार्थासाठी ते शरद पवारांचे तळवे चाटताहेत असा आरोप करायला मला काही वावगं वाटणार नाही. प्रकाश शेंडगे आणि राम वडकुते जर तुम्ही धनगर समाजाचे नेते असता तर धनगर समाजावर असा अन्याय झालाच नसता. धनगर समाजातील नेते स्वतःची पोळी भाजून घेण्यात पटाईत आहेत त्यामुळे धनगर समाजाला ST च्या सवलती मिळू नयेत यासाठी वारंवार गदा आणायचे काम पवार घराणे आणि त्यांची मस्तावलेली पिलावळ करत आहे हे विसरता कामा नये,
अरे कुणाला ऊल्लु बनवायला निघालात??? आम्ही आता तुमचे बाप आहोत हे विसरू नका. या शरद पवार अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना रस्त्यावर भिक मागायची वेळ आणल्याशिवाय हा जातीचा धनगर कदापी शांत बसणार नाही. म्हणून जातीवादी कोण आहेत आणि खरा जाती जातीवाद कोण करतंय याचा विचार तुम्ही करा.
जय मल्हार!! जय अहिल्या!!
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Tuesday, 2 June 2015

नाराज झालाय माझा कामगार बांधव...
आज माणगंगा सहकारी सागर कारखाना लि सोनारसिद्धनगर आटपाडी येथील मतमोजणी पार पडली व शेवटी हापाहापाचा माल गपापाला अशीच अवस्था झाली. विजय जरी घराणेशाहीचा झाला असला तरी सभासदांचा व स्वाभिमानी शेतकर्यांचा पुन्हा एकदा विश्वासघात झाला असं म्हणायला वावगं ठरणार नाही. ज्या कामगारांचा पगार गेल्या २९ महिन्यापासून दिला नाही तो कामगार वर्ग मात्र दुखी आहे नाराज आहे कारण मा.गोपीचंद पडळकर साहेबांनी पैनल लावताच त्या सर्व कामगारांचा ३ महिन्याचा पगार एकदम दिला. पडळकर साहेबांनी परिवर्तन पैनल लावल्याने कामगार वर्ग खूश होता पण राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेतील लाचार/गुलाम बुद्धिजीवी वर्गामुळे माणगंगा सहकारी साखर कारखान्यातील गोरगरीब कामगारांच्या आनंदावरती जणू काय विरझन पडले. त्याच कामगारांच्या खाते उतार्यावरती सव्वासे कोटींचे कर्ज काढून स्वतःच्या घशात घालणार्या राजेंद्र देशमुख यांना त्या गोरगरीब कामगारांच्या भावना कधी समजणार?? सदरच्या साखर कारखान्याची डागडुजी करण्यात आली पण ज्या मशनरी कारखान्यात बसवल्या आहेत त्या जुन्या  कारखान्याच्या असून ३०रु किलो वजनाने विकत घेतलेल्या आहेत आणि कारखान्यात नवीन मशनरी बसवल्याचा दावा करुन करोडो रूपये घशात घालण्याचा काळाबाजार उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही, आज १००/२०० रुपयासाठी  लाचार झालेल्या सभासदांनी कामगारांस तसेच सांगोला, आटपाडी आणि माण या तालुक्यातील ऊस उत्पादकांना योग्य न्याय दिला नाही. खरंतर निष्ठूर आणि निर्दयी लोक माझ्या गोरगरीब शेतकर्यांच्या आणि कामगारांच्या भावना काय समजणार??? आज राजेंद्र देशमुख यांच्या पैनल चे उमेद्वार विजयी झाले असले तरी त्यांनी कधी शेतामध्ये ऊस लावला आहे का?? शेतीला पाणी देताना काय अडचणी येतात ते या उमेद्वारांना कधी माहीतच नाही. खरंतर राजेंद्र देशमुख यांच्या संस्थेत काम करणारा वर्ग हा बुद्धिजीवी वर्ग असला तरी एका ट्रैक्टर ड्राइवर च्या ईशार्यावरती नाचन्याची कला त्यांच्या अंगी चांगलीच उतरली असून त्याच राजेंद्र देशमुख यांच्या  संस्थेत नोकरी मिळावी म्हणून १०-२० लाख रूपये देवून ते बुद्धिजीवी (बुद्धिजीवी कसले हे स्वतःची बुद्धि दुसर्यांच्या बुटाखाली गहाण टाकणारे) लोक लोकांनी मान्य केलेल्या संस्थेत नोकरी करतात. या संस्था आणि कारखाने काय त्या देशमुखाच्या बापाची जहागिरदारी नव्हे..
श्रीमंत भवानराव पंत यांनी बक्षिसपत्र दिलेल्या जमिनीवरती ही संस्था ऊभी झाली ती पण लोकवर्गणीतून आणि कष्टातून...
खरंतर अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायला हवी असं आम्हाला  शाळेत शिकवलं जातं पण याच संस्थेतील  शिक्षकांनी चक्क अन्याय करणार्या अपराध्याला सहाय्य करणे कितपत योग्य वाटते?? त्यांच्याच संस्थेतील काही लोक मला बोलले की देशमुखाच्या संस्थेत एक मजबूरी म्हणून आम्ही काम करतोय. एखादा अपवाद वगळला तर आज थकल्या भागलेल्या माझ्या गोरगरीब कामगार बांधव आणि ऊस ऊत्पादक बांधव यांच्यावर वेळोवेळी अन्याय करणारे जल्लाद म्हणजे राजेंद्र देशमुख यांच्या ताटाखालचे मांजर बनून राहिलेला लाचार आणि स्वार्थी वर्ग.
हाडाची काडं करून कारखान्यात काम करणार्या माझ्या बांधवांवर आज कुर्हाड कोसळली आहे आता राहिलेल्या २६ महिन्याच्या पगाराची आशाच गोरगरीब कामगारांनी सोडून दिली आहे. पैशाच्या लालसेपोठी दीनदुभळ्या आणि दुष्काळाच्या खाईत होरपळलेल्या सभासदांना आणि मतदार बांधवांना खरेदी करणार्याचा घाणेरडा प्रकार जिथं चालतो मग याला काय लोकशाही म्हणायचं का?? राजेंद्र देशमुखाने कारखाना लुटून दुष्काळात संस्था चालवल्या असतील त्यामुळेच कारखान्यावर सव्वासे कोटी रुपयांचे कर्ज झाले. त्या राजेंद्र देशमुखाने टाकलेल्या तुकड्यावर पळणार्या आणि छौ म्हणले की भुंकणार्या कुत्र्यांना राजकारण काय असते आणि कशासाठी केले जाते याची जाणीव त्यांना मुळीच नाहीये.
आज जरी पडळकर साहेबांच्या परिवर्तन पैनल चा पराभव झाला असला तरी ३ महिन्याचा पगार मिळाल्यामुळं कामगार बांधवांच्या चेहर्यावरती जे समाधान दिसलं त्यातच आमचा खरा विजय आहे.
     
       -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Saturday, 23 May 2015

आमच्या पाचवीलाच पुजलेली "भटकंती" : नितीनराजे अनुसे


          धनगर समाजाच्या ST आरक्षणाच्या अंमलबजावणी वरती अजूनही भिजत घोंगडे आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदरच १९५० साली राज्यघटनेत धनगर(धनगड) समाजासाठी अनुसुचित जाती मध्ये कलम ३४२ मध्ये तरदूत करून सुद्धा धनगर समाज आदिवासींचे निकष पूर्ण करू शकत नाही असे बोंबलणार्यांनी खरंच याचा अभ्यास केला आहे का? की कोणाच्या तरी सांगण्यावरतून फालतू बडबड करत बसले आहात??"
मुंबई-पुणे यांसारख्या शहरातील दोन-चार कुटूंबांचा सर्वे केला म्हणजे धनगर समाज आदीवासी असल्याचे निकष पूर्ण करत नाही. धनगर समाजाला ST आरक्षणाची गरज नाही. असे खोटे अहवाल सादर करून ST आरक्षणासाठी आडकाठी आणण्याचे असले तुमचे उद्योगधंदे बंद करा. हजारो वर्षांपासून जंगलामध्ये वास्तव्य करून रानावनात दरी-खोर्यांत ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता पायांच्या नडग्या वाळेपर्यंत शेळ्या-मेंढ्या राखणार्या खेड्या-पाड्यातील वाड्या -वस्त्यांवरील माझ्या धनगर समाजाचा सर्वे करून बघा मग तुम्हाला कळेल की धनगर समाज कुठे राहतो आणि कसा जगतो ते...
         शेळ्या-मेंढ्यांच्या राखणीसाठी आणि त्यांच्या जडणघडणीसाठी पुरक असे वातावरण मिळावे म्हणून भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करुन धनगर समाज बांधव शहरांपासून दूर वाड्या-वस्त्यांवरती वास्तव्य करून आपल्या पोटाची खळगी भरू लागले. यासाठी विशेषता धनगर समाजबांधवांनी दलदलीचा भाग सोडून माळरानांचा अवलंब केला जेणेकरुन दलदलीसारख्या ठिकाणी मेंढ्यांच्या नख्यामध्ये चिखल (Mud) जर अडकला तर शेळ्या-मेंढ्यांच्या नख्या सडतात तसेच अन्य रोग उद्भवतात म्हणूनच धनगर समाज माळरानांवरती विसावला आहे. पण शेळ्या-मेंढ्यांसाठी माळरानाची निवड केल्याने निसर्गाच्या बदलत्या अवतारामुळे तिथे मुबलक प्रमाणात चारा आणि पाणी मिळू शकले नाही म्हणून धनगर समाजाला "भटकंती"साठी स्वतःचं घरदार आणि गाव सोडून या गावावरुन त्या गावी जाण्याचा अजूनही आणि आजही प्रवास करावा लागतोय म्हणजेच  हे जणू काय आमच्या पाचवीलाच पुजले आहे.
         आमची भटकंती कधी जवळून पाहिलीत का?" आमच्या भावना कधी समजून घेतलेत का? आमच्या अज्ञानपणाचा फायदा घेवून आमच्यावर अन्याय करताना मागचा पुढचा कधी विचार केलात का??? पोटाची खळगी भरण्यासाठी ऊन वारा पाऊस यांचा विचार न करता उपाशी-तापाशी शेळ्या-मेंढ्यामागे उभी ठाकणारी आमची जमात. टीचभर पोट भरण्यासाठी जीवनासोबत आयुष्याचा जुगार खेळावा असंच धनगर समाजाचं जगणं, निम्म्याहून अधिक आयुष्याचा संसार घोड्याच्या पाठीवर लादून आज इथे तर उद्या तिथे असंच जगणं आमच्या वाट्याला आले आहे आणि आजही तिच परिस्थिति असताना खोटे अहवाल सादर करून आम्हाला आमच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातंय. कपाळी भंडारा लेवून रानोमाळी भटकत पोरा-लेकरांचं आणि करडा-कोकर्यांचं लटांबणं सोबत घेवून जगताना समोरच्या परिस्थितिवर मात करून जीवन जगताना नाकी नऊ येतो. घोड्याच्या पाठीवर लादलेल्या माचोळीवर नुसतं धान्यच नव्हे तर अर्ध्या आयुष्याचा अख्खा संसार रचलेला असतो, माचोळीच्या बाजूला टांगलेल्या पिशव्यांमध्ये कोकरी करडं हिंदकळत असतात तर माचोळीवरती बांधलेल्या कोंबड्या आणि पाण्यासाठी भली मोठी घागर घोड्याच्या पाठीवर लटकत असते. त्याचप्रमाणे भल्यामोठ्या पाठीमध्ये संसारोपयोगी साहित्य म्हणजे पोटाची आग विझवण्यासाठी थोडीसीच पण गरजेपुरती भांडी-कुंडी डोक्यावरती घेवून मेंढकीण झपाझप पाऊले टाकत या गावावरुन त्या गावाला असा मेंढक्यासोबत प्रवास करत तीन दगडाच्या चुलीवर स्वयंपाक करून पोटाची भुख भागवावी लागते ते पण रोजच आणि प्रवास सुद्धा  रोजचाच तसेच जीवनाचा संसार ज्या घोड्याच्या पाठीवरती लादला जातो त्या घोड्याची लगाम माझ्या चिमुरड्या भावंडांच्या हातात असते, अनवानी पायाची, आईबापासोबत भटकंती करणं लहाणपणापासूनच आमच्याच वाट्याला का??? त्या शेळ्या-मेंढ्या आणि घोड्यासोबत प्रवास करणार्या माझ्या चिमुरड्या भावंडांना शिक्षणापासून देखिल वंचित रहावं लागतं मग भारत सरकार तर्फे ६-१४ वयोगटातल्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जात असेल तर त्याचा माझ्या धनगर समाजाला काय फायदा?? होस्टेल्स आणि बोर्डिंग आमच्या सारख्याच भटकंती करणार्यांच्या मुला-मुलींसाठी आहेत काय?? मग तुमची मुलं मुली फुल्ल सेक्यूरिटी असलेल्या आणि फुल्ल एसी असलेल्या आलिशान गाड्यांत आणि बंगल्यात राहतात मग आमच्या सारख्या आयुष्यभर भटकंती करणार्या समाजबांधवांनी नक्की काय पाप केलंय???
          आमच्या समाजातील लहान मुले आई-वडिलांसोबत घोड्याचा लगाम धरून वनवन फिरतात याचा कोणीच कसा काय विचार करत नाही?? पुरावे पाहिजे असतील तर  nitinrajeanuse123.blogspot.com ला भेट द्या मग वास्तव समजेल तुम्हाला.. असं आमचं जगणं आदिवासी सारखं नव्हे त्यांच्यापेक्षाही अतिशय हालाकीचं जगणं असताना आमच्या हक्काच्या ST आरक्षणावरती गदा आणायचा प्रकार कुठपर्यंत चालणार??
         परवा मी एका मेंढ्याच्या कळपाजवळ जाऊन फोटो घेण्यासंबधी  विनंती केली तेव्हा त्या अशिक्षित मेंढक्याच्या तोंडून ऐकलेलं वाक्य हृदयावरती घाव घालण्यासारखं आहे. फोटो कशाला काढताय??? यावरती मी सांगितले की आपल्या समाजाला ST आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आम्हाला धनगर समाजाच्या भटकंतीवरतीच्या फोटोंचे प्रेजेंटेशन सादर करायचे आहे. हे सांगितल्यानंतर त्या युवकानं विचारलेला प्रश्न तो असा की "आरक्षण म्हंजी काय असतं? ते भेटल्यावर आपल्याला काय फायदा व्हल का??"  याचा अर्थ असा होतो की आमचा धनगर समाज अजूनही अज्ञान आणि अशिक्षित आहे. यातून मला सांगायचा मुद्दा असा की सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या माझ्या धनगर समाजाला ST आरक्षणाच्या अंमलबजावणीपासून का वंचित ठेवलं जातंय??? आणि हे कुठपर्यंत??? आज आमच्या धनगर समाजाची हजारो पोरं IAS/IPS बनण्यापासून वंचित राहिली त्याला जबाबदार कोण?? त्यासाठी आपलीच माणसं विधानभवनात आणि संसदभवनात पाठवा ज्यांच्यामुळे धनगर समाजाच्या न्याय व हक्कासाठी कायदे बनवले जातील. त्यामुळे आपल्यांचे दु:ख काय असते ते फक्त आपल्यानाच कळते इतरांना नाही.
जय मल्हार। जय अहिल्या।। जय यशवंतराजे
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१८५३०००४१२३
 nitinrajeanuse123.blogspot.com
..........................................................

Tuesday, 12 May 2015

चारित्र्यसंपन्न नेत्यांना बदनाम करण्याचं चैनल..

.
शनिवार दि.०९ मे २०१५ रोजी नगर-पुणे रोडवरती नव्याने सुरू झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील कीर्ती फैमिली रेस्टोरेंट ची कीर्ती काल जगजाहिर करण्याचं काम मिडीयावाल्यांनी केलं.
कीर्ति फैमिली रेस्टोरेंट हे रायरी पार्क, सुपा टोलनाक्यावळ, सुपा ता पारनेर जि अहमदनगर (नगर-पुणे रोड). खरंतर तिथं रायरी पार्कमध्ये रायरी बियरबार होता तिथेच कीर्ती फैमिली रेस्टोरेंट नव्याने सुरू झाले. त्या रेस्टोरेंट च्या उद्घाटनास महाराष्ट्र राज्याचे गृहराज्य मंत्री मा ना प्रा राम शिंदे साहेब तसेच ग्रामविकास मंत्री मा दिपक केसरकर उपस्थित होते पण त्या अगोदर तिथे रायरी पार्क हा बियर बार होता सध्याच्या मालकाने रायरी पार्क खरेदी करुन तिथे फैमिली रेस्टोरेंट सुरू केले आहे.
Z24 तास आणि ABP MAZA या मिडीयावाल्यांनी बातम्यासाठी सर्वात पुढे राहण्याच्या स्पर्धेमध्ये एका चारित्र्यसंपन्न नेत्याला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जातेय हे कितपत योग्य आहे.
आजपर्यंत धनगर समाजाचे मोर्चे झाले राजमाता अहिल्याईच्या जयंत्या असोत अथवा यशवंतराव होळकर, राजे मल्हारराव होळकर यांची जयंती असो हे मिडीयावाले तिथपर्यंत कधीच पोहचले नाहीत. पाठीमागे शिरूर येथील मंडनगड मध्ये धनगर समाज बांधवांवरती घोर अन्याय झाला अख्खा महाराष्ट्र हा प्रकार पाहत होता पण सर्वात अगोदर आमच्या चैनल वरती असे म्हणनारी विकाऊ मिडीया सर्वात शेवटी पण पोहचू शकली नव्हती.
बारामती मध्ये झालेल्या आंदोलन आणि उपोषणाची शक्य तितक्या लवकर या मिडीयावाल्यांनी दखल का घेतली नव्हती??? रुई ता अंबड येथील धनगर समाजातील महिलेवरती अत्याचार झाला पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी यांनी राष्ट्रवादीच्या मस्तवाल नेत्यांची म्हणजेच बलात्कार करणार्यांची पाठराखण केली त्यावेळी मिडीयावाले झोपले होते का?? धनगर समाज माळरानावरती दगड-धोंडे अन् काटे-कुटे तुडवत पायांच्या नडग्या वाळेपर्यंत थंडी ऊन वारा पावसाचा विचार न करता रणरणत्या उन्हात शिजत असतो रानोमाळ भटकत असतो मग त्या ठिकाणी तुमची विकाऊ मिडिया सर्वात अगोदच नव्हे तर कधीच पोहचू शकली नाही. पण सत्ताधारी पक्षात एकमेव धनगर समाजाचा मंत्री असताना त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र कोण आणि कोठून करते हे सांगायची गरज पडणार नाही. कोणत्याही पुराव्या अभावी एखाद्या नेत्यांवरती बदनामीच्या बातम्या द्यायला तुम्ही सर्वात अगोदर येता पण  माझ्या समाजावर अन्याय होत असेल तर तुमच्यासारखे भिकारडे आणि विकले गेलेले Z24 आणि ABP Maza कधीच अन्यायाची वाचा फोडत नाहीत मग तुम्ही जी भडवेगीरी अन् चमचेगीरी करताय त्याला लगाम लावायला धनगर समाज समर्थ आहे.
झी २४ तास आणि एबीपी माझा या मिडिया चैनल वाल्यांनी मा ना प्रा राम शिंदे साहेबांची जाहिर माफी मागावी नाहीतर त्यांना त्यांची असल्या चमचेगीरीची आणि खोट्या बातम्या देण्याची दुकाने बंद करावी लागतील याची नोंद घ्यावी. कोणाच्या तरी सांगण्यावरुन आणि कोणाच्या तरी पैशावरती पळणारे मिडीयावाल्यांकडून धनगर समाजातील नेत्यांना बदनाम करायचं कुटील कारस्थान रचलं जातंय आणि हे जर असंच चालू राहिलं तर याद राखा आम्ही धनगराच्या औलादी आहोत शांत बसणार नाही. धनगर समाज एक सोता हूआ शेर है अगर जग जाएगा तो चीरफाड देगा यावरतून तुम्ही समजून घ्या...
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Saturday, 9 May 2015

आज माझ्या धनगर समाजातील पोरं जागी झाली शिकली सवरली, बोलायला लागली, लिहायला लागली तसतशी प्रस्थापितांच्या ह्रदयात धडकी भरु लागली, हीच धनगर समाजातील पोरं जागी झाली तर प्रस्थापित घराणेशाहीला सुरंग लावतील असे भाकित धनगर समाजाचे राजकीय शत्रू असलेल्या यशवंतराव चव्हाण यांनी केले होते आणि ते आज खरं होत आहे. शिक्षण हे एक वाघिणीचं दुध आहे जो पितो आणि पचवतो तो वाघाचा बछडा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. आज धनगर समाजातील पोरं जागी झाली असली तरी आपल्या-आपल्यातच लढू लागली भांडू लागली हे सर्वात मोठं दुर्दैव म्हणावं लागेल.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून गेली ६७ वर्षे झाली माझ्या भोळ्या भाबड्या धनगर समाजावरती अन्याय होत आला मग आमच्यावरती होणार्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आमच्यासारखी तरुण पोरं जागी व्हायला लागली अन् धारदार शब्दरूपी तलवारीनं वैचारिक लढाई एवं प्रसंगी रस्त्यावरती उतरून आपले हक्क हिसकावून घेवू लागली तेव्हा माजलेल्या अन् मस्तावलेल्या प्रस्थापितांची बोलती बंद झाली. डॉ बाबासाहेबांनी घटनेत दिल्याप्रमाणे आरक्षण असो अथवा आमचे अन्य हक्क असोत ते आम्ही हिसकावून घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हा आमचा पवित्रा आहे प्रसंगी समाजासाठी अन हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी बेहतर या वृत्तीनं आम्ही आज लढतो आहे झगडतो आहे.
भट जातींनी आणि प्रस्थापित घराणेशाहींनी लोकशाहीच्या नावावरती गोरगरीब आणि रानावनात भटकंती करणार्या धनगर समाजाचं आर्थिक, राजकिय, शैक्षणिक आणि सामाजिक शोषण केलं आहे त्या सत्तापिपासू भडव्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. एकेकाळी राजा समाज असणारी आमची औलाद आज दुसर्यांच्या गुलामगीरीत का जगतेय?? हा प्रश्न मनात गोंदळ करुन जातो. धनगर समाजाची दलाली अन् शरद पवाराची चमचेगीरी करणार्या धनगर समाजातील भडव्यांना घरात बसविल्याशिवाय ही धनगराची औलाद शांत बसणार नाही कारण आजपर्यंत धनगर समाजावरती अन्याय करण्याचं काम धूर्त आणि आमच्या धनगर समाजाचा राजकीय शत्रु असलेल्या शरद पवारांनी केलंय मग त्यांची चमचेगीरी अन् चाकरी करणार्या दलालांनी वेळीच शहाणं व्हावं. स्व बी के कोकरे साहेबांची राजकीय हत्या करणार्या हत्यारांना रस्त्यावरती आणाल्याशिवाय मी शांत बसणार नाही मग तो माझ्या धनगर समाजाचा असो अथवा कोणीही हे प्रत्येकांच्या लक्षात असू द्या. सत्य नेहमी कटू असलं तरी नेहमी सत्याचाचाच विजय होतो म्हणूनच राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांनी  "सत्यमेव जयते" हे ब्रीदवाक्य आहे दिले आहे ते अगदी प्रेरक आणि सार्थक ठरते. विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती?? म्हणनार्यांना एवढी अक्कल कशी काय नाही की पंढरीचा विठोबा (पांडूरंग) धनगरच आहे म्हणून महात्मा फुलेंनी दिलेला समतेचा पिवळा झेंडा हाती घेवूनच आज आम्ही सत्याच्या मार्गानं वाटचाल करतोय मग दुसरा झेंडा का म्हणून हातात घ्यायचा??? हा झेंडा घेवून सत्याच्या मार्गानं जाताना जर कोणी आमच्या वाटेला गेला तर त्याच्या वाटेवरती जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवरती परत येणार नाही हा धनगर समाजाचा इतिहास आहे हे संबंधितांनी विसरू नये आणि जो समाज इतिहास घडवतो तो इतिहास विसरू शकत नाही अन् इतिहास विसरणारे कधी इतिहास घडवू शकत नाहीत हा सुद्धा मोठा इतिहास आहे. आद्य लढवय्ये बादशाह चंद्रगुप्त मौर्य पासून राजा सम्राट अशोक ते होळकर घराणेशाहीपासून बोरगावचा ढाण्या वाघ बापू बीरु वाटेगांवकर व स्व बी के कोकरे साहेबांचा खरा इतिहास समाजासमोर मांडून तो  समाजापर्यंत पोहचवण्याचा एक प्रामाणिक आणि छोटासा प्रयत्न सदैव करत राहील. मग जर कोणी माझ्या आडवा आला तर त्याला उभा चिरायची धमक या मल्हारराव होळकर आणि अहिल्याईच्या भक्तामध्ये आहे हे विसरू नका.
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................

Sunday, 3 May 2015

परिवर्तनासाठी एक छोटासा प्रयत्न..

मस्त झोपलाय हो माझा धनगर समाज शांत झोपूद्या. गाढ निद्रावस्थेत निपचित पडलाय उगाच डवचू नका. कशाला उगंच बोंबाबोंब करताय?? खरंतर एकवेळ झोपलेल्यांना जागे करता येते पण झोपेचं सोंग घेणार्यांना जागं करता येत नाही मा म्हणीचा अर्थ धनगर समाजासाठी सार्थ ठरतो. अहो ज्यांना आपला इतिहासच माहीत नाही ते काय खाक इतिहास घडविणार आहेत का???
उगाच व्हाटसप आणि फेसबुक वरतून वेळ वाया घालवण्यात काय अर्थ आहे??? जिथं स्वाभिमान गहाण टाकून प्रस्थापितांच्या दावणीला बांधल्या गेलेल्या आणि प्रस्थापितांचे बुट चाटायची सवय लागलेल्या समाजातील दलालांना कीतीही सांगून समजावले तरीही धूतलेल्या गाढवासारखी त्यांची अवस्था होते कारण "गाढव कितीही धूतलं तरी उकिरंड्यातच लोळतं" (ही म्हण मला नाईलाजानं वापरावी लागतेय). मग त्या दलालांना स्वतःच्या स्वार्थासाठी समाजाचे बाजारीकरण करायचं एवढंच त्यांना माहीत आहे. त्यांना पैशाची तलप लागली आहे मग ते प्रस्थापितांकडुन लाखो नव्हे तर करोडो रुपये घेवून येतात अन शे-दोनशे रूपये देवून सर्वसामान्य जनतेला आणि दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखून पायाच्या नडग्या वाळवलेल्या गोरगरीब धनगर  समाजाला भुलवायचं काम करताहेत.
आम्ही मात्र व्हाटसप वरती समाजाला एकत्रित करण्याच्या बढाया मारतोय. काहीजण बोलतात स्वतःच्या प्रसिद्दीसाठी लिहीताय, कोणी कोणी तर आम्हाला विद्वान आहात असे कमेंट करतात तर कोणी "हा एक चिमुरडा आम्हाला ज्ञान शिकवायला लागलाय " म्हणून बोंबा मारताहेत. मग नक्की काय करायचं तेच सुचत नाही. पण माझी गप्प राहून तमाशा बघत बसणार्यांची औलाद नाही तर हे विचार तळागळातील युवा वर्गापर्यंत पोहचवायचे आहेत. जर युवा वर्ग जागृत झाला तर अन्यायाच्या विरोधात पेटून उठेल अन् एकेकांना पेटवून टाकेल. दिवसेंदिवस समाजाला भुलवणारे दलाल मोठे होत चाललेत अन रानमाळावर दगड-धोंड्यातून काटे-कुटे तुडवणारा माझा माय-बाप अजून अज्ञानीच आहे. प्रस्थापित धुर्त नेते जसे सांगतील तसंच  धनगर समाजातील नेते करताहेत त्याला काहीजण अपवाद आहेत. माझ्या गोरगरीब आणि दुष्काळाच्या खाईत होरपलेल्या मायबापांना  खरं राजकारण काय आहे हेच माहीत नाही. ज्यादिवसी प्रत्येक धनगर बांधवांना खरं राजकारण कळेल त्यादिवशी  बारामतीच्या बोक्याच्या व त्याचे बुट चाटणार्या धनगर समाजातील  नेत्यांच्या  टाळूवरची केसं शिल्लक राहणार नाहीत कारण त्या हरामखोरांच्या स्वागताला पायातलं पायतान हातात घेवूनच धनगर समाज बांधव उभे असतील हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. पण शेतामळ्यात राबराब राबणार्या अन् माळरानावर दिवसरात्र शेळ्या-मेंढ्या राखणार्या धनगर समाजाला खरं राजकारण माहीत होत नसेल तर मग व्हाटसप आणि फेसबुक वरतून आम्ही समाजात काय परिवर्तन करू शकतो.? म्हणजे आम्हाला काय काम नाहीत असा त्याचा अर्थ होतो.
जिथं लोकांची मनं बदलली जात नाहीत तिथं आम्ही  काय बदल घडविणार??? राजेशाही थाटात जगणार्या आणि एकेकाळी राजा समाज असणार्या  आम्ही  औलादी असताना देखील आज चमचेगीरी अन् गुलामगीरी प्रवृत्ति समाजात वाढत चाललेय. धनगर समाजाला एकमेकांच्या विरोधात लढायला प्रवृत्त केले जाते तिथं माझ्या धनगर समाजाला कधीच वरती येवू द्यायचं नाही हा प्रस्थापितांचा उद्देश्य आमच्या ध्यानात कधी येणार??? अरे पण प्रस्थापितच नव्हे तर आज धनगर समाजातीलच वरीष्ठ नेते एकमेकांची जिरवण्यासाठी राजकारण करताहेत कीती लज्जास्पद बाब आहे ही.
मला त्यांची नावे घ्यायची नाहीत कारण त्यांना कळालेही असेल मी कोणाबद्दल बोलतोय ते...
आज धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा जरी असला तर प्रत्येकाला वाटतंय आरक्षण मिळावं पण त्याचं श्रेय स्वतःच्या पारड्यात पडावं ही कटूनीती धनगर समाजातील नेत्यांची झाली आहे त्यामुळे प्रस्थापितांना दोष देण्यात अर्थ नाही. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे ही म्हण माझ्याच धनगर समाजातील नेत्यांना वापरावी लागेल. मग तिथं कोण लहान असेल अथवा मोठा.
धनगर समाजातील नेत्यांना वाटत असेल की धनगर समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे तर ज्या पक्षात ज्या संघटनेत आज तुम्ही समाजाची चमचेगीरी करताय त्या त्या पक्षाचा तुम्ही राजीनामा द्या अन पिवळ्या झेंड्याखाली एकत्रित येवून मंत्रालय गाठा तुम्हाला आरक्षण कोण देत नाही तेच मी बघतो.
मग कोणी भाजपचा असेल शिवसेना, माकप, भाकप, शेकाप, राष्ट्रवादी असेल कोंग्रेस असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असो शिवसंग्राम असो जनसंग्राम असो अथवा जनता दल असो अथवा अलान फलान कोणते असतील तर त्या त्या पक्षातील धनगर समाजातील नेत्यांना माझी विनंती आहे की जर तुम्ही धनगर असाल आणि जर तुमच्या नसात धनगरांचं रक्त सळसळत असेल तर प्रत्येकांनी राजीनामे देवून पिवळ्या झेंड्याखाली एकत्र या नाहीतर आरक्षणाच्या आणि समाजविकासाच्या फालतू आणि पोकळ बडबड करत बसू नका. खरे मल्हारराव होळकरांचे वारसदार असाल तर थोडा कमीपणा घ्यायला शिका कोणीतरी धाकल्या बापाचं व्हायला शिका सतराशे साठ संघटना तयार करून समाजाचे विभाजन करत बसू नका आणि महत्वाचं म्हणजे धनगर समाजातील ५२ पोटजातींना एकत्रित करून राज्य पातळी तसेच राष्ट्र पातळीवरती एकत्रित येवून चर्चा विनीमय करा आणि तुम्हाला एकत्रितपणे येवून चर्चा करायची नसेल तर याचा अर्थ तुम्ही माझ्या धनगर समाजाचं सरळ सरळ विभाजन करताय मग तुमच्या संघटना काय पेटवायला आहेत का??
जय मल्हार!! जय अहिल्या!!!
आपलाच समाजबांधव
          -नितीनराजे अनुसे
अनुसेवाडी ता आटपाडी जि सांगली
         +९१७६६६९९४१२३
 nitinrajeanuse.blogspot.com
..........................................................