![]() |
API Namdev Shinde |
पोलिस म्हंटले की सर्वसामान्य माणसांच्या मनात एक विलक्षण भिती निर्माण होते, क्रुर, निष्ठुर, निर्दयी, दगडाच्या काळजाचा माणूस असे चित्र डोळ्यासमोर ठेऊन सर्वसामान्य माणसं पोलिसांबद्दल नाना तर्हेचे विचार करत बसतात. परंतु सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत असणारे सहायक पोलिस निरीक्षक मा. नामदेव शिंदे साहेब याला अपवाद आहेत.
व्हाटसप च्या माध्यमातुन समाजजागृती करत असताना २०१५ मध्ये शिंदे साहेबांशी माझी ओळख झाली. तेव्हा ते सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर पोसिस स्थानकात सहायक निरीक्षक म्हणून कार्यरत होते. अधूनमधून फोन कॉल व्हायचे तेव्हा शिंदे साहेब मोठ्या भावाच्या नात्याने मला म्हणायचे की वेळापूरला कधी आला तर अवश्य भेट घे. २९ मार्च २०१६ रोजी तसा योग आला. मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमासाठी चौंडी ला जात असताना शिंदे साहेबांना फोन करून त्यासंदर्भात सांगितले आणि मुलगी पाहण्याचा कार्यक्रम आटोपून परत येताना साहेबांची भेट घ्यायला वेळापूर मध्ये थांबलो सायंकाळच्या साडेसात वाजून गेल्या होत्या तरी शिंदे साहेब अजूनही ऑफिस मध्ये होते. शिंदे साहेबांनी पोलिस स्थानकात ऑफिस मध्ये यायला सांगितले. सोबत मित्र विक्रम देवडकर, चुलत भाऊ सुनिल, आई-वडिल होते. खरंतर आई- वडिलांनी कधी पोलिस स्टेशन अथवा कोर्ट कधी पाहिलेच नव्हते. परंतु आयुष्यात ते पहिल्यांदाच एका पोलिस अधिकारी सोबत त्यांच्या ऑफिसमध्ये मनमोकळेपणाने दिलखुलास गप्पा मारत होते. माझ्या आई-तात्यांनी जसे परिस्थितिचे चटके खाऊन मला शिकवलं लहानाचं मोठं केलं तशाच परिस्थितितून शिंदे साहेब पुढे आले आहेत. ते शिंदे साहेब आज एक कर्तव्यदक्ष, कार्यक्षम अधिकारी आहेत, तसा वेळापूर पंचक्रोशित त्यांचा दबदबा देखिल होता. परंतु मनमोकळ्या स्वभावामुळे स्थानिक नागरिकांच्या मनात त्यांनी घर निर्माण केले होते. सदैव हसतमुख राहणारे शिंदे साहेबांचे व्यक्तिमत्व हे लहान-थोरांना भाळवणारे आहे. जिथे जिथे शिंदे साहेब जायचे तेथील अवैध धंद्यांना ते पाबंदी लावत असत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळे. पोलिस हा जनतेचा शत्रु नसून मित्र आहे हे विचार त्यांनी नागरिकांच्या मनावर बिंबवले आहेत आणि त्या विचाराने ते प्रामाणिकपणे अविरत कार्य करत असतात. गडचिरोली सारख्या ठिकाणी नक्षलवादी भागात देखील मा. नामदेव शिंदे साहेब यांनी कर्तव्य बजावले परंतु त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांना तिथे कधीच त्रास झाला नाही. उलट शिंदे साहेबांनी पोलिस म्हणून नव्हे तर एक आदर्श नागरिक या नात्याने तेथील युवकांना चांगली शिकवन दिली आणि प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केले. वेळापूर नंतर शिंदे साहेबांची बदली मंगळवेढा (सोलापूर), हुपरी (कोल्हापूर) व सध्या जयसिंगपूर येथे कार्यरत आहेत. शिंदे साहेब कितीही मोठ्या पदावर असले तरी त्यांनी अजूनही माणूसकी जपून ठेवली आहे. सर्वसामान्य मेंढपाळ कुटुंबातून पुढे आलेले हे व्यक्तिमत्व आहे. आजपर्यंत त्यांनी कधीच पदाचा आणि वर्दीचा गैरवापर केला नाही शिवाय गर्वही केला नाही. पोलिस प्रशासकीय व्यवस्थेच्या माध्यमातुन नागरिकांचे प्रश्न ऐकून घेऊन ते सोडवतात. आजपर्यंत त्यांना अनेक सामाजिक संस्थांनी आदर्श पोलिस अधिकारी म्हणून सन्मानित केले आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दित त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखत त्यांच्या अखत्यारित येणार्या विभागातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी झाले आहे हा त्यांच्या यशाचा आलेख असाच दिवसें-दिवस वाढत राहो हीच त्यांच्या जन्मदिनानिमीत्त माझ्याकडून मल्हारी मार्तंड चरणी प्रार्थना...
मा. नामदेव शिंदे साहेब तुम्ही औक्षवंत व्हा
तुमच्या यशाचे आभाळ दिवसें-दिवस वाढत जावो याच तुम्हाला जन्मदिनाच्या शुभेच्छा...
-नितीनराजे अनुसे
8530004123
Happy Birthday Saheb🎂💐
ReplyDelete